महत्वाच्या बातम्या
-
ब्रेकिंग न्यूज: पर्रिकर म्हणाले, अनिल अंबानींच्या फायद्यासाठी मोदींनी ‘खेळ’ केला: राहुल गांधी
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल डील प्रकरणावरुन धक्कादायक दावा केला आहे. राफेल करारात मनोहर पर्रिकरांचा कोणताही सहभाग नव्हता असे त्यांनीच मला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच केवळ उद्योगपती अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी हा संपूर्ण खेळ रचल्याचे सुद्धा मला पर्रिकरांनी सांगितल्याचा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींनी शेतकऱ्यांना फसवून केवळ मित्रांचे उत्पन्न वाढवले: राहुल गांधी
पंतप्रधान मोदींनी केवळ स्वतःच्या जवळच्या १५ मित्रांना कमाल उत्पन्न वाढण्याची गॅरंटी दिली असून शेतकऱ्यांना मात्र पूर्णपणे फसविले आहे. तुम्ही केवळ अनिल अंबानी असाल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. तर या उलट आमचा काँग्रेस पक्षाने किमान उत्पन्न योजना आणली असून ही योजना सर्व सामान्य देशवासियांसाठी लागू होईल, अशी टीका करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष केले.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींनी घेतली पर्रिकरांची सदीच्छा भेट, केली तब्येतीची विचारपूस
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दुपारी गोव्याचे मुख्यमंत्री आणि पूर्व संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची सदीच्छा भेट घेतली. राहुल गांधी हे सध्या त्यांच्या कुटुंबियांसोबत गोव्यामध्ये सुट्यांसाठी आले आहेत. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही भेट अनौपचारिक स्वरुपाची होती, अशी माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी केवळ मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्याच्या हेतूने सदर भेट घेतल्याचे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO : दुबई विमानतळावर 'राहुल-राहुल-राहुल' नावाच्या जोरदार घोषणा
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या २ दिवसांच्या यूएई अर्थात दुबईच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, दुबईतमधील विमानतळावर मोठ्या उत्साहात राहुल गांधी यांचे जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विमानतळावर मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता जो मोठं मोठयाने ‘राहुल-राहुल’ अशी घोषणाबाजी करत होता.
6 वर्षांपूर्वी -
'मोदीजी, भारताच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरापासून सुरू होतो': राहुल गांधींचा बोचरा प्रश्न
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आरोप करताना काँग्रेसवाले महिलांचा अपमान करतात अशी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदींना प्रश्न विचारून त्यांना चांगलच कोंडीत पकडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील आघाडीसाठी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आघाडी करण्यावरून बोलणी अंतिम टप्यात आहेत. एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवरील वाटप निश्चित झाले आहे. दरम्यान उर्वरित ८ जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि त्याअनुषंगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली.
6 वर्षांपूर्वी -
राफेल घोटाळ्यात मोदींना कोणीही वाचवू शकत नाही: राहुल गांधी
लढाऊ विमान राफेल घोटाळयात मोदींना कोणी सुद्धा वाचवू शकत नाही. पंतप्रधानांनी रिलायन्सच्या अनिल अंबानी यांना केवळ व्यक्तीगत फायदा मिळावा म्हणून हा घोटाळा केला आहे. दरम्यान, या आरोपांचा काँग्रेस अध्यक्षांनी पुनरुच्चार केला आहे. तसेच विद्यमान CBI संचालक आलोक वर्मांना राफेल लढाऊ विमानांच्या कराराची चौकशी करायची होती. म्हणून मोदी सरकारने त्यांना अचानक मध्यरात्रीपदावरुन दूर करत सक्तीच्या रजेवर धाडले असे सुद्धा ते म्हणाले. त्यामुळेच मोदी लोकसभेत चर्चेपासून पळ काढाला, असा घणाघात काँग्रेस अध्यक्षांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपची डोकेदुखी वाढणार; या ७ राज्यांमध्ये काँग्रेस करणार प्रादेशिक पक्षांशी आघाडी
यूपी आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसशी येथील अनुक्रमे बहुजन समाज पार्टी – समाजवादी पार्टी आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसशी आघाडी होण्याची काहीही चिन्हे नसली तरी इतर राज्यांतील प्रादेशिक पक्ष मात्र राष्ट्रीय काँग्रेसशी आघाडी करण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
२०१७-२०१८: भारत काँग्रेसमुक्त होतो आहे की भाजप मुक्त? सविस्तर
देशातील ५ विधानसभा निवडणुकांचा निकालानंतर काँग्रेस पुन्हा जोमाने कामाला लागली आहे. त्यानंतर केंद्रातील मोदी सरकारला मोठा राजकीय धक्का बसला होता. त्यावेळी सर्वप्रथम भारत काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी आणि अमित शहा यांच्या इराद्यालाच जोरदार सुरुंग लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सर्वच निर्दोष म्हणजे त्या सर्व हत्या नसून, ते स्वत:च मेले आहेत: राहुल गांधी
गुजरातच्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातील २२ आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. यावर राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमाने ट्विट केले आहे. हरेन पांड्या, जस्टिस लोया, तुलसीराम प्रजापती, प्रकाश ठोंबरे, श्रीकांत खंडाळकर, कौसर बी, सोहराबुद्दीन शेख या सर्वांची हत्या नसून ते स्वत:च मेले आहेत, असे राहुल गांधी यांनी ट्विट करत टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत मोदींना झोपू देणार नाही: राहुल
जोपर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आम्ही पंतप्रधान मोदींना झोपू देणार नाही, असा थेट इशारा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे. इतकंच नाही तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. केवळ घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांचं एक रुपयाचं कर्ज सुद्धा माफ केलेलं नाही, असं राहुल प्रसारमाध्यमांशी थेट संवाद साधताना म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
छत्तीसगड: मुख्यमंत्रीपदासाठी भूपेश बघेल यांची निवड
छत्तीसगडमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा पेच अखेर सुटला आहे. याआधी मध्यप्रदेश आणि राजस्थानातील मुख्यमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना यश आलं होतं, मात्र छत्तीसगडचा पेच कायम होता.
6 वर्षांपूर्वी -
राफेल डील: राहुल गांधींची 'जॉईंट पार्लीमेंट्री कमेटी'ची मागणी अजून मान्य नाही?
सुप्रीम कोर्टाने राफेल करारावरून चौकशी करण्याची गरज नसल्याचे निकालात स्पष्ट करताच अमित शाहांनी राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. दरम्यान, आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राहुल गांधींवर राफेलच्या मुद्द्यावरून देशाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी देशाची माफी मागावी अशी जाहीर मागणी करावी.
6 वर्षांपूर्वी -
कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदासाठी निवड
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी कुटुंबियांचे जवळचे मानले जाणारे कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एकमताने निवड झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात चुरस होती. अखेर एकमताने आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आदेशानंतर कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आजपासून भाजपसाठी 'पप्पू'चा परमपूज्य झाला' : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभा निकाल आणि भाजपच्या पीछेहाट होण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ५ राज्यांमधील निकालांवर मत व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, ‘अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या जुलमी राजवटीला ही मतदाराने दिलेली चपराक आहे, अशा तिखट शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या प्रचंड मेहनतीमुळे काँग्रेसला यश मिळाले : सोनिया गांधी
आज राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर एक वर्ष पूर्ण होतं आहे. दरम्यान, आजच्या ५ राज्यांमधील काँग्रेसच्या निकालावरून सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची स्तुती करताना म्हटलं की, पक्षाला नवी उभारी देण्यासाठी राहुलने प्रचंड मेहनत घेतली आणि त्यामुळेच आजचं यश मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप एमपी'त बाहेर, राजस्थानात सुपडा साफ तर तेलंगणात क्लीन बोल्ड होणार?
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि तेलंगण या ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं आहे. आता उत्सुकता आहे ती, ११ तारखेच्या निकालांची. आता विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल अंदाज येण्यास एकामागे एक सुरुवात झाली आहे. त्यानुसार मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांची सत्ता भारतीय जनता पक्षाला गमवावी लागेल असं चित्र आहे. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षासाठी आणि मुख्यत्वे मोदी आणि अमित शहांना तो मोठा धक्का असेल असं म्हटलं जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
तेलंगणा,राजस्थानमध्ये आज मतदान; अनेक बुथवर EVM मध्ये बिघाड
आज राजस्थान आणि तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पहिले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाड होण्याच्या घटना समोर येत आहेत असे वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदीजी! प्रचार संपला, आता तुमचा पार्टटाईम जॉब असलेल्या पीएम पदाकडे जरा लक्ष द्या
सर्वाधिक वेळ परदेश दौऱ्यात आणि देशभरातील निरनिराळ्या निवडणूक प्रचारात अधिक वेळ खर्ची घालणाऱ्या नरेंद्र मोदींवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोचरी टीका केली आहे. पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुकांचा प्रचार आता पूर्णतः संपला आहे. त्यामुळे आता तुम्ही तुमचा पार्ट टईम जॉब असलेल्या पंतप्रधानपदाकडे जरा लक्ष द्या आणि कमीत कमी एकतरी पत्रकार परिषद घ्या, असा उपरोधीक टोला राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदींच्या त्या वक्तव्याने त्यांनी सरदार पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं?
स्वातंत्र्याच्या काळात भारतातील नेत्यांकडे शहाणपण नसल्यामुळे पंजाबमधील तीर्थस्थळ कर्तारपूर हे पाकिस्तानात गेले, असे सांगत पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेलांच्या कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. तसेच नरेंद्र मोदी स्वतःला सर्वेश्रेष्ठ नेता सिद्ध करण्यासाठी गांधी, पटेल आणि इतर नेत्यांना खालच्या पातळीवर घेऊन जाऊ शकतात, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB