RailTel Share Price | रेलेटेल कॉर्पोरेशन शेअरमध्ये सकारात्मक बातमीमुळे तेजी, कंपनीची कामगिरी आणि शेअर परतावा तपासून घ्या
RailTel Corporation Share Price | रेलेटेल कॉर्पोरेशन या टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसांपासून तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 128.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. रेलेटेल कॉर्पोरेशन या मिनी रत्न कंपनीच्या शेअर्समधील तेजीचे कारण म्हणजे तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेडकडून रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीला 294.37 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. या सर्व बाबीचा विचार करून ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांनी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 160 रुपये निश्चित केली आहे. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी रेलेटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 3.78 टक्के वाढीसह 133.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी