Post Office RD Vs SIP | टेंशन नका घेऊ पैसाचं! पोस्ट ऑफिस RD की SIP? कुठे पैसा जलद वाढेल? गणित लक्षात ठेवा
Post Office RD vs SIP | दीर्घकालीन गुंतवणूक नेहमीच मोठा परतावा देते. वेगवेगळ्या जोखीम प्रकारानुसार आणि क्षमतेनुसार दीर्घकालीन गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला डायरेक्ट जोखीम न घेता नियमितपणे गुंतवणूक करून चांगला परतावा कमवायचा असेल तर पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम हा गुंतवणूकीचा मजबूत पर्याय ठरू शकतो. दुसरीकडे, जर तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बाजारातील जोखीम घेऊ इच्छीत असाल, तर म्युचुअल फंड सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय असू शकतो. पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये मॅच्युरिटीवर तुम्हाला एक निश्चित उत्पन्न मिळेल. पोस्ट ऑफीस RD स्कीममध्ये व्याजदर आधीच ठरलेले असतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला मार्केट रिस्कचा सामना करावा लागत नाही. दुसरीकडे, म्युच्युअल फंड एसआयपीमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, परंतु ही स्कीम खूप चांगला परतावा कमावून देते.
2 वर्षांपूर्वी