महत्वाच्या बातम्या
-
मग कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीला केलेल्या वाईट कामागिरीसाठी तुम्ही केंद्र सरकारला देशविरोधी म्हणणार का? - रघुराम राजन
भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’वर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’मधून करण्यात आलेल्या टीकेसंदर्भात राजन बोलत होते. ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाबत मोदी सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला, रघुराम राजन यांनी सुनावले
देशात कोरोना महामारीची लाट येऊन १५ महिने उलटले आहे. दरम्यान, देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि अत्यावश्यक औषधांचा तुटवडा भासत आहे. विशेष म्हणजे भारतात १५ महिन्यांच्या कोरोनाकाळात एकूण रुग्णांची संख्या २.०२ कोटी झाली आहे. यापैकी १.६६ कोटी कोरोनामुक्त झाले आहेत. ३५ लाखांवर उपचार सुरू आहेत. २.२२ लाख लोकांचा मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
सरकारी बँका खासगी उद्योगसमूहांना विकणे ही मोठी चूक ठरेल | रघुराम राजन यांचं भाकीत
भारताची अर्थव्यवस्था सध्या करोनाच्या अवकळेतून बाहेर पडण्याच्या स्थितीत असताना पतधोरण व्यवस्थेच्या चौकटीत धोकादायक बदल केल्यास रोखे बाजारात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक बँका खासगी उद्योगसमूहांना विकणे ही मोठी चूक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. चालू पतधोरण व्यवस्थेत चलनवाढ रोखून आर्थिक वाढ साकार करण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
सोशल मीडिया, फेक न्यूजमार्फत बेरोजगारांचे लक्ष काही काळासाठी इतरत्र वळवता येईल पण...
एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने आयोजित वेबिनारमध्ये रघुराम राजन यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. देशातील बेरोजगारीचे वाढते प्रमाण आणि तरुणांच्या आयुष्यावर होणाऱ्या दूरगामी परिणामांवर त्यांनी सखोल भाष्य यावेळी केलं. आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत आयातीपेक्षा निर्यातीवर भर देण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दलही राजन यांनी इशारा दिला. निर्यातीला प्राधान्य देण्याचे प्रयत्न यापूर्वीही देशात झाले असून ते आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत, याकडेही राजन यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनावर नियंत्रण येईपर्यंत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल | मुलांवर काम किंवा भीक मागण्याची वेळ येईल
देशाचा GDP उणे २३.९ टक्क्यांपर्यंत घसरल्यानं चिंता वाढली आहे. त्यातच आता रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी वाईट होईल, असा धोक्याचा इशारा दिला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला अमेरिका आणि इटलीपेक्षा अधिक फटका बसेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं आहे. कोरोनामुळे या दोन्ही देशांना खूप मोठा फटका बसला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग स्टॉक फोकसमध्ये, वेदांता शेअर टार्गेट प्राईस जाणून घ्या, मल्टिबॅगर आहे स्टॉक - NSE: VEDL
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL
-
Jio Finance Share Price | शेअर्स रेटिंग अपडेट; जिओ फायनान्शिअ शेअर ठरेल फायद्याचा, सकारात्मक अपडेट - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | यापूर्वी दिला 398 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, आयआरएफसी शेअर्सबाबत सकारात्मक संकेत - NSE: IRFC
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA