महत्वाच्या बातम्या
-
इस्रोकडून GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; इंटरनेट स्पीड वाढणार
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जीसॅट-३० (GSAT-30) या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आज पहाटे २ वाजून ३५ मिनिटांनी दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून उपग्रहाचे यशस्वी प्रेक्षेपण करण्यात आले. GSAT-30 या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात नवी क्रांत्री होणार आहे. या नव्या आणि आधुनिक उपग्रहामुळे इंटरनेट आधिक गतीने चालणार आहे. त्याशिवाय जलवायूमध्ये होणारे बदल आणि हवामानाचं भाकितही वर्तवण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-३ साठी केंद्र सरकारची परवानगी; २०२० मध्ये ‘गगन’भरारी
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के. सिवन यांनी नवी लक्ष्य आणि योजनांची माहिती देत नव्या वर्षाचे स्वागत केले आहे. या वेळी सिवन यांनी ‘गगनयान’ आणि ‘चांद्रयान-३’ या मोहिमांची माहिती दिली. अंतराळ विज्ञानाद्वारे देशातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सिवन यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षातच या दोन मोहिमांची तयारी करण्यात आल्याचेही सिवन म्हणाले. मोहिमेसाठी एकूण ६०० कोटी रुपये इतका खर्च येणार असल्याची माहितीही के. सिवन यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
PSLV ची हाफ सेंच्युरी, RISAT-2BR1 अवकाशात प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आज आणखी एक मोठी यशस्वी कामगिरी केलीय. श्रीहरी कोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून आज रिसॅट-२ बीआर १ (RISAT-2BR1) या उग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं. PSLV-C48 या प्रक्षेपक वाहनाद्वारे हे यान अवकाशात यशस्वीपणे झेपावलं. यातली खास बाब ही होती की PSLV या प्रक्षेपक वाहकाचं हे ५०वं उड्डाण होतं. PSLV हे भारताचं विश्वसनीय प्रक्षेपक वाहन आहे. याच वाहनाने याआधी अनेक उपग्रह अवकाशात झेपावले होते. अवकाशातून पृथ्विवरचे फोटो घेण्याचं अचूक तंत्रज्ञान या उपग्रहामध्ये आहे. अतिशय स्पष्ट आणि उत्तम दर्जाचे फोटो या उपग्रहामधून घेतात येतात. त्यामुळे हेरगिरीसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
'इस्रो'ची अवकाशात भरारी, 'कार्टोसॅट-३' अवकाशात झेपावलं
भारतीय अंतराळ संशोधन केंद्रातून नवनवे विक्रम प्रस्तापित केले जात आहेत आणि त्यात अनेक विक्रमांची भर पडत आहे. इस्त्रोने (ISRO) इतिहास रचला असून १६२५ किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं आहे. पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आलं. ‘कार्टोसॅट-३’ उपग्रहासह अमेरिकेतील १३ व्यावसायिक लघु उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा (Shriharikota Satish Dhawan Center) येथील सतिश धवन स्पेस सेंटर लॉन्च पॅडहून हे प्रक्षेपण करण्यात आलं. पृथ्वीची छायाचित्रं काढण्यासाठी, तसंच नकाश निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-३’ उपग्रह उपयुक्त ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२ मोहीम: इस्रो शास्त्रज्ञांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा; पुन्हा जोरदार प्रयत्न करावे
चंद्रापासून अवघे २.१ किमीच्या अंतरावर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि भारताच्या चांद्रयान- २ मोहिमेला धक्का बसला. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षणाचे साक्षीदार होत सर्व शास्त्रज्ञांना धीर दिला. यानंतर पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करत आहेत होते.
5 वर्षांपूर्वी -
'इस्रो'चे अध्यक्ष के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले चांद्रयान-2 मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ‘इस्रो’चे अध्यक्ष के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला आहे. तामिळनाडू सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानासाठी सिवन यांचा गौरव केला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेचं सिवन नेतृत्व करत आहेत. इस्रोचं अध्यक्षपद सांभाळणाऱ्या सिवन यांची कहाणी ही संघर्षमय आहे.
5 वर्षांपूर्वी -
इस्रोला चंद्रयान-२ परिपूर्ण करण्यासाठी वैदिक गणिताने केली मदत.
भारताचे दुसरे चंद्र मिशन म्हणजेच चंद्रयान-२ अब्ज स्वप्नांना अंतराळात घेऊन पोचले खरे पण या मागे शास्त्रज्ञांसोबतच कित्येक गोष्टींचा हातभार लागला होता. भारत आता चंद्रावर उतरलेला चौथा देश आहे. आणि दक्षिण ध्रुवाकडे पोचलेला पहिला देश आहे. नुकतीच पृथ्वीची काही छायाचित्रे चंद्रयान-२ कडून भारतात पाठवण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
मिशन चांद्रयान २: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; वैज्ञानिकांची 'उत्तुंग' भरारी
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार होते.
6 वर्षांपूर्वी -
आज दुपारी प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज
भारताची चांद्रयान-१ ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ‘चांद्रयान-२’ या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात (इस्रो) सज्ज झाली आहे. ‘चांद्रयान-२’ मोहिमेवर जाणाऱ्या ‘जीएसएलव्ही-मार्क-३’ या शक्तिशाली रॉकेटचे सोमवारी दुपारी २.४३ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण व्हायचे आहे.
6 वर्षांपूर्वी -
तांत्रिक अडचणींमुळे चांद्रयान-२ चं प्रक्षेपण रद्द, लवकरच नवीन वेळ जाहीर करणार
भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चं प्रक्षेपण काही तांत्रिक कारणामुळे थांबवण्याचा निर्णय इस्रो’ने घेतला आहे. ‘इस्रो’या संदर्भातली अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. पूर्वनियोजित योजनेप्रमाणे आज मध्यरात्री २ वाजून ५१ मिनीटांनी भारताचं हे यान अवकाशात झेपावणार होतं. परंतु ऐनवेळी आलेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे हे प्रक्षेपण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख इस्रो लवकरच अधिकृतपणे जाहीर करणार आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून हे चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं.
6 वर्षांपूर्वी -
चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार, काउंटडाऊन सुरू
भारताच्या स्पेस मिशनमधील नव्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. भारताच्या महत्वाकांक्षी मिशन चांद्रयान-२ मोहीमेला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार आहे. लौंचिंग नंतर ५२ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. इस्रोच्या या महत्त्वकांशी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
आज सकाळी पहाटे ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या उड्डाणाची पंचवीस तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली होती. दरम्यान सदर उपग्रह सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा आहे. पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर १५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला गेला.
6 वर्षांपूर्वी -
३१ उपग्रह अंतराळात झेपावले आणि इस्रोचं शतक पूर्ण !
इस्रो च्या पीएसएलव्ही सी ४० सोबत तब्बल ३१ उपग्रह अंतराळात यशस्वी रित्या झेपावली. त्याबरोबरच इस्रोने उपग्रह अंतराळात सोडण्याचं शतक ही पूर्ण केला.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL