Property Sale Tax | आज किंवा उद्या जुने घर विकून नवीन खरेदी केल्यास टॅक्स मधून सुटका हवी असल्यास हे लक्षात ठेवा
Property Sale Tax| घर खरेदी विक्रीबाबत आयकराचे नियम : घराची विक्री आणि खरेदी हा पैशाचा एक मोठा व्यवहार आहे. आणि यामध्ये तुमच्या उत्पन्नावर परिणाम होतो. या व्यवहाराचा परिणाम तुमचा टॅक्स ब्रॅकेटवर होऊ शकतो, किंवा त्यात वाढ होऊ शकते. सर्व प्रथम, वारसा मिळालेल्या मालमत्तेच्या व्यवहाराबद्दल माहिती घेऊ. जेव्हा तुम्ही वारसा हक्काने एखादी मालमत्ता घेता, तेव्हा ती घेताना तुम्हाला कोणताही कर भराव लागत नाही, आणि त्यावर आयकराचा कोणताही नियम लागू होत नाही. तथापि, भारतातील काही राज्यात सरकार अशा वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तांच्या कागदपत्रांसाठी शुल्क घेते. पण त्याचा आयकराशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. अशी वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता आयकराच्या कक्षे बाहेर आहे.
2 वर्षांपूर्वी