Rahul Gandhi Defamation Case | शिक्षेला स्थगिती देण्याच्या राहुल गांधींच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात 21 जुलै रोजी सुनावणी होणार
Rahul Gandhi Defamation Case | ‘मोदी आडनाव’ मानहानी प्रकरणी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जुलै रोजी ठेवली आहे. गुजरात कोर्टाच्या या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या प्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीचा खटला सुरूच ठेवला. ही शिक्षा रद्द करून दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली होती.
2 वर्षांपूर्वी