महत्वाच्या बातम्या
-
Petrol Diesel Price | पेट्रोलियम कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर
मागील ४ दिवसांपासून सुरु असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला (Petrol Diesel Price) अखेर ब्रेक लागला आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी इंधनाच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत. यापूर्वी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 25 आणि 30 पैशांची वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली होती. गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल 1.05 रुपयांनी महागले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग | सलग तिसऱ्या दिवशी वाढ
इंधन दराचा उडालेला भडका कायम आहे. देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक (Petrol Diesel Price) गाठला असून, दररोज किंमती वाढत आहेत. गेल्या तीन सलग तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशातील प्रमुख चार महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर सर्वाधिक आहेत.
3 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने जनतेचे जगणे कठीण करून ७ वर्षांत इंधनामधून १३.५ लाख कोटी कमावले | भाजपचे आंदोलक आहेत कुठे? - काँग्रेस
पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे गेले आहेत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी विचारला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | केंद्र सरकारने करकपात न केल्यास पेट्रोल-डिझेल अजून महागणार
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल भाव तीन वर्षांच्या विक्रमी तेजीवर पोहोचले आहे. याची किंमत प्रति बॅरल ८० डॉलर पार पोहोचली आहे. याआधी ऑक्टोबर २०१८ मध्ये हा ७८.२४ डॉलरवर होता. अमेरिकी कच्चे तेल डब्ल्यूटीआयही १.१% महाग होऊन ७४.८० डॉलर प्रति बॅरल झाले. दोन्ही इंधनांत सलग पाचव्या दिवशी उसळी दिसली. केंद्र व राज्य सरकारांनी कर कपात केली नाही तर भारतात आगामी दिवसांत पेट्रोल-डिझेलचे ३ रुपयांपर्यंत महाग (Petrol Diesel Price) होऊ शकते. एक महिन्याआधी कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर प्रति बॅरल हाेते. म्हणजे, एका महिन्यात यात १४.३% ची वाढ झाली आहे. या वर्षी जानेवारीत हे प्रति बॅरल ५१ डॉलर होते. या हिशेबाने या वर्षी याच्या दरात ५६.९% ची वाढ झाली.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल | सलग ३ दिवस दरवाढ
आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७० पैशांनी वाढलेत. देशामध्ये पेट्रोल डिझेलचे वाढते दर हे सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
पेट्रोलपंपवर १०० लिटरने पेट्रोल भरताना तुम्ही त्यांच्याकडे बघायचं, मग ते म्हणतात कशी तुझी जिरवली - अजित पवार
पेट्रोल-डिझेल दरात आज कोणतेही बदल झालेले नाहीत. IOCL वेबसाइटनुसार, आज शनिवारी देशभरात इंधन दर स्थिर आहे. यापूर्वी शुक्रवारी डिझेलच्या दरात 22 पैसे प्रति लीटरपर्यंत वाढ झाली होती. तर पेट्रोल दर स्थिर ठेवण्यात आले होते. पेट्रोल किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. या वाढीसह आज राजधानी दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 101.19 रुपये आणि डिझेलचा भाव 88.82 रुपये प्रति लीटर आहे.
3 वर्षांपूर्वी -
पेट्रोलियम पदार्थ GST कक्षेत आणणे शक्य नाही | GST परिषदेतील एकमत | भाजप शासित राज्यांचाही विरोध
जवळपास १८ महिन्यांनंतर जीएसटी परिषदेची ही प्रत्यक्ष बैठक लखनऊमध्ये झाली. राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असलेल्या या अप्रत्यक्ष करविषयक सर्वोच्च निर्णय मंडळाकडून सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल आणि पेट्रोल-डिझेलला ‘जीएसटी’च्या कक्षेत आणून त्याचे दर लक्षणीयरीत्या कमी होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र सध्याच्या काळात पेट्रोलियम पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आणणे शक्य नाही, यावर परिषदेतील सर्वच सदस्यांचे एकमत झाले. केरळ उच्च न्यायालयालाही हा निर्णय कळविला जाईल, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | किचन बजेट कोलमडणार | 1 ऑक्टोबरपासून CNG व PNG महागणार
सध्या इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. ऑक्टोबर महिन्यात या संकटात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण ऑक्टोबर महिन्यापासून घरगुती सिलेंडरच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | सामान्य लोकांचा खिसा कापणं सुरूच | गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला
सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्यात. देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC) ने विनाअनुदानित 14.2 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ केलीय. आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 859.5 रुपये झालाय. तर तो पूर्वी 834.50 रुपये मिळत होता. यापूर्वी 1 जुलै रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या महिन्याच्या सुरुवातीला IOC ने 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 73.5 रुपये प्रति सिलिंडर वाढवली होती.
3 वर्षांपूर्वी -
स्वस्त इंधन विसरा | एक्साइज ड्युटी कमी करू शकत नाही | पेट्रोल-डीझेल महागण्याला मनमोहन सिंग सरकार जबाबदार
पेट्रोल आणि डीझेलच्या वाढत्या किंमतींनी सामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. अशात इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी होणार असल्याच्या चर्चेने लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. पण, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या चर्चा स्पष्टपणे फेटाळून लावल्या आहेत. उलट वाढत्या महागाईला भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नाही तर यापूर्वी सत्तेत राहिलेले काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार आहे असा अर्थमंत्र्यांनी ठणकावून सांगितले आहे. तामिळनाडू सरकारने एक लीटर पेट्रोलच्या किमतीमध्ये 3 रुपयांची घट केली. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर निर्मला सीतारमण बोलत होत्या.
3 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | तिरंगा यात्रेत फुकट पेट्रोलसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
यूपीतल्या कोशांबीचे आमदार संजय कुमार गुप्ता यांनी तिरंगा यात्रेचं आयोजन केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकार्त्यांसाठी आमदार गुप्तांनी मोफत ठेवलं होतं. त्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. आधी धक्काबुक्कीपर्यंत असलेलं प्रकरण नंतर थेट हाणामारीपर्यंत गेलं. कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | महागाई, इंधन दरवाढीविरोधात विरोधकांची दिल्लीत सायकल रॅली | मोदी सरकारला संसदेत घेरणार
राहुल गांधी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतची नाश्ता बैठक संपली आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी सायकलवरून संसदेसाठी रवाना झाले आहेत. महागाईवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबची बैठक होताच काँग्रेस नेते संसदेकडे वळले. राहुलसोबत विरोधी पक्षांचे नेतेही सायकलवरून संसदेत जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदी है तो मुमकिन है | आज मध्यरात्रीपासून CNG, घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ जाहीर
देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाल्याने सर्व सामान्य माणूस पोळलेला असताना आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात देखील मोठी वाढ होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
इंधन दरवाढीतून लोकांच्या खिशावर डल्ला | मुंबईकरांसाठी पेट्रोल प्रति लीटर 107.20 रुपये
देशातील वाढती बेरोजागारी आणि वाढती महागाई अशा दुहेरी संकटाचा सामना करत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत इंधन दरवाढीमुळे आणखी भर पडताना दिसत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करताना दिसत आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात 27 पैसे आणि डिझेलच्या दरात 19 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.20 आणि डिझेलची प्रतिलीटर किंमत 97.29 रुपयांवर जाऊन पोहोचली. कोलकाता आणि दिल्लीतही इंधनाच्या दरांचा भडका उडाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मोदीजी कांदे, पेट्रोलच्या किंमती कमी करण्यासाठी आलेले नाहीत | असं वाटतंय त्यांनी दूर राहा - भाजप प्रवक्त्या
दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या सारिका जैन यांनी शुक्रवारी यासंदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी कांदा, टोमॅटो आणि पेट्रोलची किंमती कमी करण्यासाठी नव्हे तर भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी आले असल्याचे म्हटले. सारिका जैन यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक, कलम ३७० रद्द करून अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सुरुवात करुन असे काम केले आहे, ज्यासाठी इतिहास त्यांना नेहमीच लक्षात ठेवेल.
4 वर्षांपूर्वी -
..त्यापेक्षा गाड्या OLX वर विका हा एकमेव पर्याय लोकांकडे असेल? | पेट्रोल-डिझेल ऐतिहासिक दरांकडे
देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक दरांकडे झेप घेत आहेत. त्यात मोदी सरकारला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसल्याचं देखील पाहायला मिळतंय. ज्या मुद्यांना पुढे करत मोदी २०१४ मध्ये सत्तेत विराजमान झाले ते मुद्दे आज त्यांच्या चर्चतच नसतात. तसेच याच विषयामुळे महागाई प्रचंड वाढलेली असताना मोदी सरकारमध्ये यावरून काहीच हालचाल होताना दिसत नाही आणि परिणामी सामान्य माणूस होरपळून निघत आहे. त्यात सध्या तज्ज्ञांनी पेट्रोल-डिझेल संदर्भात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तसं झाल्यास स्वतःची वाहन OLX वर विक्री करण्याशिवाय सामान्य लोकांकडे दुसरा पर्याय नसेल असंच दिसू लागलंय.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल, महागाई उच्चांकावर | ज्या मुद्यावर मोदी सत्तेत त्याच मुद्यावर आज दुर्लक्ष | जनता हतबल
मोदी सरकारच्या काळात महागाई आणि पेट्रोल-डिझेलचे भाव उच्चांकी दरावर पाहोचले आहेत. इंधनाचे भाव प्रचंड वाढत असल्याने परिणामी महागाई देखील प्रचंड वाढत असल्याने सामान्य जनता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे महागाई आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमती याच विषयावर रान पेटवत मोदी सत्तेत विराजमान झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढ | 7 राज्यांमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे | या ठिकाणी 107.53 रुपये लीटर
देशामध्ये महागाई सर्व रेकॉर्ड तोडत आहे. गेल्या 25 दिवसांत पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 6 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहेत. गेल्या 42 दिवसात 24 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. तेलाच्या महागाईमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. यावर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान तेलाच्या वाढत्या दराबाबत म्हणाले की, “मी हे मान्य करतो की आजच्या किंमतीमुळे नागरिक आणि ग्राहकांना समस्या निर्माण होत आहेत, यात काही शंका नाही.’ सरकारने हे मान्य केले आहे परंतु त्यांच्याकडे महागाईवर इलाज नाही.”
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या राज्यात पेट्रोल-डिझेल किमतीच्या भडक्याने लोकांच्या खिशाला आग | अजून विक्रमी दरांकडे कूच
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
युवासेनेकडून डोंबिवलीत केवळ १ रुपयात १ लीटर पेट्रोल | 'या' निमित्ताने केंद्रालाही चपराक
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज पेट्रोलचा दर 27 पैशांनी तर डिझेलचा दर हा 23 पैशांनी वाढला आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 102.30 रुपये असून डिझेलची किंमत ही 94.39 रुपये इतकी आहे. देशातील एकूण सहा राज्यांत पेट्रोलचे दर हे शंभरीपार झाले असून डिझेलचा प्रवासही शंभरीकडे सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 20,000 रुपये देईल ही योजना, महिन्याचा खर्च भागेल