महत्वाच्या बातम्या
-
UP Assembly Election 2022 | उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस 40% महिलांना तिकीट देणार - प्रियंका गांधी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनौमध्ये सुमारे अर्ध्या लोकसंख्येची म्हणजे महिलांची मोठी घोषणा केली. प्रियंका गांधी म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष महिला उमेदवारांना 40 टक्के तिकिटे (UP Assembly Election 2022) देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले.
3 वर्षांपूर्वी -
Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally | मोदींच्या मतदारसंघात प्रियांका गांधींच्या रॅलीला तुफान गर्दी
यूपी काँग्रेसने 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून औपचारिकरीत्या आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. प्रियांका गांधींनी प्रथम वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिर आणि दुर्गा मंदिरात पूजा केली. यानंतर एका सभेला संबोधित केले. या सभेचे नाव आधी ‘प्रतिज्ञा रॅली’ असे होते, आता त्याचे ‘किसान न्याय रॅली’ असे नामकरण करण्यात आले आहे. मोदींच्या मतदारसंघात प्रियांका गांधींच्या रॅलीला तुफान गर्दी (Priyanka Gandhi at UP Kisan Nyay Rally) झाल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | अन्नदात्याला चिरडणाऱ्याला अटक केव्हा? | प्रियांका गांधी-वाड्रा यांचा पंतप्रधानांना प्रश्न
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज म्हणजेच मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक प्रश्न विचारला आहे. पोस्टमध्ये शेतकऱ्यांना जीपने चिरडल्याचा कथित व्हिडिओ देखील आहे. प्रियांका म्हणाल्या, ‘तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेशाशिवाय आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून कोठडीत ठेवले आहे. अन्नदात्याला चिरडणाऱ्या व्यक्तीला (Lakhimpur Kheri Incident) अद्याप अटक का करण्यात आलेली नाही?
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | भाजप सरकारने प्रियांका गांधींना अस्वच्छ गेस्ट हाऊसमध्ये ठेवले | स्वतःच केली साफसफाई
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गाधी या लखीमपूरकडे (Lakhimpur Kheri Violence) निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. त्यांना सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रियंका गांधी यांनीही या गेस्ट हाऊसमध्ये गांधीगिरी करत गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई केली आहे. हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करतानाच प्रियंका यांचा फोटोही व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
प्रियंका गांधी विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत | त्याऐवजी काँग्रेससाठी अधिक प्रचार व रोड-शोवर भर देणार
पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता विविध अंदाज लावणे सुरू झाले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वाड्रा अमेठी किंवा उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा होती, परंतु काँग्रेसच्या उच्च सूत्रांनुसार ही बातमी ‘चुकीची’ आहे असं प्रसार माध्यमांना सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘प्रियंका गांधी कुठूनही निवडणूक लढवणार नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही चर्चा खरी ठरणार असल्याची वृत्त आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार पद सोडलं असून या पदाचा अधिकृत राजीनामा दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
लोकं रेमडेसिवीरसाठी वणवण भटकत आहेत | अन भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
4 वर्षांपूर्वी -
अरे देवा! त्यांचे गुडघे दिसत आहेत | फाटक्या जीन्सबद्दलच्या वक्तव्यावरुन प्रियांका गांधीच ट्विट
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात असतानाच काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही या वादामध्ये उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट करत यांचेही गुडघे दिसत आहेत असा टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंदोलक शेतकऱ्यांनाही भाजप नेते आणि समर्थक देशद्रोही म्हणतात | यापेक्षा मोठं पाप नाही
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सरकारने चर्चेचा आग्रह धरला आहे. शेतकऱ्यांना पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार कमी अधिक करता येईल, पण आधी चर्चेची तारीख कळवा, अशी भूमिका केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी घेतली. त्यावर, आम्ही फेटाळलेल्या दुरुस्त्या सोडून सरकारने नवा प्रस्ताव पाठवावा आणि आम्ही चर्चेस तयार आहोत, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Hathras Gangrape | योगी पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? - प्रियांका गांधी
हाथरस सामूहिक बलात्कार आणि पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून देण्यात आलेली वागणूक समोर आल्यानंतर जनतेचा आक्रोश बाहेर पडताना दिसतोय. त्यामुळे हाथरस शहरात तणावाचं वातावरण दिसून येतंय. दुसरीकडे या घटनेनंतर विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निशाण्यावर घेतलंय. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी योगी आदित्यनाथ १५ दिवस पंतप्रधानांच्या फोनची वाट पाहत होते का? असा सवाल काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी विचारलाय.
4 वर्षांपूर्वी -
गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि गेन्हेगारांना संरक्षण देणाऱ्यांचे काय? - प्रियांका गांधी
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे याला ठार करण्यात आले आहे. गुरुवारी त्याला मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर एसटीएफचे पथक त्याला घेऊन कानपूरला जात असताना वाहनात त्याने पोलिसांचे शस्त्र हिसकावण्याचा प्रयत्न केले, या झटापटीत ते वाहन पलटले. या अपघाताचा फायदा घेत विकास दुबेने पोलिसांचे शस्त्र घेऊन पळण्याचा प्रयत्न केला, यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र त्याच्या गोळीबाराला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. १५ मिनिटे चाललेल्या या चकमकीत दुबेच्या छाती आणि डोक्यावर गोळ्या लागून तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले मात्र थोड्या वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या चकमकीत ४ पोलिसही जखमी झाल्याचे समजते आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या मतदारसंघातील लोकांची भीषण स्थिती मांडताच बंगला खाली करण्याची नोटीस? - सविस्तर वृत्त
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांना सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी त्यांना १ महिन्याची मुदत देण्यात आली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. एसपीजी सुरक्षा नसल्यामुळे प्रियंका गांधी वाड्रा यांना हा बंगला खाली करावा लागणार आहे. मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग एँड अर्बन अफेयर्सने ही नोटीस दिली आहे. 6-बी हाऊस नंबर- 35 लोधी एस्टेटमध्ये प्रियंका गांधी या त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. जवळपास २० वर्षापासून त्या याच निवासस्थानी राहत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
#CAA : योगी सरकार आणि पोलिस यंत्रणा सूडबुद्धीने काम करत आहेत: प्रियंका गांधी
उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान राज्य सरकार, प्रशासन आणि पोलिसांकडून अराजकता पसरवण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहितीचे १४ पानांचे एक पत्रही त्यांनी उत्तर प्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्याकडे भेट घेऊन सुपूर्द केले. आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत प्रियंका गांधी यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली.
5 वर्षांपूर्वी -
नोटबंदीला ३ वर्ष पूर्ण; अर्थव्यवस्थेच्या संकटावरून प्रियांका गांधींचा मोदींवर निशाणा
नोटाबंदी ही देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारी एक ‘आपत्ती’ असल्याचे सिद्ध करत काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा यांनी शुक्रवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. नोव्हेंबर २०१९ मध्ये नोटाबंदीला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रियंकाने मोदी सरकारवर हल्ला केला.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी किती दिवस हेडलाईन मॅनेजमेंट करणार; लोकांना अर्थव्यवस्थेचं वास्तव सांगा: प्रियांका गांधी
अर्थव्यवस्थेतील मांडीवरून सध्या देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. त्यात रोज नवनवीन कंपन्या बंद पडत असून अनेकांना रोजगार गमावण्याची वेळ आली आहे. आर्थिक मंदीचा सर्वात मोठा फटका हा ऑटो आणि टेक्सटाईल उद्योगाला बसला आहे. देशभरात याची अजून तीव्र झळ बसलेली नसताना इतकी दयनीय अवस्था झाली असताना पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा अंदाज येऊ लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
मोदींच्या गुजरातमध्ये काँग्रेसच्या सभेला मोठा जनसागर लोटला
6 वर्षांपूर्वी -
लखनऊ रॅलीनंतर राहुल गांधीनी दिला चौकीदार चोर चा नारा
लखनऊ रॅलीनंतर राहुल गांधीनी दिला चौकीदार चोर चा नारा
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन