INDIA Vs NDA | भाजपच्या राजकीय 'राष्ट्रवादाला' आणखी एक आव्हान, 'इंडिया'ची टॅगलाईन असेल 'जीतेगा भारत'
INDIA Vs NDA | राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर आक्रमकपणे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला काँग्रेसप्रणित विरोधी पक्ष सातत्याने आव्हान देत आहे. विरोधकांच्या ऐक्याच्या दुसऱ्या बैठकीत नावाची घोषणा करण्यात आली. या आघाडीला ‘इंडियन नॅशनल डेमोक्रॅटिक इन्क्लुसिव्ह अलायन्स’ असे नाव देण्यात आले आहे. याला INDIA असेही म्हटले जाईल. आता बातमी येत आहे की, या आघाडीने आपली टॅगलाईन ‘जीतेगा भारत’ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी