८ पोलीस शहीद झाले तेव्हा समाजिक कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते कुठे होते? - प्रदीप शर्मा
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी