महत्वाच्या बातम्या
-
डिटेन्शन कँपची पद्धत ब्रिटिशांनी आणलेली; तीच मोदी आणत आहेत: प्रकाश आंबेडकर
“अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आडून मोदी सरकार कोणता घाट घालतंय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं
बारा तासांच्या मॅरेथॉन आणि वादळी चर्चेनंतर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ३११ विरुद्ध ८० मतांनी मंजूर झाले आहे. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेससह अनेक पक्षांनी या दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवला असून, ईशान्येकडील राज्यांमध्ये या विधेयकाविरोधात आंदोलने तीव्र झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
विधानसभेतल्या मोठया अपयशानंतर वंचित'मध्ये फूट; आनंदराज आंबेडकरांची सोडचिठ्ठी?
लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर केवळ वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या किती जागा पडल्या यावरच चर्चा रंगली होती. दरम्यान, विधानसभेच्यावेळी काँग्रेस-राष्ट्र्वादीने अनेक प्रस्ताव समोर ठेऊन देखील प्रकाश आंबेडकरांनी आघाडीत सामील न होता, केवळ अवास्तव मागण्या करून चर्चेत राहिले. वंचित बहुजन आघाडी इतिहास रचनार असं काहीसं चित्र उभं करण्यात आलं.
5 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडी पुढील विरोधीपक्ष असेल सांगणारे फडणवीस स्वतः विरोधी पक्षात बसणार
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
वंचित'मुळे आघाडीच्या ३२ जागा पडल्या; बाळासाहेब थोरातांची देखील टीका
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला बसला आहे. राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ३२ जागांवर वंचितमुळे काँग्रेस एनसीपीचे उमेदवार पडल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस-एनसीपीला अपेक्षित यश मिळाले असले तरी ३२ जागांवर काँग्रेस-एनसीपी उमेदवार अगदी थोड्या फरकाने पराभूत झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मागे जाणारे मतदारच नालायक: प्रकाश आंबेडकर
भारतीय जनता पक्षाच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
भाजपकडून वंचित पक्ष फोडण्यास सुरुवात; गोपीचंद पडळकर भाजपात जाणार
गोपीचंद पडळकर यांनी भाजप प्रवेश करण्याचा निर्णय़ घेतला असून येत्या दोन दिवसांत ते भाजपमध्ये जाणार आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाबद्दल विविध तर्क लढविण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना पडळकर काय करणार याबद्दल उत्सुकता होती. तो निर्णय़ त्यांनी आता घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून ते निवडणूक लढविणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका आम्हाला पटत नाही: प्रकाश आंबेडकर
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
एका EVM हॅकरने माझ्याशी संपर्क साधला आहे: प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कॉंग्रेससोबत युतीचे मार्ग बंद झाले अशी घोषणा केली. तसेच, त्यांनी शिवसेनेला एक सल्लादेखील दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ‘राहुल गांधी’ होऊ द्यायचा नसेल तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं युतीत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
अन्यथा आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल: प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी कॉंग्रेससोबत युतीचे मार्ग बंद झाले अशी घोषणा केली. तसेच, त्यांनी शिवसेनेला एक सल्लादेखील दिला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ‘राहुल गांधी’ होऊ द्यायचा नसेल तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं युतीत मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडू नये, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेससोबत आघाडी करणार नाही; विधानसभा स्वबळावर: प्रकाश आंबेडकर
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत युती करणार नाही. काँग्रेससोबत चर्चेची दारे आता बंद झाली आहेत,’ असं ‘वंचित’चे नेते ऍडव्होकेट. प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
एमआयएम-वंचितमध्ये फूट, एमआयएम विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये अखेर फूट पडली असून एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लिम मतं मिळत नसल्याने MIM'ला फक्त ८ जागा; वंचित आघाडी तुटणार? सविस्तर
लोकसभा निवडणुकीत आश्चर्यकारत मते मिळवित चर्चेत आलेल्या वंचित बहुजन आघाडीचं आगामी विधानसभा निवडणुकीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. एमआयएम आणि भारिप बहुजन आघाडी यांना लोकसभा निवडणुकीत लाखांच्या पुढे मतदान झालं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आणि बहुजन मतं विभागणीसाठी वक्तव्य? राज्याचं विरोधी पक्षनेते पद वंचित'कडे असेल: मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असं भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलं.
5 वर्षांपूर्वी -
काँग्रेसने आम्हाला १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावं: प्रकाश आंबेडकर
राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. वेगवेगळ्या पक्षाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज अकोल्यात ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषेद ते बोलताना म्हणाले, विधानसभा निवडणुकीत १४४ जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहूजन आघाडीने काँग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी वंचितने ऑगस्ट अखेरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे असे ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ईडीच्या ब्लॅकमेलिंगला राज ठाकरे बळी पडतील असं मला वाटत नाही: प्रकाश आंबेडकर
कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुखराज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाहीविरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
‘वंचित’कडून २८८ जागा लढण्यासाठी मोर्चेबांधणी; भाजप-सेना देखील स्वबळावर? सविस्तर
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेबांचे विचार संपविण्यासाठीच भाजप वंचितला चालवत आहेत: जोगेंद्र कवाडे
पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
कौतुकास्पद! प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं सांगलीतील 'ब्रह्मनाळ' गाव
कोल्हापूर आणि सांगलीच्या भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभारातून अनेक हात पुढे येत आहेत. या जिल्ह्यांतील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे. ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसलेले असताना बचावकार्यादरम्यान बोट पाण्यात उलटुन १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला त्यामुळे या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. ३५०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा