महत्वाच्या बातम्या
-
मोदी सरकारने कोरोना साथ आणि पेट्रोल-डिझेलचे दर 'अनलॉक' केले आहेत - राहुल गांधी
पेट्रोलियम कंपन्यांनी आज बुधवारी पुन्हा डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. सलग १८ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांवर बोझा पडत आहे. दरम्यान, दिल्लीत बुधवारी पेट्रोलचा भाव ७९.७६ रुपयांवर कायम होता. तर डिझेलमध्ये ४८ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत वाढल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ७९.८८ रुपये झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी नव्हे, सरेंडर मोदी...राहुल गांधींची टि्वटरवर बोचरी टीका
चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नावच बदलून हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका टि्वटरवर केली आहे. त्यांच्या या टीकेनंतर आता काँग्रेस विरुद्ध भाजपा असा शाब्दिक वॉर सुरू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
जर जमीन चीनची होती, तर आपल्या जवानांना का मारण्यात आलं? - राहुल गांधीं
भारताची एकही इंच जमीन कोणाच्याही ताब्यात नाही तसेच कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केले. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे - राहुल गांधी
गलवान खोऱ्यात चीनकडून हिंसक झडप घालण्यात आली. यात भारताचे २० जवान शहीद झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तीन मुद्दे उपस्थित केले आहेत. राहुल यांनी लिहिले, “आता हे सिद्ध झाले आहे, की चीनने गलवानमध्ये जो हल्ला केला तो आधीपासूनच नोयोजित होता. भारत सरकार यावेळी झोप घेत होते आणि समस्यांकडे दुर्लक्ष करत होते. या शिवाय राहुल गांधींनी लिहिले आहे, सरकारच्या हलगर्जीपणाचा परिणाम आपल्या जवानांना भोगावा लागला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२० भारतीय जवान शहीद, पंतप्रधान शांत का? ते का लपवत आहेत?...राहुल गांधी संतापले
लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
5 वर्षांपूर्वी -
रेल्वे मंत्रालय PM केअर फंडाला १५१ कोटी देतं आणि मजुरांवर भाडं आकारातं - राहुल गांधी
केंद्र सरकारने परदेशात अडकलेल्या भारतीयांना राष्ट्रीय कर्तव्य म्हणून विमानाने निशुल्क परत आणले. मात्र, त्याच सरकारला लॉकडाऊनमुळे देशोधडीला लागलेल्या मजुरांना रेल्वेचे तिकीट माफ करता येत नाही का, असा सवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी यांनी सोमवारी एक पत्रक जारी केले. या पत्रकात त्यांनी केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवले आहे.
5 वर्षांपूर्वी -
RBI'ने भाजपच्या मित्रांची नावं चोरांच्या लिस्ट'मध्ये टाकली आहेत - राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. देशात बँकेचे कोट्यवधी रुपये बुडविणाऱ्या थकबाकीदारांची नावे केंद्र सरकार लपवत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकेने नीरव मोदी, मेहुल चोकसीसह भारतीय जनता पक्षाच्या मित्रांची नावे ‘बँकेच्या चोरांच्या’ यादीत समाविष्ट केली आहेत असे संसदेत विचारलेल्या प्रश्नाचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी सरकार पाडण्यात तुम्ही व्यस्त, पण त्याचवेळी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले...
मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे राजीनाम्याचे पत्र समोर आले. ज्योतिरादित्य शिंदे बुधवारीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
No YES Bank ! मोदी आणि त्यांच्या कल्पनांनी भारतीय अर्थव्यवस्था बुडवली - राहुल गांधी
रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांमुळे खातेधारकांना महिन्याभरासाठी ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार आहेत, मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढायची असल्यास रिझर्व्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागणार आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीत खातेधारकांना पैसे काढता येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इटलीहून परतलेल्या राहुल गांधींनी करोनाची चाचणी केली का? भाजपाचा निशाणा
इटलीहून परत आल्यावर राहुल गांधींवर यांनी हिंसाचार झालेल्या ईशान्य दिल्लीचा दौरा केला. त्यानंतर भाजपाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. इटलीवरून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी केली आहे का? हे आधी राहुल गांधी यांनी सांगावं. भारतात दाखल होताच कोरोनाची चाचणी करायला हवी होती?, भारतात कोरोना व्हायरस पसरवायचा आहे का? असं भाजपाचे खासदार रमेश बिधुरी यांनी काल म्हटलं आहे. राहुल गांधी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागाला भेट देण्यापूर्वी त्यांनी असं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदीजी! सोशल मीडियावरील खेळ बंद करा; देशातील महत्वाच्या विषयांकडे लक्ष द्या: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार नाहीत. तर 8 मार्चपासून महिलांना मोदींचं ट्वीटर अकाऊंट चालण्यासाठी देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ट्वीट करत मोदींनी यासंबंधी माहिती दिली आहे. खरंतर आपण सगळे सोशल मीडिया अकाऊंट सोडणार असल्याचं ट्वीट मोदींनी सोमवारी केलं होतं. त्यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. त्यावर आता मोदींनी खुलासा केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधींमुळे त्याच क्षणी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार होते
नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष यांनी लिहिलेलं ‘बॅकस्टेज : द स्टोरी बिहाइंड इंडियाज हाई ग्रोथ ईअर्स’ हे पुस्तक रविवारी प्रकाशित झालं. या पुस्तकात युपीए सरकारच्या काळातील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविषयीच्या घटनेबद्दल अहलुवालिया यांनी लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुलवामा हल्ल्याचा सर्वात जास्त फायदा कुणाला? - राहुल गांधी
पुलवामा येथे सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेला आज वर्ष पूर्ण झालं. भारतीय सैन्याच्या तब्बल ४० जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या विदारक घटनेचे व्रण प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजे आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
गॅसच्या किंमत १५०'ने वाढल्याने आंदोलन करणाऱ्या भाजपच्या सदस्यांशी मी सहमत: राहुल गांधी
गेल्या काही दिवसांपासून गॅसच्या किमतीत सतत वाढ होत आहे. त्यामुळं येत्या काही दिवसांत सर्वसामन्यांचे जेवण महागणार आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. विना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. दरवाढ किंवा घट ही महिन्याच्या १ तारखेलाच होत असते. मात्र, अचानक दरवाढ केल्याने ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत सिलेंडरचा दर ७२१.५० रुपये इतका होता. मात्र, तो आता वाढून ८६६.५० रुपये झाला आहे. पुण्यात काल ७०४ तर आज तब्बल ८४९ रुपये असा सिलेंडरचा दर आहे.
5 वर्षांपूर्वी -
यमक जुळणं महत्वाचं? राहुल गांधी मोदींना दंडा मारतील तर आम्ही अंडा मारू: आठवले
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ‘दंडा मार’ची भाषा केली तर आम्ही त्यांच्याविरोधात अंडी मारो आंदोलन करु असा इशारा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. राहुल गांधी अशा प्रकारची वक्तव्यं करत असल्यानेच अमेठीतून ते निवडणूक हरले. राहुल गांधी हे स्वतःच काँग्रेस पक्ष कमकुवत करत आहेत. ते अशाच प्रकारे बोलत राहिले तर काँग्रेस पक्ष संपेल अशीही टीका आठवलेंनी केली.
5 वर्षांपूर्वी -
लोकसभेत बेरोजगारी व देशाच्या प्रगतीवर भाष्य करताना राहुल गांधींकडून मोदींचा एकेरी उल्लेख
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हौझ काझी निवडणुकीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त विधानावर लोकसभेत शुक्रवारी गदारोळ झाला. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांच्या या वक्तव्यास आक्षेप घेत संपूर्ण सभागृहाने याचा तीव्र निषेध करावा अशी मागणी केली. राहुल यांच्या विधानाचा सभागृहात उल्लेख होताच कॉंग्रेसचे खासदार संतापले.
5 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे एकाच विचारसरणीचे: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारधारेत फारसे अंतर नाही. ती एकच आहे, अशा शब्दात काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) विरोधात केरळच्या वायनाडमध्ये महारॅली आयोजित केली होती. या रॅलीनंतर झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. वायनाडच्या कलपेटा येथून या महारॅलीला सुरुवात झाली. या महारॅलीत काँग्रेसच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
काय बोलत आहेत? हिंदुस्थानचा युवक हा हिंदुस्थान नाही तर देशही घडवू शकतो: राहुल गांधी
सध्या राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील पुन्हा लाँचिंगचा विचार करत असताना त्यांनी पुन्हा चुका करून स्वतःचा हास्य करून घेणारी वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहेत असंच म्हणावं लागेल. भारताचा युवक हा भारतच नाही तर देशही घडवू शकतो. असं एक कुणालाही बुचकळ्यात पाडेल असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. भारत आणि देश हे दोन्ही वेगळे आहेत का? असा प्रश्न कुणालाही पडावा असंच हे राहुल गांधी यांचं वक्तव्य आहे. जयपूरमध्ये युवा आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दरम्यान झालेल्या भाषणात राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी खोटं बोलत आहेत; आसाममध्ये स्थानबद्धता छावणी (डिटेंशन सेंटर) उभारणी: राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. डिटेक्शन सेंटरबाबत काँग्रेस वाईट हेतूने लोकांमध्ये खोटे पसरवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत बोलताना म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
TATA Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स फोकसमध्ये, IIFL कॅपिटल बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC