Pandora Papers Exposed | त्या 4 बड्या भारतीय व्यक्तींच्या परदेशी संपत्तीची चौकशी होणार
करदात्या देशांत छुपी मालमत्ता घेण्याच्या पडताळणीशी संबंधित दस्तऐवजांमध्ये ३०० भारतीयांची नावे आहेत. यात व्यापारी, ४ नेते आणि इतरांचा समावेश आहे. तथापि, सध्या काही (Pandora Papers Exposed) नावेच समोर आली आहेत. ही अशी गुंतवणूक आहे, जिची माहिती सरकारी संस्थांना दिली गेली नाही. दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) म्हटले की, विविध संस्था याप्रकरणी चौकशी करतील. यात ईडी, आरबीआय, आयकर विभाग आणि एफआययू यांचा समावेश आहे. सरकार यासंबंधीची माहिती विदेशातून मिळवण्यासाठी पावले उचलेल.
3 वर्षांपूर्वी