PPF Money | हलक्यात घेऊ नका! सरकारी पीपीएफ योजना सुद्धा देत करोड मध्ये परतावा, असं ऑनलाईन खातं उघडा
PPF Money | दरमहा छोटी रक्कम गुंतवणूक करून दीर्घ काळात मोठा परतावा कमावण्यासाठी PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सर्वात उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना हमखास परतावा देणारी एक सुरक्षित योजना मानली जाते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी/PPF स्कीम योजनेचे खाते तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा नाजीकच्या बँकेत जाऊन उघडू शकता. ही फायदेशीर योजना तुमची गुंतवणूक अनेक पत वाढवले आणि तुम्हाला करोडो रुपयेचा परतावा कमावून देईल. PPF योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा वार्षिक 1.5 लाख रुपये आहे. या योजनेतील गुंतवणूकीवर आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलत दिली जाते. भारत सरकारद्वारे या योजनेतील गुंतवणुकीवर दिल्या जाणाऱ्या व्याज दराचे तिमाही आधारावर पुनर्विलोकन केले जाते.
2 वर्षांपूर्वी