Post Office RD Vs Mutual Fund | पोस्ट ऑफिस RD फायद्याची की म्युचुअल फंड? 1000 रुपये गुंतवणुकीत कुठे अधिक पैसे मिळतील पहा
Post Office RD vs Mutual Fund | दीर्घ कालीन गुंतवणूक नेहमीच दीर्घ काळात अप्रतिम परतावा कमावून देते. आपल्या जोखमीच्या क्षमतेनुसार गुंतवणूक बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला कोणतीही जोखीम न घेता नियमित गुंतवणूक करून कडक परतावा कमवायचा असेल तर, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. दुसरीकडे जर तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजारातील जोखीम घेऊन सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट करु इच्छित असाल तर, म्युचुअल फंड एसआयपी हा तुमच्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर निश्चित उत्पन्नरुपी परतावा दिला जाईल. आरडी स्कीमचे व्याजदर पूर्व निर्धारित असतात. या स्कीम गुंतवणूक केल्यास कोणत्याही रिस्कला सामोरे जावे लागत नाही. दुसरीकडे, म्युच्युअल फंड एसआयपी ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, परंतु यात मिळणारा परतावा खूप आकर्षक असतो.
2 वर्षांपूर्वी