महत्वाच्या बातम्या
-
राजगृह तोडफोड प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर प्रथमच मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
विकास दुबे तर बदमाश होताच, पण पोलीस सुद्धा बदमाश निघाले - प्रकाश आंबेडकर
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला.
5 वर्षांपूर्वी -
राजगृह तोडफोड प्रकरणी एका संशयिताला अटक, राजगृहला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण
राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - राजगृह निवासस्थान तोडफोड प्रकरण, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘राजगृहा’वर काल संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. या घटनेविरोधात जनतेकडून, राजकीय नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राजगृहावर तोडफोड करणाऱ्या माथेफिरूंनी घटनास्थळावरून पळ काढल्याने सध्या पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू आहे. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सरकारचे किती दिवस शिल्लक हे ज्योतिष फडणवीसच सांगू शकतात - प्रकाश आंबेडकर
अकोला येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘केंद्र सरकारने ओबीसींसाठी राखीव असलेल्या वैद्याकीय जागेवर या प्रवर्गातील विद्यााथ्र्यांना प्रवेश दिला नाही. या धोरणामुळे २०१७ पासून ते आजपर्यंत ११ हजार विद्यााथ्र्यांना फटका बसला. देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑधर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली.
5 वर्षांपूर्वी -
चीनच्या घुसखोरीसंदर्भात खोटं बोलून नरेंद्र मोदी देशवासियांची फसवणूक करतायंत - प्रकाश आंबेडकर
लडाखच्या सीमारेषेवरील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच, चीन सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नव्हते, तर मारहाण होऊन जवान शहीद झालेच कसे ? असा प्रश्नही आंबेडकर यांनी विचारला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी नागरिकांची फसवणूक करत असल्याचेही त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व आर्थिक स्थितीवरून लोकांना विचलित करण्यासाठी चीन-भारत मुद्याला हवा
एकीकडे कोरोना व्हायरस आणि पूर्व- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळची संकटं येत असताना युद्धाचे ढगही दाटतील का अशी शंका यायला लागली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी व शहांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना गोगलगाय करून टाकलंय
शेअर बाजारात दररोज फार काही आशादायक घडामोडी घडत नसून बाजार नीचांकी पातळीवर कोसळत असतानाही केंद्र सरकारला त्याची चिंता वाटत नाही. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून ती सावरण्यात केंद्राला अपयश येत आहे. हे अपयश लपविण्यासाठी नागरिकत्व कायद्याचा विरोध करणाऱ्या फळीकडे लक्ष केंद्रित करून देशामध्ये अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या वंचित विरुद्ध पवार आक्रमक
वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आणखी एक धक्का बसलाय. पक्षाचे नेते आणि माजी आमदार हरिदास भदे हे आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. अकोला पूर्वमधून ते विधानसभेवर निवडून आले होते. २६ फेब्रुवारीला त्यांनी आणि इतर ४५ पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे प्रकाश आंबेडकरांकडे पाठवले होते. त्यावेळेसच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत दिले होते. या आधीही अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांची साथ सोडली आहे. त्यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिल्लीतील दंगल हा आरएसएस व भाजपाने रचलेला पूर्वनियोजित कट – प्रकाश आंबेडकर
दिल्लीत झालेली दंगल ही पूर्वनियोजित होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने ही दंगल घडवून आणली. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा दंगल झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते शनिवारी पंढरपूर येथे नाभिक समाजाच्या मेळाव्यात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. अकोला पाठोपाठ राज्यातील महत्वाच्या अशा मुंबई आणि उपनगरांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक बंड केल्यानं ‘वंचित’ला हा मोठा हादरा बसल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
वंचितला मोठा धक्का! माजी आमदारांसह तब्बल ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
वंचित बहुजन आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम शिरसकर, वंचितचे महाराष्ट्र राज्य सचिव नवनाथ पडळकर, देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांच्यासह ४८ प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये या पदाधिकाऱ्यांचा महत्वाचा वाटा राहीला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एल्गार परिषद: प्रकरण फ्रॉड असल्याचं बोलायची मुख्यमंत्र्यांकडे हिंमत नाही: प्रकाश आंबेडकर
भीमा-कोरेगाव प्रकरणाचा खटला मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास पुणे सत्र न्यायालयाने मंजुरी दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या कोर्टाने यासंबंधी आदेश दिला. पुणे न्यायालयाने तसे ‘ना हरकत’ पत्रही दिले आहे. याप्रकरणातील सर्व आरोपींना येत्या २८ फेब्रवारी रोजी मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयासमोर उभे करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. एल्गार परिषद व कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत होते. अचानक केंद्र सरकारने हा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेत एनआयएकडे दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
आरपीआय बंद'मध्ये सहभागी न झाल्यानेच 'वंचित'चा बंद अपयशी : रामदास आठवले
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभरात बंद ची हाक देण्यात आली होती. जालन्यातील मामा चौकात वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सीएए, एनआरसी विरोधात जोरदार घोषणा बाजी करत मुख्य बाजार पेठ बंद करण्याच्या प्रयत्न केला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. बंद शांततेतच पार पाडायचा होता असे यावेळी आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
शांततेच्या मार्गाने बंद करण्याचं प्रकाश आंबेडकर यांचं जाहीर आवाहन
वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून यावेळी काही ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA - NRC विरोधात वंचित'कडून आज महाराष्ट्र बंद; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. CAA आणि NRC विरोधात तसंच, देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्याचं आवाहन भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांनीही बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र बंदमध्ये ५०हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात आज या बंदला आज कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं पुकरालेल्या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
बंधूंमध्ये राजकीय फूट? वंचित'च्या अपयशामुळे आंबेडकरी समाजात नैराश्य: आनंदराज आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीमुळं आंबेडकरी समाजात नैराश्य आलं आहे, असा थेट आरोप रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २६ व्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी आपली भविष्यातील भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे यावेळी आनंदराज आंबेडकरांनी आंबेडकरी जनतेला नवा पर्याय देणार असल्याचंही म्हटलं.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची अवस्था घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी: प्रकाश आंबेडकर
मोदी सरकारची अवस्था ही घरातील वस्तू विकायला काढणाऱ्या दारुड्यासारखी झाली आहे, अशी जळजळीत टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सध्याच्या आर्थिक परिस्थितीवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात सत्तांतर झाल्याने कोरेगाव भीमा येथे दंगल घडवण्याचा डाव होता: प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही भीमा-कोरेगाव येथे जाऊन विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर, तेथे जमलेल्या विविध संघटनांशी वार्तालाप केला. याठिकाणी आज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सभाही घेतली जाणार असून सर्वच अनुयायांना मार्गदर्शन केले जाणार आहे. मात्र, विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल