PayMate India IPO | पेमेट इंडिया 1500 कोटींचा आयपीओ लाँच करणार | गुंतवणुकीची मोठी संधी
आघाडीची बी २ बी पेमेंट आणि सेवा पुरवठादार कंपनी पेमेट इंडिया आपला आयपीओ घेऊन येणार आहे. त्यासाठी कंपनीने बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर दाखल केला आहे. या आयपीओच्या माध्यमातून १,५०० कोटी रुपये उभारण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या (डीआरएचपी) मसुद्यानुसार या आयपीओअंतर्गत १,१२५ कोटी रुपयांचे नवे शेअर्स देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ऑफर फॉर सेल (ओएफएस) अंतर्गत कंपनीचे प्रवर्तक, गुंतवणूकदार आणि अन्य भागधारकांकडून ३७५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे.
3 वर्षांपूर्वी