Parking Penalty Rules | कार-बाइक आणि ऑटो मालकांसाठी महत्वाची बातमी, पार्किंग दंडाबाबत नवे नियम
Parking Penalty Rules | आपल्या कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे म्हटले आहे. बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे होणारी कोंडी दूर करण्यासाठी गडकरी यांनी नवी घोषणा केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्र्यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो कोणी पाठविल्यास त्याला ५०० रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी एका कार्यक्रमात केली.
2 वर्षांपूर्वी