महत्वाच्या बातम्या
-
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला | बलुच बंडखोरांचे कृत्य
बलुचिस्तानच्या बंडखोरांनी बलुचिस्तान प्रांतातील किनारी शहर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पुतळा (Muhammad Ali Jinnah’s Statue Destroyed) नष्ट केला. सोमवारी ‘डॉन’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुरक्षित क्षेत्र समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर जूनमध्ये उभारण्यात आलेला पुतळा रविवारी सकाळी स्फोटकांनी उडवण्यात आला.
3 वर्षांपूर्वी -
काल हॅकर्सनी पाकिस्तानी न्यूज चॅनल डॉन'वर तिरंगा फडकवला
पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक भारताचा झेंडा फडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमधील प्रसिद्ध डॉन न्यूज चॅनलवर रविवारी दुपारी तिरंगा फडकला आणि स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देण्यात आल्या. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. न्यूज चॅनलवर भारताचा झेंडा फडकल्यानंतर चॅनलची सिस्टम हॅक झाल्याचं म्हटलं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठा दहशवादी हल्ला, 5 जण ठार
पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर हल्ला करणारे सर्व दहशतवादी ठार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक पोलीस उप-निरीक्षक आणि चार सुरक्षारक्षक ठार झाल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. जिओ न्यूजने हे वृत्त दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताने पाकिस्तानचे हेरगिरी करणारे ड्रोन कठुआ येथे पाडले
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानी गुप्तहेर ड्रोन पडले. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा खुरापती काढण्यासाठी या ड्रोनचा वापर करण्यात येत होता. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर हे ड्रोन गोळाबार करुन पाडण्यात यश आले आहे. रथुआ गावात फॉरवर्ड पोस्टमध्ये ड्रोन पाडण्यात यश आले.
4 वर्षांपूर्वी -
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या खटल्यात विशेष कोर्टाने आज मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. मुशर्रफ सध्या पाकिस्तानात नाहीत. त्यांच्यावर दुबईत उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच मुशर्रफ यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून आरोग्याबाबत माहिती दिली होती. मी कोणत्या परिस्थितीत आहे हे चौकशी आयोगानं येऊन पाहावं, असं ते म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
कराची-रावळपिंडी एक्स्प्रेसला भीषण आग; ६२ प्रवाशांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये गुरुवारी सकाळी कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला लागलेल्या भीषण आगीत ६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. स्फोट झाल्यानं एक्स्प्रेसला आग लागल्याचं सांगितलं जातंय. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताला धडा शिकवणार, पाकिस्तानचं लष्कर सज्ज; इम्रान खानकडून संताप
पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये इम्रान खान पोहोचले असून, त्यांनी तिथल्या संसदेला संबोधितही केलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत भारताविरोधात गरळ ओकली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचं सत्य जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. ते फक्त काश्मीरवर थांबणारे नाहीत, लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्येही घुसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पुलवामानंतर भारतानं बालाकोटची मोहीम आखली होती. त्याप्रमाणेच आता ते लवकरच पाकव्याप्त काश्मीर मिळवण्यासाठीही प्रयत्न करतील.
5 वर्षांपूर्वी -
पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्यापेक्षा दहशतवादावर कारवाई करावी: अमेरिका
भारतानं कलम ३७० हटवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले आहेत. पाकिस्तान भारताविरोधात आक्रमक झाला असून, पाकिस्तानने बुधवारी (७ ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. त्यानंतर आता अमेरिकेनंही त्यांना इशारा दिला आहे. पाकिस्ताननं भारताविरोधात आक्रमक होण्याऐवजी दहशतवादावर कारवाई करावी, असे खडे बोल पाकिस्तानला सुनावले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने हवाई मार्गही केला बंद
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यावरून पाकिस्तानने भारताबरोबरच्या संबंधांवर बुधवारी घाव घातला. पाकिस्तानने भारतीय राजदूतांना मायदेशी परतण्यास सांगितले असून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्याला माघारी बोलावले आहे. तसेच भारताशी होणारा व्यापार पाकिस्तानने रोखला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आता पाक लष्कराला भारतावर हल्ल्याचा आदेश देऊ का ? इम्रान खान संतापले
कलम ३५- ए आणि ३७० वरून मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील वातावरण तापत चाललं होतं. अमरनाथ यात्रा रद्द केल्यानंतर आता काश्मीरमध्ये वेगानं घडामोडी घडत होत्या. काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर २ दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची शिफारस केली. या शिफारशीला राष्ट्रपतींनीही देखील मान्यता दिली आहे. देशाच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय मोदी सरकारने घेतल्याची सर्वत्र रंगली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO : पाक लष्कराचं विमान नागरी वस्तीत कोसळलं; १७ जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या रावलपिंडी शहरात मंगळवारी सकाळी पाकिस्तानी लष्कराचं एक विमान नागरी वस्तीत कोसळलं. या अपघातात आतापर्यंत १७ जण ठार झाल्याची माहिती आहे तर १२ जण गंभीररित्या जखमी आहेत. मृतांपैकी ५ जण पाकिस्तानी सैन्यातील जवान आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज मोहम्मद आमीर निवृत्त
पाकिस्तान क्रिकेट टीमचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने वयाच्या अगदी २७व्या वर्षी आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. हि घोषणा त्यांनी शुक्रवार २६ जुलै २०१९ रोजी केली. २००९ मध्ये श्रीलंके समोर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मोहम्मद आमीर यांचं वय १७ वर्षे होतं.
5 वर्षांपूर्वी -
चॅरिटीच्या माध्यमातून पैसे जमा केले व दहशतवादी कृत्यासाठी वापरले; हाफिजला पाकिस्तानात अटक
मुंबईवरील भ्याड २६/११ मधील दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदला पाकिस्तानमधील लाहोर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाक सैन्याच्या इस्पितळात भीषण स्फोट; दहशतवादी मसूदच्या मृत्यूच्या तिसऱ्यांदा बातम्या?
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील रावलपिंडी येथे सैन्याच्या इस्पितळामध्ये भीषण स्फोट झाला. या स्फोटावेळी इस्पितळामध्ये जागतिक संघटनेने दहशतवादी घोषित केलेला जैश-ए-मोहम्मदचा मुख्य मसूद अजहरदेखील उपचारासाठी दाखल होता. अद्याप मसूद अजहरचं या स्फोटात नुकसान झालं की नाही याबाबत काही माहिती मिळाली नाही.
5 वर्षांपूर्वी -
ब्रेकिंग न्यूज - उद्या होणार भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका
पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय वैमानिक अभिनंदन वर्तमान यांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ही घोषणा केली आहे. संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती आणि कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
6 वर्षांपूर्वी -
पकडलेल्या भारतीय पायलटला सम्मानाने वागवा, पाकिस्तान जनतेची मागणी #SayNoToWar
पाकिस्तान एअर फोर्स ची ३ युद्ध विमानं भारतीय हद्दीत शिरताच भारतीय एअर फोर्स ने त्यांना प्रत्युत्तर देत त्यातील १ विमान हाणून पाडले परंतु त्यातील पायलट बेपत्ता असल्याची माहिती दिली. आणि या चकमकीत आपले १ विमान पाकिस्तान हद्दीत क्रॅश झाले, परंतु त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचे प्राण वाचले.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईसह राज्यात हाई अलर्ट, दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात
पाकिस्तानातील बालाकोट येथे भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भारत – पाकिस्तान तणाव आणखीनच वाढला आहे. काश्मीरमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून जम्मू, श्रीनगर, पठाणकोट येथे विमानतळांवरून प्रवासी वाहतुक बंद करण्यात आली आहे आहि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर संस्थांनी सर्वाधिक धोका मुंबईला असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवादी शालेय बसला निशाणा बनवू शकतात किंवा मुलांच्या बसचे अपहरण करु शकतात. त्यामुळे राज्यातही हाय अलर्ट जारी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा
श्रीनगर, 27 फेब्रुवारी : सकाळी आलेल्या वृत्तानुसार भारतीय हवाई दलाचे १ विमान अपघाताने कोसळले असल्याची बातमी ताजी असतानाच ‘ आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे’ असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला.
6 वर्षांपूर्वी -
वाह मोदीजी वाह, इतर मंत्र्यांना मीडिया सोबत व्यस्त ठेऊन पाकिस्तानला गाफील केले
भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या दाव्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीने तातडीची बैठक बोलावली आणि याचे नेतृत्व पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केले. या बैठकी नंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताने केलेल्या एअर स्ट्राईकच्या वृत्ताचे खंडन केले. त्यांच्या मते भारतीय हवाईदल पाकिस्तान हद्दीत शिरताच पाकिस्तान एअर फोर्स सतर्क झाली आणि भारतीय विमानांनी लगेच पळ काढला.
6 वर्षांपूर्वी -
इतिहासाचा अभ्यास करता पाकिस्तानला काश्मीरचा दावा करण्याचा अधिकार नाही - सौदी प्रिन्स
इतिहासाचा अभ्यास करता पाकिस्तानला काश्मीरचा दावा करण्याचा अधिकार नाही – सौदी प्रिन्स
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार