शिंदे गटाने आखून दिलेल्या 'स्किप्टेड' आरोपांसाठी जनतेत शून्य राजकीय पत असलेल्या नेत्यांचे पक्ष प्रवेश, लोकांचे मूळ मुद्दे बाजूला करण्याचा कट
Aaditya Thackeray | शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शनिवारी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर जे आधीच अपेक्षित होतं तेच झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयावरील भव्य मोर्चानंतर शिंदे गटाकडून जे अपेक्षित आहे तेच घडण्यास सुरुवात झाली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत सामान्य जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारण्यासाठी आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या मुंबई महानगपालिकेतील प्रशासकीय टेण्डरशाहीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी नवे प्रयोग सुरु झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी