Nubia Red Magic 7S Pro | 18 जीबी रॅम आणि 64 एमपी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच, फीचर्स जाणून घ्या
नुबियाने आपला नवा गेमिंग फोन म्हणून नुबिया रेड मॅजिक ७ एस प्रो स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. याआधी कंपनीने या महिन्याच्या सुरुवातीला हा फोन चीनमध्ये लाँच केला होता. फोनमध्ये १०८०x२४०० पिक्सलचे रिझॉल्युशन असलेला ६.८ इंचाचा एफएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला असून १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि अंडर डिस्प्ले फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन पॉवरफुल स्नॅपड्रॅगन ८+ जेन १ चिपवर काम करतो आणि १८ जीबी रॅम आहे. तसेच, फोनच्या ग्लोबल व्हेरियंटमध्ये ५००० एमएएच बॅटरी आहे. किंमत किती आणि विशेष काय, जाणून घेऊया सविस्तर.
3 वर्षांपूर्वी