महत्वाच्या बातम्या
-
रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबाबत अमित ठाकरे व मनसे शिष्टमंडळ रेल्वे महाव्यवस्थापकांची आज भेट घेणार
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली रेल्वेसेवा आसपासच्या शहरांमधील प्रवाशांचा देखील दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. दरम्यान याच सेवेचा लाभ घेणाऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढती लोकसभा आणि त्या तुलनेत रेल्वेच्या कमी फेऱ्या देखील त्यामागील मुख्य कारण आहे. मात्र त्यात विशेष अडचणी या महिलावर्गाला आहेत.
6 वर्षांपूर्वी -
लोकसभा निवडणुकीपूर्वी मतभिन्नता होती, पण आता मत परिवर्तन झाले आहे: अशोक चव्हाण
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला पराभूत करण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस पक्ष सध्या अनुकूल असल्याचे संकेत काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना दिले आहेत. चव्हाण नागपुरात सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी हे ही प्रतिक्रिया नोंदवली.
6 वर्षांपूर्वी -
ईव्हीएम मुद्यावरून राज ठाकरे आणि सोनिया गांधींची भेट; आंदोलन पेटणार?
नवी दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लवकरच महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण समजली जाते. दोन्ही नेत्यांमध्ये कार् सविस्तर चर्चा झाली ते समजू शकलेले नसलं तरी ईव्हीएम हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-एनसीपीच्या आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील विधानसभा निवडणुक फक्त व फक्त कागदी मतपत्रिकांवरच व्हाव्यात: राज ठाकरे
ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असल्यानं महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली भारतीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्य निवडणूक आयोगाची प्रत्यक्ष भेट देखील घेतली. मागील २० वर्षांपासून ईव्हीएमवर सर्वांनीच शंका घेतली आहे. २०१४ आधी भारतीय जनता पक्षाने देखील ईव्हीएमबद्दल संशय उपस्थित केला होता. परंतु २०१४ नंतर त्यांचा पूर्ण सूर बदलला, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुख्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना आजच्या भेटीबद्दलची माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
'ईव्हीएम टू बॅलेट पेपर', राज ठाकरे दिल्लीत दाखल; मनसे आक्रमक होण्याची शक्यता
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (८ जुलै) मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेणार आहेत. EVM मशिन्सच्या संदर्भात जो वाद निर्माण झाला होता त्यामुद्यावर राज हे आयुक्तांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. मनसेसहीत अनेक राजकीय पक्षांनी EVMवर संशय दाट व्यक्त केला होता. EVM हॅक होऊ शकतं त्यामुळे यापुढच्या निवडणुका या EVM मशिन्सव्दारेच घ्याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. राज ठाकरे आजच दिल्लीत दाखल झालेत.
6 वर्षांपूर्वी -
खळखट्याक: शेतकऱ्यांना लुटणाऱ्या बँक अधिकाऱ्याला चोप; मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकरांना अटक
ग्रामीण भागातील सामान्य जनतेला एका योजनेअंतर्गत प्रलोभनं दाखवून सहारा बँकेने अनेकांकडून डिपॉझीटच्या नावाने भरगोस रक्कम जमा केली. दरम्यान, मुदत संपून देखील सदर बँकेने संबंधित ठेवीदारांच्या बँक अकाऊंवर कोणतीही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आणि उपाध्यक्ष राजू उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्याशी संपर्क साधला.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
शहर नियोजनाचा अर्थ ते सांगत राहिले; पण मुंबईकर २५ वर्ष 'अर्थ'वेड्या पक्षाच्या प्रेमात तल्लीन? सविस्तर
मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
महानगरपालिकेच्या व नगरसेवकांच्या चुकांसाठी मोदींना दोष देऊ नका: मनसे नेते अनिल शिदोरे
लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाच्या घोषणांना अक्षरशः उघड पाडल होत. भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचे देशात प्रखर विरोधक म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहण्यास सुरवात झाली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी उठसूट नरेंद्र मोदींना दोष देऊ नका अस वक्तव्य केल आहे.
6 वर्षांपूर्वी -
पोटनिवडणुक: कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी
आज राज्यातील अनेक नगरपरिषदेतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. दरम्यान कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ मधून मनसेचे बाळकृष्ण ठाकुर विजयी झाले आहेत. सदर निवडणूक अत्यंत अटीतटीची झाल्याचं पाहायल मिळालं, अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत केवळ ६ मतांच्या फरकाने मनसेचे उमेदवार बाळकृष्ण शंकर ठाकुर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय प्राप्त केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: बिल्डरकडून फसवणूक; गुजराती कुटुंबसुद्धा मनसेच्या आश्रयाला; दणका मिळताच २१ लाख मिळाले
मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांकडून सामान्य लोकांना लुबाडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत. तसाच एक प्रकार मुंबईतील मालाड येथे राहणाऱ्या गुजराती कुटंबासोबत घडला आहे. संबंधित बिल्डरने या गुजराती कुटंबाला तब्बल २१ लाखांचा चुना लावला होता. प्रकल्पात पैसे गुंतवून देखील मागील ५ वर्ष ना घरचा ताबा मिळत होता, ना पैसे परत दिले जात होते. संबधित कुटुंबाचे पैसे जवळपास बुडाल्यातच जमा होते.
6 वर्षांपूर्वी -
बदलत्या राजकारणाचं आधुनिक तंत्र सेनेने स्वीकारलं; पण राज ठाकरे ते स्वीकारतील का? सविस्तर
सध्या देशातील राजकीय तंत्र झपाट्याने बदलण्यास सुरुवात आली आहे. अगदी २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत हे तंत्र भाजपने यशस्वीपणे राबवलं आणि ऐतिहासिक विजय प्राप्त केला होता. कालांतराने राजकारणातील ते गणित समजून घेण्याचा आणि यशस्वी होण्याचं तंत्र देशातील इतर प्रमुख पक्षांनी देखील समजून घेऊन अमलात आणण्याचा प्रयत्न केला. आजच्या घडीला ज्या पक्षांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ३-४ महिने चिकाटीने आणि योजनाबद्धपणे राबवलं तेच देश व राज्यात निवडून आले किंवा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले. राजकारणातील हे औटसोर्सिंगच हे तंत्र जो पक्ष अमलात आणेल तोच भविष्यात स्वतःचं अस्तित्व टिकवेल अशीच परिस्थिती आहे.
6 वर्षांपूर्वी -
शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य; मनसेने मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
महाराष्ट्रात मराठी सक्तीचीच आहे हे महाराष्ट्राला सांगितल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि आभार, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अनिल शिदोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत. राज्यातील एसएससी, आयसीएसई आणि सीबीएसई अशा सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणं अनिवार्य आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. यावरच अनिल शिदोरे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
गॅंगस्टर सुरेश पुजारी'कडून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी
कुख्यात गॅंगस्टर सुरेश पुजारी टोळीकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सदर प्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने मुंबईतून संदेश शेट्टी याला अटक केली, तर पुजारी टोळीतील इतर आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावणाऱ्या पुजारी टोळीच्या शेट्टी याला जाधव यांनी विनंती केली. तेव्हा, संबंधित प्रकरणात पडू नको अन्यथा ठार मारण्याच्या धमकीचा फोन पुजारीने परदेशातून केला होता असं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
तीच तारीख -तोच महिना! राज यांच्या व्यंगचित्रातला मोदींचा 'तो' खासगी 'प्लॅन' सत्य ठरला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १३ जून २०१८ मध्ये एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं होतं. त्यात राज ठाकरे यांनी यूपीएससी परीक्षा अथक मेहनतीने उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत उच्च पदावर विराजमान होणाऱ्या अधिकाऱ्यांचे भवितव्य आणि UPSCच्या संभाव्य विद्यार्थ्यांच्या डोकावर मोदी खाजगी क्षेत्रातील उच्च पदावरील अधिकाऱ्यांची नेमणूक करतील असा ठोकताळा मांडला होता. मात्र आज त्याच तारखेला आणि त्याच महिन्यात म्हणजे १३ जून २०१९ रोजी राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मांडलेला तो राजकीय ‘ठोकताळा’ सत्यात उतरला आहे, असंच मान्य करावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
तर सर्वच पक्षांना धडकी भरेल..प्रकाश आंबेडकर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी राजकीय उलथापालट होण्याची शक्यता आहे. दरम्यान जर अशी युती सत्यात उतरल्यास प्रचंड वलय असलेले दोन नेते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यास राज्यातील समीकरणं बदलतील अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व पक्षांसोबत राहावे अशी इच्छा असून आपण त्यासाठी प्रयत्न देखील करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी यावेळी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
खासदार अमोल कोल्हे थोड्याच वेळात राज ठाकरेंच्या भेटीला ‘कृष्णकुंज’वर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर ठरलेले शिरूरचे खासदार तसेच अभिनेते अमोल कोल्हे आज ‘कृष्णकुंज’वर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी ११.३० वाजता ही भेट होणार असल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत डॉ. अमोल कोल्हे यांनी दमदार कामगिरी केली होती.
6 वर्षांपूर्वी -
वरळी की शिवडी विधानसभा? आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार?
मागील काही दिवसांपासून युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची राजकीय चर्चा रंगली होती. मात्र प्रत्यक्ष ते अधिकृतपणे शिवसेनेमध्ये कोणीही बोलण्यास तयार नाही. परंतु आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं खात्रीलायक वृत्त प्रसार माध्यमांच्या हाती आहे. त्यासाठी वरळी किंवा शिवडी विधानसभा मतदारसंघ निश्चित करण्यासाठी अंतर्गत चाचपणी सुरु आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेत 'त्या' १५३ जागांवर मनसेला मोठी सुवर्णसंधी: प्रकाश आंबेडकर
आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘कमबॅक’ करण्यासाठी सुवर्णसंधी असेल, असे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. राज ठाकरे यांनी ही संधी साधली नाही, तर अशी संधी त्यांना कधीही मिळणार नाही, असा सल्लाही यावेळी आंबेडकर यांनी दिला.
6 वर्षांपूर्वी -
दक्षिणात्य नेत्यांच्या हिंदी भाषा विरोधानंतर महाराष्ट्रात मनसेचा हिंदी भाषेवरून संताप
हिंदी भाषेवरून दक्षिणेच्या राज्यातील नेत्यांकडून अत्यंत कडवट प्रतिक्रया येत असताना महाराष्ट्रात देखील हा विषय पेट घेण्याची शक्यता आहे. हिंदी भाषा शिकवण्याच्या प्रस्ताव देणारया ‘राष्ट्रीय शिक्षा निती २०१९’च्या मसुद्यावरून दिवसेंदिवस वाद चिघळत चालला आहे. देशभरातील गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकवण्याचा प्रस्ताव देण्याच्या या मसुद्याला तामिळनाडूमधून कडाडून विरोध करण्यात येतो आहे नि त्याविरोधात दक्षिणात्य नेत्यांच्या अत्यंत तिखट प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मुद्यावर आक्रमक झाली आहे.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन