महत्वाच्या बातम्या
-
आर्थिक मंदीला नोटबंदी व जीएसटी जबाबदार; रघुराम राजन आणि राज ठाकरेंची मिळती जुळती कारणं: सविस्तर
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भारताची अर्थव्यवस्था एक व्यक्ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवू शकत नाही. भारतीय अर्थव्यवस्था आता खूप मोठी झाली आहे. एका व्यक्तीच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या अर्थव्यवस्थेचं उदाहरण आपण पाहतोच आहोत, अशी टीकाही रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर केली आहे. रघुराम राजन यांनी यापूर्वीही मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवरून टीका केली आहे. वित्तीय तूट वाढल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागतो. ब्राऊन विश्वविद्यालयातील एका व्याख्यानादरम्यान राजन म्हणाले, अर्थव्यवस्थेसाठी मोदी सरकारकडून काही ठोस पावलं न उचलल्यामुळे ती सुस्तावलेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँक खातेधारकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; सर्व कैफियत मांडली
आर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.
5 वर्षांपूर्वी -
पीएमसी बँके खातेदार राज ठाकरेंची भेट घेणार; भाजप कनेक्शन गडद होणार
याच महिन्यात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले आणि सर्व बँक खातेदारांची धाबेच दणाणले. त्यानंतर सर्वत्र केंद्र सरकारबद्दल प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. त्यानंतर संतापलेल्या खातेदारांनी केंद्रीय अर्थमंत्री, मुख्यमंत्री ते भाजप आणि सेनेच्या अनेक नेतेमंडळींची भेट घेऊन सरकारला जाब विचारला होता. मात्र बँक खातेदारांच्या वाट्याला आश्वासनांशिवाय काहीच आलं नसल्याने त्यांचा संताप अजूनच दुणावतो आहे.
5 वर्षांपूर्वी -
पाऊस लांबला! रस्त्यावर सभा घेण्याची संमती द्या, मनसेचं निवडणूक आयोगाला पत्र
पुण्यात परतीच्या पावसाने थैमान घातलं आहे. मैदानांवर अगदी चिखलाचं साम्राज्य तयार झालं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या प्रचारात अडचण तयार झाली आहे. पुण्यातील मुसळधार पावसाने राज ठाकरेंची बुधवारी (9 ऑक्टोबर) होणारी पहिला प्रचारसभा देखील रद्द करावी लागली. त्यामुळे अखेर मनसेनं निवडणूक आयोगाकडं रस्त्यावर सभा घेऊ द्या, अशी मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली.
5 वर्षांपूर्वी -
खड्डयांनी त्रस्त झालेल्या ठाणेकरांची व्यथा मांडणाऱ्या संदीप पाचंगे यांची अटक टळली
रस्त्यांवर पडलेल्या प्रचंड खड्डयांमुळे त्रस्त झालेल्या ठाणेकरांची व्यथा मांडण्यासाठी या खड्डयात मंत्र्यांची चित्रं रेखाटणार्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आणि ओवळा – माजिवडा विधानसभेचे मनसेचे उमेदवार संदीप पाचंगेंसह आठ मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज न्यायालयात आरोपपत्र सादर करुन संदीप पाचंगेंसह इतर मनसैनिकांना अटक केली जाणार होती. त्यामुळे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारावर जेलवारी करण्याची वेळ आली होती. परंतु, पोलिसांच्या निर्णायक भूमिकेमुळे पाचंगेंसह मनसैनिकांची अटक आज टळली.
5 वर्षांपूर्वी -
आज मुंबईत राज ठाकरेंच्या दोन जाहीर सभा; आरे आणि पीएमसी बँकेचा मुद्दा उचलणार?
‘मेघ’ गर्जनेमुळे पुण्यात सभा रद्द झाल्यानंतर गुरूवारी मनसे प्रमुख राज ठाकरेंची मुंबईत सभा होणार आहे. राज ठाकरे यांच्या मुंबईत दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेद्वारे राज ठाकरे विधनसभा निवडणुक प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. राज ठाकरे यांची सायंकाळी सहा वाजता पहिली सभा मुंबईतील सांताक्रुझमधील मराठा कॅालनीमध्ये आणि दुसरी सभा गोरेगावमधील आझाद मैदानात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान आरेतील झाडांची कत्तल आणि पीएमसी बँकेमुळे लाखो मुंबईकर संतापलेले असताना या दोन्ही विषयांशी भाजप आणि सेनेचा थेट संबंध असल्याने राज ठाकरे हा मुद्दा सभेत उचलण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्या पुण्यात राजगर्जना; नक्की काय बोलणार यावरून सत्ताधाऱ्यांची चिंता वाढली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पुण्यात कुठल्याही परिस्थितीत होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. पुण्यातील नातूबागेच्या जवळील सरस्वती शाळेच्या मैदानात राज ठाकरे यांच्या सभेची तयारी मनसैनिकांनी सुरू केली आहे. या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाषण करतील.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी: राज यांच्या सभेकडे प्रसार माध्यमं केंद्रित होण्याच्या चिंतेने उद्धव यांची सभा रद्द?
निवडणूक आली की नेत्यांची जाहीर सभांमधूनच जुगलबंदी सुरू होती. त्यात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आमने सामने आल्यानंतर ही जुगलबंदी टोकाला पोहचते. विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव हे पिंपरी चिंचवडमध्ये शिवसैनिकांना संबोधित करणार होते.
5 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या कारला अपघात; किरकोळ दुखापत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना अपघात झाल्याचं वृत्त आहे. अपघातग्रस्त गाड्यांमध्ये राज यांच्या पत्नी शर्मिला यांच्या कारचाही समावेश आहे. अपघातात शर्मिला ठाकरे यांना मुका मार लागला आहे तर, चालकासह अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. ठाकरे कुटुंब एकवीरा देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या; कोथरूडमध्ये आघाडीचा मनसेला पाठिंबा
भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची वर्णी लावली आहे. त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना संताप व्यक्त करताना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. त्यात दुसरी भर म्हणजे चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला ब्राह्मण समाजाने देखील आक्षेप नोंदवला होता.
5 वर्षांपूर्वी -
मनसेचे राहुल ढिकले आधीपासूनच भाजपच्या संपर्कात होते हे चौथ्या यादीत सिद्ध झालं
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने मुक्ताईनगर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं तिकीट कापत त्यांची कन्या रोहिनी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. तिकीट कापलं जाणं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
माहीम: मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आज शक्तिप्रदर्शन करत माहिम विधासभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघाची ओळख असलेल्या सिद्धीविनायक मंदिरापासून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि या रॅलीला मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माहीम विधानसभा शिवसेना आणि मनसेसाठी प्रतिष्ठेची आहे कारण याच मतदारसंघात सेनाभवन आणि राजगड देखील आहे. तसेच नेहमीच वर्दळ असणारं राज ठाकरे यांचं कृष्णकुंज हे निवासस्थान देखील याच मतदारसंघात आहे.
5 वर्षांपूर्वी -
हडपसर: मनसेचे वसंत मोरे यांचा शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल; तुफान गर्दी
मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे यांनी हडपसर मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सध्या प्रसार माध्यमं गृहीत धरत असली, तरी अनेक मतदारसंघातील त्यांची तगडी फिल्डिंग लागल्याचे प्रथम दर्शनी दिसते. त्यातीलच एक म्हणजे, मनसेचे पुण्यातील विद्यमान नगरसेवक वसंत मोरे आणि कार्यकर्त्यांचे लाडके तात्या हडपसर विधानसभा मतदारसंघात मोठी फिल्डिंग लावून आहेत. त्यांची मागील काही महिन्यांपासूनची तयारी पाहता स्वतः राज ठाकरेंनी तयारीला लाग असे आदेश आधीच दिले आहेत, असच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण ग्रामीण: मनसेचे प्रमोद पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला
मनसेचे नेते प्रमोद रतन पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज आज दाखल केला. कल्याण ग्रामीण मतदारसंघ २००९मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ताब्यात घेतला होता. त्यावेळी मनसेचे रमेश पाटील यांनी शिवसेनेला धोबीपछाड देत विधानसभा गाठली होती. मात्र २०१४मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे इथली समीकरणं बदलली आणि विधानसभा निवडणुकीत युती संपुष्टात आली तरी शिवसेना एनडीएचा घटक पक्ष असल्याने त्याचा थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना झाला होता आणि शिवसेनेचे सुभाष भोईर यांनी ८४, ११० मतं घेत विधानसभा गाठली होती, तर मनसेचे रमेश पाटील यांना ३९, ८९८ मतं मिळाली होती.
5 वर्षांपूर्वी -
घाटकोपरमधील कट्टर शिवसैनिक बोलतात, 'आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला'
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
नितीन नांदगावकरांमुळे सेनेला मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतांचा फटका बसण्याची शक्यता
‘जय महारष्ट्र, मी महाराष्ट्र्र सैनिक’, असे म्हणत सोशल मीडियावर खळखट्ट्याक करणाऱ्या मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी हातावर शिवबंधन बांधत मनसेची साथ सोडली आहे. नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. त्यांनी बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना धक्का बसला आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर चर्चा रंगली ती नितीन नांदगांवकर यांना मनसेने तिकीट का नाकारलं याचीच.
5 वर्षांपूर्वी -
नितीन नांदगावकर अचानक सेनेत गेले? नाही! अशा घडामोडी घडवल्या गेल्या: सविस्तर
‘जय महारष्ट्र, मी महाराष्ट्र्र सैनिक’, असे म्हणत सोशल मीडियावर खळखट्ट्याक करणाऱ्या मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी हातावर शिवबंधन बांधत मनसेची साथ सोडली आहे. नितीन नांदगावकर यांच्याकडे मनसेच्या वाहतूक सेनेचे सरचिटणीस पद होते. त्यांनी बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत नितीन नांदगावकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांना धक्का बसला आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर चर्चा रंगली ती नितीन नांदगांवकर यांना मनसेने तिकीट का नाकारलं याचीच.
5 वर्षांपूर्वी -
#VIDEO: पुणे-नाशिकमध्ये मनसेच्या या पुराव्यामुळे होऊ शकते भाजपाची पोलखोल
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, दक्षिण कराडमधून अतुल भोसले यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तब्बल १२ विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
काकाचा दिलदारपणा दिसणार? मनसे वरळीतून उमेदवार देणार नसल्याचं वृत्त
शिवसेनेने मंगळवारी जाहीर केलेल्या पहिल्यात ७० उमेदवारांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. इथले शिवसेनेचे प्रमुख विरोधक असलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन शहराध्यक्ष सचिन अहिर यांनाच शिवसेनेने पक्षात घेतल्यामुळे आता हा शिवसेनेसाठी ‘सेफ’ मतदारसंघ झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे त्यांच्याकडून आदित्य ठाकरेंना कडवी टक्कर दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
5 वर्षांपूर्वी -
मनसे उमेदवारांची पहिली यादी जाहीर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण २७ उमेदवार आहेत असून अनेक नवोदितांना सुवर्ण साधी मिळावी आहे. त्यात माहीम मतदारसंघातून माजी आमदार नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सवर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत – NSE: JIOFIN
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL
-
Reliance Power Share Price | स्वस्त मल्टिबॅगर रिलायन्स पॉवर शेअर सुसाट तेजीत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER