Onion Rates in Maharashtra | हे फक्त जाहिरातबाज शिंदे सरकार! 500 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्यांना फक्त 2 रुपये नफा
Onion Rates in Maharashtra | महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या कांद्याचे भाव घसरल्याने प्रचंड अस्वस्थ आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ५८ वर्षीय कांदा उत्पादक शेतकरी राजेंद्र तुकाराम चौहान यांनी सोलापूर एपीएमसीमध्ये कांदा विक्रीसाठी ७० किलोमीटर पायपीट केली. ५१२ किलो कांदा विकल्यानंतर त्यांना प्रतिकिलो एक रुपये दर मिळाला. केवळ वाहतूक, मंडई आणि लोडिंग-अनलोडिंगचा खर्च काढला तर ५१२ किलो कांदा विकून २.४९ रुपयांचा नफा कमावला आहे. कांद्याची लागवड करणारे तुकाराम म्हणाले, ‘५१२ किलो कांदा विक्रीसाठी मला प्रतिकिलो एक रुपया दर मिळाला आहे. एपीएमसीमध्ये कांदा विक्रीचा खर्च कमी करून मी या कांद्यातून २.४९ रुपयांची बचत केली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचंड रोष वाढल्याचं चित्रं आहे.
2 वर्षांपूर्वी