महत्वाच्या बातम्या
-
'ठाकरे' आडनाव नसते तर राज ठाकरे संगीतकारांमध्ये दिसले असते: मंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मनसे, काँग्रेसच्या मदतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आर्थिक नाड्या भाजपाकडे
कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे विकास म्हात्रे यांनी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मदतीने विजय मिळवून सत्ताधारी शिवसेनेला जोरदार धक्का दिला. काँग्रेस आणि मनसेने भारतीय जनता पक्षाला मदत केल्यामुळे निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ समसमान झाले होते. परंतु, ऐन मतदानाच्या दिवशी शिवसेनेचा एक सदस्य आजारी असल्यामुळे उपस्थित राहू शकला नाही आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार गणेश कोट यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
5 वर्षांपूर्वी -
आ. राजू पाटील यांच्या प्रयत्नाने लोकग्राम रेल्वे पादचारी पुलासाठी ३८ कोटी ५७ लाख निधी मंजूर
देशभर आमदार आणि खासदार असे महत्वाचे लोकप्रतिनिधी नकोत्या विषयात गुंतलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील लोकांनी ज्यासाठी निवडून दिलं आहे त्यासाठी ते पूर्णत्वाला घेऊन जाण्यात गुंतले आहेत. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच ते विकास कामांचा मोगोवा घेत होते.
5 वर्षांपूर्वी -
मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे
अमृता फडणवीस यांनी ‘ठाकरे; आडनावाचा उच्चार करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्ष केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने सुद्धा सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आता शिवसेना आणि राष्ट्र्वादीने यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील माजी नगरसेवक रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील अमृता फडणवीस यांना लक्ष करत बोचरी टीका केली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अहिल्यादेवी होळकर उद्यानातील दीड एकर जागेवर मुलांना हक्काचं मैदान; मनसे तयारी सुरु
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील कार्यसम्राट नगरसेवक वसंत मोरे यांनी त्रज, संतोषनगर, दत्तनगर, मोरे बाग भागातील मुलांसाठी हक्काचे मैदान मिळाले यासाठी जोरदार तयारी सुरु केली असून, त्यावर त्यांचे विशेष लक्ष देखील आहे. नगरसेवक वसंत मोरे यांचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांच्याबाबतीत चांगलाच बोलबाला आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक विकास कामं वेळेत पूर्ण करून स्वतःची वेगळी ओळख देखील निर्माण केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागरी समस्यांसंदर्भात मनसेचं वाशी वॉर्ड ऑफिसवर हल्ला बोल आंदोलन
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरी समस्यांवरून मैदानात उतरली असून दर आठवड्याला काही ना काही आंदोलन करून पालिका प्रशासनाला धारेवर धरण्याचा सपाटा लावला आहे. नवी मुंबईचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैतृत्वाखाली स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
शहांचं अभिनंदन! लोकांचं मंदी, महागाई, बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यात ते यशस्वी
सर्व देशांच्या लोकांना सामावून घेण्यासाठी भारत ही काय धर्मशाळा आहे का? असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी सरकारला केला आहे. १३५ कोटी लोकसंख्या असेलेल्या देशाला आणखी लोकांची काय आवश्यकता आहे असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. देश म्हणून आपण आणखी ओझं वाहू शकत नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: सत्ता जाताच भाजप आमदारांचा टोलनाका बंद वरून मनसे खळखट्याक मार्ग
खळखट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदर्श सध्या सत्ता जाताच भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी देखील घेतल्याचं दिसत आहे. फडणवीसांच्या सत्ताकाळात कोणीही कायदा हातात घेऊन आंदोलन करू नये उपदेश देणारे भाजप सरकार सत्ता जाताच खळखट्याक मार्गावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सदर आंदोलन साताऱ्यात घडलं आहे आणि मनसे स्टाईल’मुळे चर्चेत सुद्धा आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: नागरी समस्यांवरून मनसेचं कोपरखैरणे विभाग कार्यालयावर ढोल वाजवा आंदोलन
नेरुळ विभाग कार्यालयावर मागील आठवड्यात सामान्य नागरिकांच्या विविध समस्यांवरून मोर्चा काढल्यानंतर आज मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नैत्रुत्वात कोपरखैरणे विभाग कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपरखैरणे विभागातील लोकांच्या विविध समस्यांवरून मनसे ढोल वाजवत मोर्चा काढणार असून, सुस्त प्रशासनाला जाग आणण्याच्या उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
वाद उफाळला! मी तोंड उघडलं तर हा नवी मुंबईत तोंड लपवत फिरला असता: अविनाश जाधव
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सध्या ठाणे आणि नवी मुंबईतील पक्षांतर्गत घडामोडींमुळे वाद उफाळून आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे मनसेत महत्वाची जवाबदारी असणारे नेतेच थेट खुलेआम समाज माध्यमांवर संताप व्यक्त करत असल्याने त्यांना कोणत्याही परिणामांची देखील चिंता नसावी असंच सगळं चित्र आहे. या राजकारणाला सुरुवात अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडलेल्या नवी मुंबईतील थाळीनाद मोर्चापूर्वीच झाली होती, ज्यापासून वरिष्ठ पातळीवरील काही पदाधिकारी वगळता सामान्य कार्यकर्ते अंधारात होते असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भातील दिशा कायदा आंध्र प्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा पारित करा: आ. राजू पाटील
आंध्र प्रदेश विधानसभेचे शुक्रवारी ‘दिशा विधेयक’ पारित केलं. बलात्काराच्या गुन्ह्याची प्रकरणे २१ दिवसांच्या आत निकाली काढत दोषींना मृत्यूदंड देण्याची तरतूद या कायद्याद्वारे केली जाणार आहे. बलात्काऱ्यांना फाशी देणारं आंध्र प्रदेश हे देशातील पहिलं राज्य बनलं आहे. महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करून नंतर तिचा मृतदेह जाळण्याची घटना काही दिवसांपूर्वी हैदराबादेत घडली आणि या घटनेचे देशभर पडसाद उमटले. यानंतर आंध्र प्रदेशने या कायद्यासाठी वेगाने पावले उचलली.
5 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई: अविनाश जाधव यांच्यावर आरोप करत गजानन काळेंचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा
एका बाजूला राज्याच्या राजकारणात जोरदार घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे कार्यकर्त्यांसोबत थाळीनाद नवी मुंबईतील मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या मोर्चातील प्रत्यक्ष सहभागाने त्यांनी पूर्णवेळ कार्यरत होण्याचा निर्णय घेतला असावा असं म्हटलं गेलं. नवी मुंबईतील ६५०० कामगारांचे १४ महिन्यांचे वेतन महापालिकेकडे थकीत आहेत ते पैसे कामगारांना मिळवून देण्यासाठी अमित ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत निद्रिस्त प्रशासनाला जागं करण्यासाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
कात्रज-कोंढवा परिसराच्या पाणीप्रश्नावरून मनसे नगरसेवक वसंत मोरेंचा पुढाकार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी कात्रज आणि कोंढवा परिसरातील पाणीप्रश्न सुरळीत व्हावा यासाठी महापालिका दरबारी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु केला आहे. कात्रज आणि कोंढवा परिसरात सामान्य लोकांना पाणीप्रश्नावरून अनेक समस्या आहेत त्यासंबंधित तोडगा काढण्यासाठी नगरसेवक वसंत मोरे यांनी अतिरिक्त आयुक्त गोयल यांना भेटून लेखी निवेदन दिले.
5 वर्षांपूर्वी -
टोल फ्री ठाण्यासाठी मनसेचं आंदोलन; उद्धव 'ठाकरे' सरकारवर दबाव वाढणार
मागील काही वर्षांपूर्वी टोलमुक्त महाराष्ट्रसाठी आक्रमक आंदोलनं करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे टोलमुक्त (Toll Freee) आंदोलनाची सुरुवात मुळात मनसेनेच केली होती आणि त्यांच्या आक्रमक आंदोलनानंतर ७० पेक्षा अधिक टोलनाके बंद देखील झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
आता ‘U’ ‘T’urn नको! बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडालायची हीच वेळ: आ. राजू पाटील
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील विकाम कामांची श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला. आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा ड्रीम प्रकल्प असलेल्या बुलेट ट्रेनवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुलेट ट्रेनला अनेक स्तरावरुन विरोध करण्यात येत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर निशाणा साधला होता. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी आता यू- टर्न नको, हिच ती वेळ म्हणत मुख्यमंत्र्यांकडे बुलेट ट्रेन प्रकल्प बासनात गुंडाळायची मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
डॉ. प्रियांका रेड्डीवर सामुहिक बलात्कार करून जिवंत जाळले; राज यांच्या त्याच मागणीची चर्चा
हैदराबादमध्ये बुधवारी प्रियांका रेड्डी या 26 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या तरुणीला जाळून मारण्यात आले आहे. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला आहे. जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार आज मुख्य सूत्रधार ट्रक चालक मोहम्मद पाशाला अटक केली त्यानंतर इतर ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला उपस्थित राहणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवरील सोहळ्यात शपथ (Shivsena Chief Uddhav Thackeray oath Ceremony) घेणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी'मार्गे मनसेचे राजू पाटील देखील मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांची जवळीक पाहायला मिळाली होती. केवळ राज्यातील नव्हे तर देशातील सर्व विरोधकांना भाजप म्हणजे मोदी-शहा यांच्या हिटलरशाही विरुद्ध एकत्र येण्याचं जाहीर आवाहन केलं होतं. प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने ऐतिहासिक निर्णय घेतला आणि थेट मोदी-शहांशी राष्ट्रीय पंगा घेत एनडीए’मधून बाहेर पडले. विशेष म्हणजे एकूण घडामोडींबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीवर कोणतीही टीका केली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
यापुढे फक्त मनसे पक्षहित? मनसे नाशिकच्या दत्तक पुत्रांसोबत; महापौरपद भाजपाकडे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ऐतिहासिक अशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासाआघाडी अस्तित्वात आली आहे आणि दुसऱ्याबाजूला २५ वर्षांपूर्वीची भाजप-शिवसेनेची युती केंद्रापासून संपुष्टात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत अप्रत्यक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती दिली होती. मात्र त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता.
5 वर्षांपूर्वी -
मनसे ग्रामीण महाराष्ट्रात मोफत 'शेतीचा दवाखाना' म्हणजे माती परीक्षण केंद्र सुरु करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सध्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण महाराष्ट्र म्हटलं की सर्वात महत्वाचा घटक म्हणजे शेतकरी आणि तोच मनसेच्या केंद्रस्थानी असेल अशी शक्यता असून. त्याअनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच महाराष्ट्र शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे महाराष्ट्र सहकार सेनेचे अध्यक्ष दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA
- Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा