महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | पुराच्या पाण्यासोबत घरामध्ये आले मोठे मासे
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि हैदराबादसह अनेक राज्यांना पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. अनेकांचे संसार या पावसात उध्वस्थ झाल्याचं समोर आले आहे. मात्र याचा सर्वाधिक बसला तो ग्रामीण भागाला आणि विशेषकरून नदी किनारी वसलेल्या गावांना. दरम्यान, सतत सुरू असलेल्या मुसळधार पासवामुळे या भागातील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान | सरकारकडून आढावा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू झालाय. पश्चिम महाराष्टारातील २८ जण तर मराठवाड्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टीमुळे मराठवड्यातील शेतीचे सगळ्यात जास्त नुकसान मराठवाड्यातील ४ लाख ९९ हजार ६४८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात राज्यातली ५७ हजार ३५४ हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली आहे. मुसळधार पाऊस आणि विविध नद्यांना आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका हा सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर या शहरांना बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ | पुण्याला तडाखा | मुंबईतही हायअलर्ट
राज्यात परतीच्या पावसामुळे अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा तडाखा बसला आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भीषण दुर्घटना | चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी
पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचल्याची दुर्घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली़ या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोपाळ लक्ष्मण अभंगराव, राधाबाई गोपाळ अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव, पिल्लू उमेश जगताप (वय १२) यांच्यासह अन्य दोन महिला अशी नावे आहेत़ दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंध्र, तेलंगणात पावसाचा जोरदार तडाखा | हैदराबादेत आभाळ फाटल्याने १४ जणांचा मृत्यू
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं अनेक राज्यात पाऊस कोसळत असून, आंध्र प्रदेश व तेलंगानात तर अक्षरशः तांडव घातलं आहे. गेल्या २४ तासात दोन्ही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे हैदराबादमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Alert! पुढील ४ दिवस पावसाचे | या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
उत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. याचा परिणाम देशातील काही राज्यांच्या हवामानावर होणार असून अनेक ठिकाणी पाऊस (Rainfall) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ११ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, कर्नाटकातील काही भागांत खराब हवामानाची परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Rain Alert | राज्यातील 'या' भागात आज-उद्या गडगडाटासह पावसाची शक्यता
ऑक्टोबर हिट सुरू होण्यापूर्वी राज्यातील विविध भागांत पाऊस जोरदार बरसत (Heavy Rainfall) असल्याचं दिसत आहे. शनिवारी सायंकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर या भागांत जोरदार पाऊस झाला. पावसाचा जोर इतका होता की, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले होते. पावसाचा हा जोर आज आणि उद्या (४ ऑक्टोबर आणि ५ ऑक्टोबर) सुद्धा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज आणि उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
पुढच्या २४ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊसाचा अंदाज | हवामान खात्याचा इशारा
गेले काही दिवस महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. पण पुढील 24 तासांत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबई शहरात काही भागात मध्यम ते हलका स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा अंदाज | मुंबईत ऑरेंज अलर्ट
मागील काही दिवसांपासून पावसानं मुंबईसह जवळच्या जिल्ह्यांमध्ये मुक्काम ठोकला असून, संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले असताना एक दिवस आधीच अर्थात शुक्रवारपासून मुंबईत पावसानं जोर धरला आहे. मुंबई जोरदार पाऊस सुरू असून, हवामान विभागानं २५ ऑगस्टपर्यंतचा अंदाज जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
येत्या २४ तासांत मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा अंदाज
येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी १२० मिमीपेक्षाही जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कोकणातही सर्वत्र पुढील २४ तास पाऊस सुरुच राहील, असेही कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सांगलीत पुराचा धोका
जिल्ह्यात दमदार पाऊस पडत आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणीपातळी २० फूट इतकी झाली आहे. त्यामुळे सांगलीत पुराचा धोका कायम आहे. दरम्यान, मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे वारणा धरण ८१ टक्के भरले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापुरात मुसळधार पाऊस, रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली
कोल्हापुरात सध्या पावसाचा कहर सुरु असून कोल्हापूर शहराशी जोडणारे अनेक रस्ते, बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. पूरस्थिती निर्माण होत असल्याने यावर नियंत्रणासाठी शहरात एनडीआरएफच्या ४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, केर्ली ते केर्ले दरम्यान स्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग काही काळ बंद झाला होता, मात्र पाणी ओसरु लागल्याने तो पुन्हा सुरु झाला आहे. तरी ठिकठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस सुरुच
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून (Monsoon 2020) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं वृत्त वेधशाळेकडून देण्यात आलं आहे. मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचं चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता
मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. मात्र काल मध्यरात्री मुंबईत कोसळलेल्या पहिल्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहेत. परंतु भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
'दिवाळीत पाऊस' की 'पावसात दिवाळी'? कंटाळा आणला या पावसाने!
मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा डोकं वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई आणि पुणे सारख्या शहरात तर सामान्य माणूस या पावसाला अक्षरशः कंटाळला आहे. अगदी दिवाळीची खरेदी देखील मंदावल्याचे पाहायला मिळाले. दसऱ्याचं सेलिब्रेशन देखील काहीसं सुस्तावलेलंच पाहायला मिळालं. कितीही महागाई वाढलेली असली तरी सामान्य माणूस छोट्या-मोठ्या स्वरूपात का होईना पण दिवाळी साजरी करतोच.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: बांधकाम व्यावसायिकांच्या अनधिकृत बांधकामांचा फटका निष्पाप पुणेकरांना
पुणे शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला. प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: मुसळधार पावसाने १६ जणांचा मृत्यू, ९ जण अजूनही बेपत्ता
शहर आणि जिल्ह्यमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बेफाम पावसाने हाहाकार उडवून दिला. शहर आणि जिल्ह्यामध्ये भिंत पडून आणि पाण्याच्या लोंढय़ात वाहून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला. सहा ते सात नागरिक बेपत्ता झाले आहेत. शेकडो जनावरांचाही मृत्यू झाला. प्रामुख्याने दक्षिण पुणे आणि सिंहगड रस्ता परिसरात बहुतांश सोसायटय़ांमध्ये पाणी शिरले, सीमाभिंती कोसळल्या, नाल्यांमधून आलेल्या पाण्याच्या लोंढय़ाने मोटारींसह हजारो दुचाकी वाहून गेल्या.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू, तर अनेकजण वाहून गेल्याची भीती
पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ९ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती. मात्र, मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. दरम्यान, कात्रज परिसरात नवीन बोगद्याजवळ महामार्गावर दरड कोसळल्यामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
5 वर्षांपूर्वी -
६ तासात मुंबईत १०० मिमी पावसाची नोंद! १३०० नागरिकांना हलवले
मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 या सहा तासात शहरात सरासरी १००.९७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये १३१.४९ मिमी, पश्चिम उपनगरांमध्ये १४५.६५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कुर्ला पश्चिमेकडील विमानतळ परिसरातील क्रांती नगर पाण्याखाली गेले असून एनडीआरएफच्या पथकाने बचावकार्य हाती घेतले आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो