महत्वाच्या बातम्या
-
भाजपामध्ये भूकंप? | १४ झेडपी सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, ११ मंडळ अध्यक्षांचे राजीनामे
बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून भाजपच्या पंचायत समिती सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र सुरू केले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोमवारपर्यंत १५० राजीनामे आले असून ते मुंबईला गेले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षांतर्गत राजकारण तापवलं जातंय? | बैठकीत धाडसी निर्णयाची शक्यता
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने नाराज झालेल्या समर्थकांना पंकजा मुंडे मंगळवारी भेटणार आहेत. मुंबईतील वरळी येथील कार्यालयात पंकजा मुंडे समर्थकांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारीच त्या दिल्लीहून मुंबईला परतणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिल्ली वारीनंतर समर्थकांची समजूत काढताना पंकजा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी सुद्धा पंकजांना राष्ट्रीय मुद्यांच्या बहाण्याने सुनावले | वेगळा निर्णय घेण्याची शक्यता बळावली
बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बीड मध्ये भाजपच्या विरोधात मोठा आक्रोश उमटत असताना दिसत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात गोपिनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांचा विसर मोदी सरकारला पडल्याचे पहायला मिळाल्याने अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा अध्यक्षांकडे सोपविले असून, जिल्हाध्यक्ष देखील पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कापण्यात आला. याचमुळे आता मुंडे समर्थक आक्रमक झाले असून, उद्या शेकडो कार्यकर्ते पंकजा भेटून वेगळा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे समर्थक 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही पत्रं
पंकजा समर्थक आणि बीडचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे तब्बल ७७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला | राज्यातील पक्षांतर्गत विरोधकांची चिंता वाढली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे अचानक दिल्लीत आल्या. त्यांनतर त्या आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांच्यासोबत जेपी नड्डाही आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्याकडे संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये देखील मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | पर्यायी वंजारी नेते मोठे केले जातं असल्याचा आरोप
भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाद अजून पेटणार असल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात | पंकजांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली
भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात जागा न मिळाल्यानं मुंडे समर्थक चांगलेच नाराज असल्याचं स्पष्ट झालंय. बीडमध्ये अनेक मुंडे समर्थकांनी भाजपच्या पदाचा राजीनामा देत आपली उघड नाराजी व्यक्त केलीय. यानंतर कुठलीही नाराजी नसल्याचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता या राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केलीय. विशेष म्हणजे राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट निष्ठावान नसल्याचे ठपके मारण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे वाद अजून पेटणार असल्याचं दिसतंय.
4 वर्षांपूर्वी -
मुंडे भगिनी आणि समर्थकांमध्ये फडणवीसांविरोधात खदखद वाढली | पंकजा मुंडे दिल्लीला रवाना
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भारतीय जनता पक्षात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. बीडमधील १४ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये फडणवीसांविरोधात पडसाद? | बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर भारतीय जनता पक्षात नाराजीचे पडसाद उमटले आहेत. बीडमधील १४ भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. पंकजा मुंडे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत पक्षाचा निर्णय पटलेला आहे असं सांगत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. परंतु बीडमध्ये मुंडे समर्थकांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
टीम देवेंद्र वगैरे माहिती नाही | पण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे - पंकजा मुंडे
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीड डीसीसी बॅंक निवडणुक | धनंजय मुंडेंसमोर पंकजा मुंडेंनी आधीच पराभव मान्य केला?
बीड जिल्ह्यातील राजकारण वेगाने बदलत आहे. बीड जिल्ह्यावर मंत्री धनंजय मुंडे यांचा प्रभाव वाढत असताना पंकजा मुंडे मात्र वारंवार आधीच पराभव मान्य करत असल्याचं पाहायला मिळतंय. सहकार क्षेत्रातील स्थान कमजोर झाल्यास पंकजा मुंडे यांचा भविष्यातील मार्ग देखील कठीण होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गोपीनाथ मुंडेंचा व्हिडीओ ट्विट | जातीनिहाय जनगणना करा | पंकजा मुंडेंनी केंद्राला आठवण करून दिली
आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली.
4 वर्षांपूर्वी -
रोहित, माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो | चला हवा येऊ द्यामध्ये राजकीय टोलेबाजी
झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप खासदार सुजय विखे पाटील एकाच मंचावर एकत्र आले आहेत. डॉ. निलेश साबळेंनी त्यांच्या थुकरट वाडीत राजकिय नेत्यांना आमंत्रित केले आहे. लवकरच हा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, राजकिय वर्तुळात याची चर्चा सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात पंकजा मुंडेंचे समर्थक भिडणार | प्रवीण घुगेंची बंडखोरी
राज्यातील ५ पदवीधर मतदारसंघांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. तर ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे सर्व निकाल जाहीर केले जातील. निवडणुकीसाठी ५ नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (१२ नोव्हेंबर) आहे. उद्या (१३ नोव्हेंबर) आलेल्या अर्जांची छानणी होणार आहे. तसेच अर्ज मागे घेण्याची तारीख १७ नोव्हेंबर आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुडेंना माजलगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीकडून राजकीय धक्का
मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीने जोरदार राजकीय धक्का दिला आहे. माजलगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर चक्क आपल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची वेळ आली. एनसीपीने भारतीय जनता पक्षाला राजकीय दणका दिल्याने माजलगावच्या नगराध्यक्षपदी शेख मंजूर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंना बीड जिल्ह्यातच राष्ट्रवादीने एकावर एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गोपीनाथ मुंडेंच्या काळातला दबदबा उरला नाही | पंकजांच्या नैतृत्वावर भाजपमधून प्रश्नचिन्ह
मराठवाड्यात पंकजा मुंडे या भाजपच्या दिग्गज राजकारणी आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वारसा लाभलेल्या पंकजा मुडेंवर गोपीनाथ मुंडेंचं नाव आणि दबदबा पुढे करून पक्षांतर्गत राजकीय हल्ले सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगारांच्या आडून सध्या सुरु झालेले राजकीय हल्ले भविष्यात इतर विषयात देखील तोंडवर काढतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उ. महाराष्ट्रात खडसेंविरोधी जे राजकारण शिजलं | तेच मराठवाड्यात पंकजा मुंडेंच्या बाबतीत? - सविस्तर
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आणि आ. सुरेश धस आमनेसामने
२१ रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कोयता उचलून तोडणीला जाण्याचे पंकजा मुंडे (BJP Ex MLA and Minister Pankaja Munde) यांनी आदेश दिले आहेत. मात्र दुसरीकडे या घोषणेला विरोध करत भाजप आमदार सुरेश धस (BJP MLA Suresh Dhas) यांनी १५० टक्के वाढ झाल्याशिवाय एकही मजूर जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. ऊसतोड मजुरांच्या आंदोलनात फूट पडल्याचं चित्र आहे. कारण या प्रश्नावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडेचं वर्चस्व असलेल्या बँकेच्या चेअरमनला लाच घेताना अटक
भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मागील 2 वर्षापासून गाजत असलेल्या वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी करण्यात आली. औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार उजेडात आला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH