Oppo Reno Smartphone | ओप्पो रेनो 8 आणि ओप्पो रेनो 8 प्रो या दिवशी भारतात लाँच होणार | किंमत जाणून घ्या
ओप्पो रेनो ८ आणि ओप्पो रेनो ८ प्रो च्या लाँचिंगच्या तारखा अखेर समोर आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सीरिजबाबत माहिती इंटरनेटवर पसरत असून आता 18 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता भारतात हा फोन लाँच होणार असल्याचं समोर आलं आहे. ओप्पो रेनो 8 ची किंमत यापूर्वीच लीक झाली असून, याच्या बेस व्हेरिएंटची किंमत 30 हजार रुपयांपासून ते 33 हजार रुपयांपर्यंत असू शकते, अशी माहिती समोर आली आहे. ओप्पो रेनो ८ प्रोची किंमत 42,900 ते 46,000 रुपयांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.
3 वर्षांपूर्वी