Nucleus Software Services Share Price | न्यूक्लियस सॉफ्टवेअर सर्व्हिसेस शेअरने 5 दिवसात 52 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
Nucleus Software Services Share Price | ‘न्यूक्लियस सॉफ्टवेअर सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 809.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअरमध्ये इतकी जबरदस्त वाढ होण्याच्या कारण म्हणजे कंपनीने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. न्यूक्लियस सॉफ्टवेअर कंपनीने सेबीला दिलेल्या अहवालात कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारच्या बैठकीत आपल्या पात्र शेअर धारकांना 10 रुपयेच्या दर्शनी मूल्याच्या शेअरवर 100 तक्के म्हणजेच 10 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 971.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी