Page Industries Share Price | अंडरविअर बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, 9938% परतावा दिला, प्लस डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स
Page Industries Share Price | ‘पेज इंडस्ट्रीज’ या ‘जॉकी इनर वेअर’ ब्रॅण्डच्या मालक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जबरदस्त उसळीसह ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स एका दिवसात 1661 रुपयांपर्यंत वाढले होते. काल शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी पेज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.95 टक्के वाढीसह 38,699.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात या कंपनीचे शेअर्स 6.7 टक्के वाढीसह 39651.90 रुपयांवर पोहोचले होते. दिवसभराच्या व्यवहारात शेअरने 37138.95 रुपये ही नीचांक किंमत ही स्पर्श केली होती. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने 1661 रुपयेची उलाढाल केली होती. या कंपनीने गुरुवारी डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल जाहीर केले, आणि विद्यमान शेअर धारकांना 60 रुपये प्रति इक्विटी शेअर म्हणजेच दर्शनी मूल्यावर 600 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. एमके ग्लोबल फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, पुढील काळात पेज इंडस्ट्री कंपनीचे शेअर्स 48,800 रुपये किमतीवर जाऊ शकतात. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Page Industries Share Price | Page Industries Stock Price | BSE 532827 | NSE PAGEIND)
2 वर्षांपूर्वी