परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही - प्रज्ञासिंह ठाकूर
परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असा टोला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला आहे. यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी रविवारी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले की, काँग्रेसने आत्मपरीक्षण केले पाहिजे. त्यांच्या पक्षातील लोकांकडे कशाप्रकारे बोलावे याची सभ्यता नाही. तसेच त्यांच्याकडे संस्कार आणि देशभक्तीही नाही. मुळात दोन देशांचे नागरिकत्व असणाऱ्यांच्या अंगात देशभक्ती कुठून येणार? चाणक्याने म्हटले होते की, या भूमीतील सुपुत्रच देशाचे रक्षण करु शकतो. परदेशी महिलेल्या पोटी जन्माला आलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही, असे साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी