Post Office RD Vs Bank RD | तुमचा फायदा कुठे? पोस्ट ऑफिस RD की बँक RD? अधिक पैसे कोणती गुंतवणूक देईल जाणून घ्या
Post Office RD Vs Bank RD | जवळपास सर्व सरकारी, खाजगी बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांना आरडी स्किममधे गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. एवढेच नाही तर स्मॉल फायनान्स बँकही आपल्या ग्राहकांना ही योजना ऑफर करतात. सामान्य RD योजनेच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना RD खात्यावर जास्त व्याज परतावा मिळतो. या योजनेमध्ये व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने दर तिमाही आधारावर केली जाते. RD योजनेत मिळणारे व्याज चक्रवाढ पद्धतीने दर तीन महिन्यांनी दिले जाते. म्हणजेच या योजनेत तुमच्या ठेवीचा कालावधी जेव्हढा जास्त असेल, तेव्हढा जास्त फायदा तुम्हाला मिळेल. म्हणूनच आरडी योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावले पाहिजे.
2 वर्षांपूर्वी