कुटुंब कल्याण! शिंदे गटातली नेत्यांच्या जागा धोक्यात, अजित पवार गटाची भाजपसोबत आधीच फिक्सिंग? पार्थ पवार लोकसभेच्या आखाड्यात?
Parth Pawar | अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारले आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून महाराष्ट्रातील पवार कुटुंबात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. आता अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार चर्चेत आहेत. अजित पवार हे त्यांचे चिरंजीव पार्थ यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देऊ शकतात, अशी चर्चा आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते पहिल्यांदाच नशीब आजमावत होते, पण अपयशी ठरले होते. त्यांना मावळ मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले.
2 वर्षांपूर्वी