महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | कृषी कायदे | २०१५ मधील राहुल गांधींची भविष्यवाणी ठरली खरी
केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान झालेली आठवी बैठकही काल निष्फळ ठरली. या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत. त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारच्या अहंकाराने ६० पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला | हट्ट सोडा
केंद्र सरकारचे नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता महिनाभरापेक्षाही जास्त काळ लोटला आहे. या आंदोलनात आतापर्यंत ६० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींच्या आजींची प्रकृती चिंताजनक | त्यामुळे तातडीने इटलीला गेले
दिल्लीतील शेतकरी आंदोलन ऐन भरात असताना परदेशात गेल्यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या टीकेचे धनी होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी राहुल यांची बाजू मांडली आहे. राहुल गांधी यांची आजी आजारी आहे. तिला भेटण्यासाठी राहुल गांधी इटलीला गेल्याचे राजीव सातव यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
मोहन भागवत मोदींविरोधात बोलले तर त्यांनाही दहशतवादी ठरवतील - राहुल गांधी
दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मोजक्या उद्योगपतींसाठी काम करत आहेत. सरकारविरोधात उभ्या राहणाऱ्यांना दहशतवादी ठरवलं जात आहे. मग ते शेतकरी असो, मजूर असोत. एखाद्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत मोदींविरोधात उभे राहिल्यास त्यांनाही दहशतवादी म्हटलं जाईल, अशा शब्दांत राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला.
4 वर्षांपूर्वी -
काँग्रेस अध्यक्ष पदासाठी जवळपास सर्वच नेत्यांची राहुल गांधींना पसंती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं. याबाबतची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायदे | रोजच्या सवयीप्रमाणे आजही मोदींनी असत्याग्रहच केला - राहुल गांधी
केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांचं जोरदार समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी महासंमेलनाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. नव्या कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांना मनातील शंका दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला.
4 वर्षांपूर्वी -
संरक्षण समिती बैठक | सैन्य सुसज्जता सोडून लष्कराच्या गणवेशावर चर्चा | काँग्रेसचा वॉकआऊट
संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले. जवानांना कशा पद्धतीचा गणवेश असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही, सैन्य दलांच्या प्रमुखांनाच गणवेशाबाबतचा निर्णय घेऊ द्यावा, असं सांगत राहुल गांधी यांनी या चर्चेला विरोध केला. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जुएल ओरम आणि राहुल गांधी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या राहुल यांनी या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरचा विश्वास उडाला | राहुल गांधीची केंद्रावर जोरदार टीका
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पाच नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कृषी कायदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, असंही विरोधकांनी राष्ट्रपतींना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलन | शरद पवार, राहुल गांधींसहीत ५ दिग्गज नेते उद्या राष्ट्रपतींना भेटणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारवरचा दबाव वाढतो आहे. हा दबाव वाढविण्यासाठी विरोधी पक्षांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार(NCP President Sharad Pawar), काँग्रेसकडून राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi), CPI (M)चे सीताराम येचुरी, CPIचे डी राजा आणि DMKचे टीकेएस एलनगोवन यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलमुळे फक्त 5 नेत्यांनाच भेटीची परवानगी मिळाली आहे. शरद पवार यांनीही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयीची माहिती दिली. या प्रश्नावर सर्व पक्ष मिळून भूमिका ठरविणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. संध्याकाळी 5 वाजता ही भेट होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान म्हणतात सर्वांना लस मिळणार | केंद्र सरकार म्हणत नाही देणार
मागील काही महिन्यांपासुन जगभरात कोरोनावर संशोधन सुरू असून नवनवीन माहिती समोर येत आहे. अनेक देशात निरनिरळ्या कंपन्यांना चाचण्यांनंतर यश आले आहे. मोदी सरकारने कोरोनावरील कोणत्याही लसीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. परंतु लसीकरणाची तयारी केली जात आहे. तब्बल तीस कोटी लोकांना कोरोनावरील लस देण्याची तयारी केली जात आहे. प्राथमिकतेनुसार ही लस देण्यात येणार आहे. परंतु आता आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक भारतीयाला लस देण्याबद्दल सरकारकडून म्हटलं गेलेलं नाही, असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानजी जनतेला लुटून मित्रांना पैसे देणं बंद करा | आत्मनिर्भर बना – राहुल गांधी
केंद्र सरकार कोरोना फंड जमवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर अधिक टॅक्स लावण्याच्या तयारीत आहे. त्यावरून काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी एका बातमीचा स्क्रिनशाॅट शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय. ‘पंतप्रधानजी जनतेला लूटने सोडा, आपल्या मित्रांना पैसे देणं बंद करा, आत्मनिर्भर बना, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. राहुल गांधी यांनी केलेलं हे ट्विट काही वेळातच अनेकांनी रिट्विट आणि लाईक केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
निवडणुकीत शेतकरी, जवानांसमोर नतमस्तक होतात | घरी गेल्यावर अंबानी-अदानीचं काम करतात
पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी -
जिथं जातात, तिथं खोटं बोलतात | राहुल गांधींचं पंतप्रधानांवर टीकास्त्र
पंतप्रधान मोदी यांची आज बिहार निवडणुकीसाठी पहिली सभा होत आहे. पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबासह महाआघाडीवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल केला.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारची जबरदस्त कामगिरी | भारतापेक्षा पाकिस्तान-अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था स्थिर - राहुल गांधी
भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) झालेली मोठी घसरण या मुद्द्यांवरून आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या-IMF) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बरोबरच भारताचा विकासदर हा बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदींना कोणतीही समज नाही हे त्यांना सांगण्याची हिंमत आजूबाजूंच्यांमध्ये नाही हाच खरा धोका
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. डेन्मार्कमधील पवनऊर्जा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ऊर्जेबरोबरच ऑक्सिजन आणि पेयजल निर्मितीची सूचना केल्याप्रकरणी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदी यांना ‘समज’ नसल्याची टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
लष्कराच्या जवानांना नॉन-बुलेट प्रूफ़ ट्रक | पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचं विमान
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा लक्ष केलं आहे. भारतीय जवानांचा ट्रकमधून जातानाचा एक व्हिडिओ त्यांनी ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. त्यामध्ये त्यांनी लष्कराच्या जवानासोबत केला जाणारा दुजाभाव समोर आणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी एकट्याने बोगद्यात हात हलवणं सोडा | देशाच्या प्रश्नांना सामोरं जा - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला सुरू आहे. कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये तीन दिवसीय ‘किसान यात्रा’ पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी आपला मोर्चा हरयाणाकडे वळवला आहे. याच दरम्यान बुधवारी सकाळी त्यांनी ट्विटरवरून पुन्हा एकदा पंतप्रधानांवर टीका केलीय.
5 वर्षांपूर्वी -
ट्रॅक्टरच्या गाद्याच सोडा, ८००० कोटीच्या विमानातील ५० पलंगांवर सुद्धा बोला | सणसणीत टोला
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेत. यावेळी, ट्रॅक्टरवर एका कुशन लावलेल्या खुर्चीवर ते बसलेले काही फोटो समोर आले होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर बोट ठेवत सोमवारी राहुल गांधी यांना ‘व्हीआयपी शेतकरी’ म्हणत टीकाही केली होती. यालाच आज पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. ‘गाद्यांची गोष्ट करणारे ८००० कोटी रुपयांच्या विमानात गप्प का आहेत? त्या विमानात गाद्याच नाहीत तर ५० पलंग आहेत’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
5 वर्षांपूर्वी -
स्मृती ईराणी प्रकटल्या | आणि म्हणाल्या राहुल गांधी नेहमी राजकारण करतात
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा आहे. या प्रकरणामधील पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात पीडित तरुणीवर उपचार सुरु होते. पीडित तरुणी १४ सप्टेंबरपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर मंगळवारी तिची प्राणज्योत मालवली. चौघांनी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
5 वर्षांपूर्वी -
Z-Plus दर्जाचं सुरक्षा कवच असताना राहुल गांधींना जमिनीवर पडेपर्यंत धक्काबुक्की
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी हाथरसला रवाना झाले आहेत. मात्र त्याआधीच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू आहेत. तर सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
NHPC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, SELL रेटिंग, PSU एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचा सल्ला - NSE: NHPC
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्ससाठी 71 रुपये टार्गेट प्राईस, अपसाईड तेजीचे संकेत - NSE: SUZLON