Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटांचे दर वाढवले, तब्बल इतकी वाढ झाली आहे
Platform Tickets Price | सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वेने मुंबईतील अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किमतीत वाढ केली आहे. तिकिटांमधील ही वाढ तात्पुरती आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या स्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी सीएसएमटी, दादर, ठाणे, कल्याण, एलटीटी आणि पनवेल रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीटाचे भाडे १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहे. या वाढीव किमती २२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत लागू असतील.
2 वर्षांपूर्वी