महत्वाच्या बातम्या
-
जेवढी ओबीसींची लोकसंख्या तेवढा त्यांना हक्क, जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर करून आत्ताच महिलांना आरक्षण द्या, 10 वर्षांनी नव्हे
OBC Quota in Women’s Reservation Bill 2010 | संसदेच्या दोन्ही सभागृहात जवळपास एकमताने मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकामुळे जातीय जनगणना आणि इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक मंजूर करण्यात पूर्ण सहकार्य करणाऱ्या काँग्रेसने आता या मुद्द्यांवर मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. सरकारी यंत्रणेतील ओबीसी अधिकाऱ्यांचा सहभाग, जातीय जनगणना आणि महिला आरक्षणातील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
1 वर्षांपूर्वी -
देशाच्या पायाभूत प्रकल्पापासून ते संरक्षण क्षेत्रात अदानी ग्रुप, मग त्याच कंपनीत चीनमधली व्यक्ती पैसा का गुंतवतेय? - राहुल गांधी
Rahul Gandhi | संघटित गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अहवाल प्रोजेक्टच्या वतीने अदानी समूहावर नव्याने आरोप केल्याबद्दल काँग्रेसने गुरुवारी मोदी सरकारवर हल्ला बोल केला. पत्रकार परिषदेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका करत अदानी समूहावर नवे आरोप केले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
एक राज्य 3 महिने जळतंय, महिला-मुलांना ठार केलं जातंय, यावर संसदेत देशाचे पंतप्रधान 2 तास हसत-विनोद करत कसे भाषण करू शकतात? - राहुल गांधी
Rahul Gandhi | एनडीए सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेल्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, मणिपूर अनेक महिन्यांपासून जळत असताना संसदेत हसणे मला शोभत नाही. मणिपूरमधील परिस्थितीवर संसदेत अविश्वास ठरावाचा निकाल पार पडल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, पंतप्रधानांनी लोकसभेत दोन तासांहून अधिक काळ केलेल्या भाषणात मणिपूरवर केवळ दोन मिनिटे भाषण केले आणि या भाषणात ते हसत-विनोद करत बोलत होते हे क्लेशदायक आहे असं त्यांनी म्हटलं.
1 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान मोदी खर्चिक इव्हेन्ट मार्केटिंगमधून लोकांमध्ये, तर राहुल गांधी थेट शेतात शेतकऱ्यांसोबत पेरणीला, नेटिझन्सकडून कौतुक
Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी दिल्लीहून शिमलाला रवाना झाले. त्यादरम्यान ते हरियाणातील सोनीपत येथे अचानक शेतकऱ्यांसोबत शेतात गेले. राहुल गांधी यांनी सर्वप्रथम मदिना येथील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत भाताची पेरणी सुद्धा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भल्या पहाटे ही घटना घडताच स्थानिक वृत्तवाहिन्यांची आणि शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी जमा होऊ लागली होती.
1 वर्षांपूर्वी -
Video | बापरे! तेलंगणातही राहुल गांधींची लाट येणार, KCR यांची सत्ता धोक्यात, पहिल्याच सभेला अतिविराट रूप, लाखोंच्या संख्येने अलोट गर्दी
Rahul Gandhi Rally in Telangana | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यंत्रेणे संपूर्ण देशात काँग्रेससाठी राजकीय वातावरण बदललं आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक राज्यात काँग्रेसने मोठ्या बहुमताने भाजपकडून सत्ता खेचून घेतली आहे. तसेच आगामी तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता येण्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचाच पहिला प्रत्यय आजच्या तेलंगणातील राहुल गांधी यांच्या अतिविराट सभेत पाहायला मिळाला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Big Breaking | 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असतील, ही निवडणूक अनेकांना आश्चर्यचकित करेल - राहुल गांधी
Big Breaking | काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी म्हणतात की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असतील. ‘विरोधक एकवटले असून पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही भाजपला सत्तेतून हाकलून लावू,’ असे दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते म्हणाले.
1 वर्षांपूर्वी -
माझा फोनही टॅप केला जातो, सरकार या पातळीला जाईल याची कल्पनाही नव्हती - राहुल गांधी
Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी दहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात एका कार्यक्रमाला संबोधित केले आणि टेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची ही भेट घेतली. यावेळी त्याने पुन्हा एकदा माझी हेरगिरी केली जाते आणि माझा फोनही टॅप केला जातो, असा आरोप केला.
1 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या विरोधासाठी भाजप IT सेलच्या प्रमुखाकडून खलिस्तानीचं समर्थन, अमेरिकेत 'नफरत छोड़ो भारत जोड़ों' आवाज घुमला
Brand Rahul Gandhi | आगामी सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांच्या ऐक्याचे महत्त्व अधोरेखित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत अनिवासी भारतीयांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना म्हटले की, विरोधक योग्य प्रकारे संघटित झाले तर केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला पराभूत केले जाऊ शकते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा उल्लेख करताना राहुल गांधी म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आमचा पक्ष या संदर्भात काम करत आहे आणि योग्य दिशेने वाटचाल करत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Rahul Gandhi | संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी केले पाहिजे - राहुल गांधी
Rahul Gandhi | वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देशाची नवी संसद भवन सुरू होणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नुकतीच त्यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या उद्घाटनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी केले पाहिजे.
2 वर्षांपूर्वी -
Brand Rahul Gandhi | मोदींना 10 वर्षात जमलं नाही! पण 'राहुल है तो ही मुमकिन है!' कर्नाटकला दिलेली आश्वासने पुढील 1-2 तासात पूर्ण होणार
Brand Rahul Gandhi | एकाबाजूला मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी अनेक आश्वासनं देऊन सत्तेत आलं आहे. त्यात महागाई कमी करणे, प्रति वर्ष २ कोटी लोकांना रोजगार देणे आणि भ्रष्टाचार कमी करणे असे आणि इतर अनेक वचन जनतेला दिली होती. मात्र मोदी पंतप्रधान पदी सलग १० वर्ष विराजमान होऊनही जनतेसाठी परिस्थिती अजून कठीण झाल्याचं पाहायला मिळतंय.
2 वर्षांपूर्वी -
Rahul Gandhi | देशासमोर सत्य मांडणाऱ्या राहुल गांधींची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची सुपरसॉनिक वेगात कारवाई
Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने मानहानीच्या खटल्यात दोषी ठरविल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला तुफान प्रतिसाद, बिथरलेल्या भाजपचं महागाई-बेरोजगारीपेक्षा गंभीर मुद्दावर ट्विट, राहुल गांधींचं टी-शर्ट किती रुपयांचं?
Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे ते आता सर्व भारतभर यात्रा घेऊन पोहोचणार असल्याने काँगेसमध्ये जोश आल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे या यात्रेत राहुल गांधी यांनी सामान्य लोकांशी संबंधित महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर भर दिला असून त्यात ते सर्वत्र पत्रकार परिषद आणि थेट लोकांना संबोधित करत आहेत. परिणामी भाजपाला नेमकं काय करावं हे उमगतं नसल्याने त्यांनी राहुल गांधीच्या टीशर्टचा मुद्दा आणि त्याची किंमत यावरून ट्विट केल्याने भाजपाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. तुमच्यासाठी हाच राष्ट्रीय मुद्दा उरला आहे का? आणि दुसऱ्यांच्या कपड्यांवर लक्ष देण्यापेक्षा देशातील बेरोजगारी आणि महागाईवर लक्ष द्या असं अनेकांनी भाजपाला सुनावलं आहे.
2 वर्षांपूर्वी -
विरोधकांना संसदेत बोलू दिलं जातं नाही, प्रसार माध्यमं मोदींसाठी काम करतात, जनतेला वास्तव समजेल तरी कसं? - राहुल गांधीचा थेट हल्ला
Congress Rally in Ramlila Maidan | दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते भाववाढीवरून आंदोलन करत आहेत. या दरम्यान काँग्रेस एका रॅलीचंही आयोजन करत असून त्याला राहुल गांधी यांनी संबोधित केलं आहे. यावेळी अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खर्गे, सचिन पायलट, कमलनाथ, आराधना मिश्रा, कुमारी शैलजा, भूपेश बघेल असे अनेक बडे नेते उपस्थित होते.
2 वर्षांपूर्वी -
VIDEO | राहुल म्हणालेले, माझे शब्द लिहून ठेवा, केंद्राला शेतीविरोधी कायदे मागे घ्यावेच लागतील
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालंं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची अखेर केंद्र सरकारने दखल घेतली आहे. तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा (Rahul Gandhi on repeal 3 Union Agriculture Acts) पंतप्रधान मोदी यांनी आज केली.
3 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Incident | माध्यमच नाही, तर देशाला नियंत्रित करत आहेत भाजप, RSS | देशात हुकूमशाही
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आज लखीमपुर खीरी येथे जाण्याची शक्यता आहे. रविवार येथे शेतकरी आंदोलनात भाजप मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडले. त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला. यानंतर देशभरात संतापाचे वातवरण आहे. दरम्यान, यातील मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आज राहुल गांधी लखीमपुरला जातील अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, लखीमपुरला (Lakhimpur Kheri Incident) येण्यासाठी गांधी यांना उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने बंदी घातली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींना काँग्रेसचे पुन्हा अध्यक्ष बनविण्याच्या हालचाली | युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव मंजूर
काँग्रेसचे वायनाडचे खासदार आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना पुन्हा एकदा काँग्रेसच्या अध्यक्षपदी स्थापित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. युवक काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यासंबंधीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर गेली सव्वा दोन वर्षे सोनिया गांधी याच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपचे उत्पन्न 50 टक्क्यांनी म्हणजे 3,623.28 कोटीने वाढले, पण तुमचे? | राहुल गांधींचा सामान्यांना प्रश्न
भाजपच्या वाढलेल्या संपत्तीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी भाजपवर शनिवारी जोरदार टीका केली आहे. भाजपची संपत्ती 50 टक्क्यांनी वाढली आहे, तुमची किती? असे ट्विट करत राहुल यांनी भाजपवर निशाणा साधला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार 2019-20 मध्ये भाजपच्या संपत्तीत 3,623.28 कोटी रुपयांनी वाढली आहे.
3 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींवर राजकीय हल्ल्यांसोबत डिजिटल हल्ले सुरु? | आता इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाईची मागणी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींच्या ट्विटरवर कारवाईची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) आता गांधींच्या इन्स्टाग्राम अकाउंटकडे मोर्चा वळविला आहे. एनसीपीसीआरने राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याने ही कारवाई करावी, असे एनसीपीसीआरने फेसबुकला पत्र लिहिले आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक २०२२ | डिसेंबरमध्ये राहुल गांधी यांची शिवतीर्थावर सभा
काँग्रेस पक्षाची सभा डिसेंबरला शिवाजी पार्क मध्ये होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचं मिशन मुंबई सुरु होत आहे. डिंसेबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे येत्या 28 डिसेंबरला कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच राहुल गांधी शिवतीर्थावर म्हणजेच, शिवाजी पार्कवर सभा घेणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या आक्षेपानंतर ट्विटरची कारवाई | राहुल गांधींचे दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील ट्विट हटवले
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली कँट बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचे फोटो शेअर केल्याप्रकरणी ट्विटरने कारवाई केली. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख समोर येत असल्याने ट्विटरने हे फोटो हटवले आहे. राहुल गांधी यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC