काय घाबरू नका, वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू असं वक्तव्य | आता प्रसाद लाड यांच्याकडून सारवासारव
भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेबद्दल केलेल्या विधानावरून आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष विरुद्ध शिवसेना असा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त वक्तव्यं प्रसाद लाड यांनी केल्याचं समोर आलं आहे. तर, त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजल्याचे दिसत आहे. आज भारतीय जनता पक्षाच्यावतीने माहीम विधानसभा कार्यलायच्या बाहेर पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी हे वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.
4 वर्षांपूर्वी