महत्वाच्या बातम्या
-
रविवारी लसीचा साठा, सोमवारी लसीकरण आणि मंगळवारी जैसे थे स्थिती - पी चिदंबरम
देशात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी एकाच दिवसात तब्बल ८८ लाख लोकांचे लसीकरण झाल्याचा विक्रम नोंदवण्यात आला होता. परंतु या विक्रमावर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रविवारी लसीचा साठा केला, सोमवारी लसीकरण केले अन् त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी जैसे थे स्थिती झाली असा दावा पी. चिंदबरम यांनी केला आहे. चिंदबरम यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
थोडी जरी लाज शिल्लक असेल तर देशाची जाहीर माफी मागा | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - पी. चिदंबरम
जगप्रसिद्ध आरोग्य आणि संशोधन मॅगझीन ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचं सांगत मोदी सरकारच्या कारभारावर बोट ठेवले आहे. त्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आक्रमक झाले असून थोडी जरी लाज शिल्लक असेल तर केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुजरातसाहित अनेक राज्यांमध्ये लसीकरण मोहीम लांबणीवर | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली आहे. असे असताना व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे तीन दिवस कोरोना लसीकरण केले जाऊ शकणार नाही. येथे 2 मेपर्यंत लसीकरण मोहिम थांबवण्यात आली आहे. BMC ने गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, ‘लसीच्या कमतरतेमुळे पुढच्या तीन दिवसांपर्यंत मुंबईमध्ये व्हॅक्सीनेशन करणार नाही.’ तत्पूर्वी, मुंबईच्या महापौर किशोरी पेंडेकर यांनी गोरगाव येथील नेस्को लसीकरण केंद्रावर अचानक भेट दिली. केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसल्या.
4 वर्षांपूर्वी -
तेव्हा त्यांनी २१ दिवसांत युद्ध जिंकू असा दावा केला होता | आता दुसरं युद्ध - चिदंबरम
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावरून आता माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
22 वर्षांची विद्यार्थिनी देशासाठी धोका ठरतेय म्हणजे भारताचा पाया नक्कीच डळमळीत झालाय
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शनिवारी बंगळुरुतून 21 वर्षीय क्लायमेट अॅक्टिव्हिस्ट दिशा रवीला अटक केले आहे. फ्रायडे फॉर फ्यूचर कॅम्पेनच्या संस्थापकांपैकी एक असून, तिच्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक टुलकिट एडिट केल्याचा आरोप आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी ट्विटमध्ये म्हणाले होते | अर्थव्यवस्था धोक्यात आहे | तरुणांना रोजगार हवा आहे
पहिल्या तिमाहीतील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराची आकडेवारी समोर आल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अपेक्षेप्रमाणे मोदी सरकारवर हल्ला चढवला होता. भारताचा विकासदर जवळपास उणे २४ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील ही सर्वात निचांकी घसरण आहे. याबाबत मी अगोदरच इशारा दिला होता. परंतु, दुर्दैवाने केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला निर्दोष ठरवले आहे का ? - पी चिदंबरम
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्ट्रक्चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
YES बँकेची संकटातून सुटका करण्यासाठी SBI'ला हुकूम - पी चिदंबरम
चिदंबरम म्हणाले, “येस बँकेचे लोन बुक २०१४ ते २०१९ च्यादरम्यान पाच पटीने वाढले. २०१४ मार्चमध्ये लोन बुक रक्कम ५५ हजार कोटी रुपये होती, त्यामध्ये मार्च २०१९ मध्ये वाढ होऊन २ लाख कोटीहून अधिक झाली. फक्त दोन वर्षांत ९८ हजार कोटींची वाढ होऊन २ लाख कोटींपेक्षा जास्त झाली.
5 वर्षांपूर्वी -
YES Bank: सीतारामन यांना एकूण वाटतं अजून युपीए'च सत्तेत आहे - चिदंबरम
आजारी येस बँकेला मदत करण्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निर्णयावर वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी शंका उपस्थित केली आहे. येस बँकेची या संकटातून सुटका करण्यासाठी एसबीआयला हुकूम देण्यात आल्याचे माझे मत आहे असे चिदंबरम पत्रकार परिषदेत म्हणाले. चिदंबरम म्हणाले, “येस बँकेचे लोन बुक २०१४ ते २०१९ च्यादरम्यान पाच पटीने वाढले. २०१४ मार्चमध्ये लोन बुक रक्कम ५५ हजार कोटी रुपये होती, त्यामध्ये मार्च २०१९ मध्ये वाढ होऊन २ लाख कोटीहून अधिक झाली. फक्त दोन वर्षांत ९८ हजार कोटींची वाढ होऊन २ लाख कोटींपेक्षा जास्त झाली.
5 वर्षांपूर्वी -
देशद्रोहाचा कायदा म्हणजे नक्की काय, हे ना केंद्राला समजलं ना केजरीवालांना: चिदंबरम
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आणि इतर नऊ जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याला दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने पोलिसांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. काँग्रेस नेते आणि खासदार पी चिदंबरम यांनी दिल्लीतील आप सरकारच्या निर्णयावर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
त्यांच्याकडे आधीच पाकिस्तानच नागरिकत्व असताना पुन्हा भारताचं नागरिकत्व कशासाठी? पी. चिदंबरम
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीसह देशभरात अनेक ठिकाणी सुरू असलेले आंदोलन मंगळवारीही सुरूच राहिले. अनेक ठिकाणी विद्यार्थी, कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते रस्त्यांवर उतरले. आसामसह केरळ, तेलंगण, तमिळनाडू, पश्चिम बंगालसह अन्य ठिकाणी नव्याने निदर्शने करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
INX Media: पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
आयएनएक्स मीडिया मनी लाँडरिंग प्रकरणात (INX Media Money Laundering Case) तुरुंगात असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं आज, बुधवारी त्यांना काही अटींवर जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे चिदंबरम तब्बल १०६ दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. (Former Union Finance Minister P Chidambaram Got bail From Supreme Court of India)
5 वर्षांपूर्वी -
INX मीडिया प्रकरण: जामीन मिळूनही चिदंबरम यांना राहावं लागणार कोठडीत
आयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेत, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) एका प्रकरणात एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर पी. चिदंबरम यांना हा जामीन मिळाला आहे. मात्र, असे असले तरी देखील चिदंबरम यांनी तुरुंगातच राहावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे चिदंबरम हे २४ ऑक्टोबरपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआय आणि ईडीने वेगवेगळे खटले दाखल केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
तिहार जेलमध्ये चौकशीनंतर पी चिदंबरम यांना ईडीकडून अटक
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. ईडीच्या तीन सदस्यांच्या टीमकडून पी चिदंबरम यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास पी चिदंबरम यांची चौकशी सुरु होती. चौकशीनंतर पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी चिदंबरम यांची चौकशी तसंच अटकेची परवानगी दिली होती. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी पी चिदंबरम ५ सप्टेंबरपासून तिहार जेलमध्ये आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार (INX Media) प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला आहे. कोर्टानं चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. यामुळे आता ईडीकडून त्यांना कधीही अटक केली जाऊ शकते. आज दुपारपर्यंत चिदंबरम यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चिदंबरम यांच्याविरोधात ठोस पुराव असल्याचा दावा ईडीनं केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिदंबरम ‘हिंदू दहशतवाद’ शब्दाचे जनक : शिवसेना
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी हा निर्णय दिला.
5 वर्षांपूर्वी -
चिदंबरम यांना आज न्यायालयात हजर करणार
आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानंतर सुप्रीम कोर्टानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. चिदंबरम यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, विरोधी पक्षांकडूनही या अटकेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, सीबीआयने पी. चिदंबरम यांच्यावर रात्रभर प्रश्नांची सरबत्ती केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, सुप्रीम कोर्टात धाव
आयएनएक्स मीडिया’शी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंग प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर ‘बेपत्ता’ झाले असून, त्यांचा मोबाइलही स्वीच ऑफ आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचालनालयाचे (‘ईडी’) पथक रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी त्यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावलीच; पण तातडीने सुप्रीम कोर्टात धाव घेऊनही चिदंबरम यांना दिलासा मिळू शकला नाही. त्यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज, बुधवारी सुनावणी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाची अवस्था पाहून सुषमा स्वराजांनी लोकसभेचं मैदान सोडले : चिदंबरम
भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय काल इंदूर येथे जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या या निर्णयावर विरोधकांनी खोचक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी तिखट प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाची स्थिती अत्यंत वाईट असल्याने त्यांनी निवडणुकीचे मैदान सोडून दिल्याचे ट्विट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती CBI च्या अटकेत.
आयएनएक्स मीडिया प्रकरणी आर्थिक व्यवहार प्रकरणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कीर्ती यांना आज सीबीआयने चेन्नई विमानतळावरच अटक केली.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार