Penny Stocks | या 34 रुपयाच्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना 17 पट परतावा देतोय, स्टॉकचे नाव सेव्ह करा
Penny Stocks | एप्रिल 2004 मध्ये ‘पॉन्डी ऑक्सिडेस आणि केमिकल्स’ चे शेअर्स BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते. हा स्टॉक ज्यावेळी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता, तेव्हा त्याची किंमत फक्त 34.36 रुपये प्रति शेअर होती. सध्या हा स्टॉक 586 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 18 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 17 पट अधिक वाढवले आहेत. कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. बोनस जारी करण्यासाठी कंपनीने 29 सप्टेंबर 2022 रेकॉर्ड तारीख निश्चित केली होती. 15 जानेवारी 2007 रोजी पॉन्डी ऑक्साइड्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1:10 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले होते.
2 वर्षांपूर्वी