Pune Rain | भाजपाची सत्ता असलेल्या पुण्यात पावसामुळे रस्त्यांचे कालवे, तर घरं, इस्पितळ आणि मंदिरातही शिरलं पाणी
Pune Rain | परतीचा पाऊस राज्यभरात बसरत आहे. पुण्यातही पावसाने चांगलीच बॅटिंग केली. सोमवारी शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी बसरल्या. शहरामध्ये तर रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी शिरले. साडे नऊ वाजेच्या सुमारास धुव्वादार पाऊस सुरु झाला होता. यामुळे रस्त्यांनाही नद्यांचे स्वरुप आल्याचे पाहायला मिळाले. कोंढवा, येवलेवाडी, वानवडी, हडसपर भागांतील तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे रात्री मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागला.
2 वर्षांपूर्वी