महत्वाच्या बातम्या
-
प्रथम फडणवीस सरकारनेच लावलेली मुंबै बँकेच्या गैरव्यवहाराची चौकशी | आता दरेकरांच्या ED-CBI वरून राष्ट्रवादीला धमक्या
मुंबै बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑडिट आणि बँकेतील प्रशासकीय कामकाजात अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबै बँकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
Mumbai Bank Under Investigation | मुंबै बँकेच्या गैरव्यवहाराच्या चौकशीचा अहवाल ३ महिन्यात सादर करा | सहकार विभागाचे आदेश
मुंबै बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. मुंबै बँकेच्या कारभाराबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सहकार विभागाने बँकेचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ऑडिट आणि बँकेतील प्रशासकीय कामकाजात अनियमितता आढळून आल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार बँकेचे कामकाज आणि आर्थिक स्थिती याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार विभागाने यासाठी जिल्हा उपनिबंधक प्रताप पाटील यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून सहकार कायद्याच्या कलम ८३ नुसार तीन महिन्यांत चौकशी अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश विभागीय सहनिबंधकांनी दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही | गाल सर्वांनाच रंगवता येतात - प्रवीण दरेकर
राष्ट्रवादी काँग्रेसला गरिबाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिरुरमध्ये केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यपाल 6 वर्षात कधीही या यादीवर निर्णय घेऊ शकतात | 6 वर्षात नेमका कधी ते राज्यपाल ठरवतील - दरेकर
विधानपरिषदेतील 12 नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतचा वाद कोर्टाने निकाली काढला आहे. “या जागा दीर्घकाळ रिकाम्या राहू शकत नाहीत. राज्यपालांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही गोष्टी विचारात घेतल्या आहेत. जर काही गोष्टी विशिष्ट कारणांसाठी होत असतील तर त्याची कारणीमिमांसा होणं गरजेचं आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं.
3 वर्षांपूर्वी -
मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरण | सर्व शाखांचे ऑडिट होणार | दरेकरांच्या अडचणीत वाढ
मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्द्यांवरुन महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवण्यात आघाडीवर असलेले भाजप आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर आरोप असलेल्या मुंबै बँक गैरव्यवहार प्रकरणाची आता खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाने मुंबै बँकेतील विविध शाखांचे सविस्तर लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण | आधी महापालिकेत ठराव करा - प्रवीण दरेकर
औरंगाबादचं शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामधील राजकारण सध्या तापलं आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसनं नामांतराला विरोध केल्यानं त्यात भर पडली असून शिवसेना व भारतीय जनता पक्षामध्ये वाकयुद्ध रंगलं आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला प्रशासकीय प्रक्रिया समजावून सांगितली आहे. एखादी गोष्ट जमत नसली की शिवसेना पळवाट काढते,’ असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला आहे आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई बँक गैरव्यवहाराच्या चौकशीला गती येण्याची शक्यता | भाजपच्या अडचणीत वाढ होणार?
मुंबई बँकेतील (Mumbai Bank Scam) गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश सहकार विभागाने सप्टेंबरमध्ये दिले होते. त्यामुळे मुंबई बँकेचे अध्यक्ष असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. भाजप सरकार गेल्यानंतर मुंबई बँकेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे. सहकार आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले यापूर्वीच दिले आहेत. तसेच चौकशीसाठी सहकार विभागातील ३ अधिकार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. मात्र आता या चौकशीला गती येण्याची माहित सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत प्रचंड वाढ होऊ शकते असं म्हटलं जातं आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या संवादात अनेक प्रश्न अनुत्तरित | प्रवीण दरेकरांची टीका
दरम्यान, मुंबई मेट्रोची ३ आरे कारशेडची जागा कांजूरमार्गला स्थलांतरित करण्यावरून विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहेत. या सर्वांची उत्तरं आमच्याकडे आहे. त्यांना योग्य वेळी आम्ही समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मीठागरांची जमीन आहे असं सांगून विकास कामांच्या प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतलं आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर विरोधी पक्ष नेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
खरं तर दरेकरांनी खडसेंच्या पाया पडायला पाहिजे होते | मुश्रीफ यांचं टीकास्त्र
नेते ज्येष्ठ एकनाथ खडसे यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा दिला आहे. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या पक्षांतराबाबच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न | प्रवीण दरेकरांचा सरकारवर आरोप
मुंबई बॅंक तोटा प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिल्यानंतर आता भाजप नेते आणि मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. सरकारचा अहंकार यात जागा झालाय. यामध्ये शासन देणेकरी असल्याचे दरेकर म्हणाले. काही कमी जास्त गोष्टी असतील ते सहकार खात सांगत असतं. सहा मुद्द्यांची तपासणी लावली आहे हे खर असल्याचं ते म्हणाले. अनेक मुद्दे घेऊन मी विरोधी पक्षनेता म्ह्णून समोर येतोय. प्रश्न मांडतोय म्हणून पडद्याआडून माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न आहे. मी घाबरत नाही असे दरेकर म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस - शरद पवार सुद्धा राज्यभर फिरत आहेत | मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुर्बानीनं कोरोना जाणार म्हणजे...प्रविण दरेकरांचा पवारांना टोला
सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांना संताजी-धनाजीसारखे सर्वत्र फडणवीसच दिसतात - प्रवीण दरेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आणली. त्यामुळे सरकारची असुया आता दिसत असल्याचं, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले? - दरेकर
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर होते.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, ब्रोकरेजचा महत्वाचा सल्ला - NSE: TATAMOTORS