Ookla Speed Test | भारतात 5G लाँच, तर इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताची क्रमवारी 78 वरून 79 व्या स्थानावर घसरली
Ookla Speed Test | इंटरनेट स्पीड टेस्टच्या बाबतीत भारताच्या क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली. सप्टेंबर महिन्यात मोबाइल आणि ब्रॉडबँड या दोन्ही वेगांच्या बाबतीत भारत मागे पडल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीत ग्लोबल इंटरनेट स्पीडटेस्ट इंडेक्स ओकलाने दाखवून दिले आहे. या अहवालानुसार ब्रॉडबँड आणि मोबाइल इंटरनेट स्पीड या दोन्ही बाबतीत भारताचा क्रमांक घसरला आहे. इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देशात ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये आणखी घट झाली आहे.
2 वर्षांपूर्वी