महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार | मराठी आणि हिंदुत्वाचा अजेंडा केंद्रस्थानी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान एका दिवशी अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीबाबतची बैठक राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाळा नांदगावकर बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा मेगा प्लॅन केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शत प्रतिशत भाजपा | भाजपच्या राजकारणापुढे मनसे सतर्क की पुन्हा त्याच चुका? - सविस्तर वृत्त
मागील अनेक दिवस भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात रंगताना दिसत आहे. अर्थात भाजप नेत्यांकडून मनसेसोबत आता तरी युती होणार नाही असं म्हटलं गेलं होतं. अशात आता भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) भेट घेतली. आमदार प्रसाद लाड यांच्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यानिमित्ताने ही भेट तर नाही ना असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. मात्र, आजची भेट ही वैयक्तिक होती हे प्रसाद लाड यांनी जोर देऊन सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
अर्णबचं चॅट | पुलवामा हल्ला ते लोकसभा २०१९ | राज ठाकरेंचा तो आरोप आज...
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मोठ्या प्रमाणात घडलेल्या घटनेत रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या व्हाट्सअँप संवादाचा 500 पानी दस्तऐवज सोशल मीडियावर लीक झाल्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. संबंधित चॅटमध्ये गोस्वामी यांचे पंतप्रधान कार्यालय आणि सत्तारूढ सरकारच्या सदस्यांशी जवळीक, टीआरपी त्यांच्या बाजूने झुकवणे आणि भाजपा सरकारची मदत घेण्याचे प्रयत्न आणि बरेच काही समोर येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अत्याचार झाले तेव्हाच गुन्हा दाखल करायचा होता | संमतीने ठेवलेले संबंध हा बलात्कार नसतो
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | वसंत गीतेंची मिसळ पे चर्चा | राष्ट्रवादी-शिवसेना की पुन्हा मनसे?
इतर पक्षातील नेते भाजपात येत नसल्याने माजी आमदार बाळासाहेब यांना पुन्हा पक्षात घेऊन भाजपने आमच्याकडे भरती होतं आहे असा केविलवाणा प्रयत्न केला होता. मात्र राजकीय पत संपलेले बाळासाहेब सानप कोणत्याही पक्षाला नकोसे होते आणि अखेर अपरिहार्यता म्हणून पुन्हा तिकीट नाकारलेल्या भाजपमध्ये सामील झाले. विशेष म्हणजे भाजपने देखील एखादा माजी मुख्यमंत्री भाजपात येतोय असा प्रचार सुरु केला. मात्र सानप यांच्या येण्याने भाजपाला अजून पणवती लागली आहे. कारण नाराज नेते भाजप सोडू लागले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन काळात सर्वाधिक मदतीला धावला महाराष्ट्र सैनिक | पण सर्व्हेमध्ये हे लोक प्रतिनिधी
लॉकडाउन दरम्यानचा म्हणजे कोरोना सर्वाधिक उच्चांकावर असताना सामान्य माणूस प्रचंड हतबल आणि त्रासलेला पाहायला मिळाला होता. कोरोना बाबतीत अनेक गैरसमज देखील मोठ्या प्रमाणावर पसरल्याने कोणीही कोणाच्या मदतीला जाण्यास कचरत होते. एखाद्या घरात कोरोना पेशंट असेल तर त्यांना अक्षरशः वाळीत टाकावं असे उद्योग सुरु झाले होते.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणूक | मोर्चेबांधणीसाठी स्वतः राज ठाकरे पुणे दौऱ्यावर
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता, कृष्णकुंज | शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून विविध संघटना आणि सामान्य लोकं आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडून मदतीची अपेक्षा करत आहेत. विशेष म्हणजे त्यातील अनेक प्रश्न तडीस देखील लागत असल्याने अशी भेट घेणाऱ्यांची संख्या अजून वाढताना दिसत आहे. शिवसेनेकडे राज्याचं मुख्यमंत्री पद असताना देखील मनसेकडे समस्या घेऊन जाणाऱ्यांची संख्या अजून वाढली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे यांची महत्वाच्या विषयांवर शरद पवारांशी फोनवर चर्चा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या इमारतीमध्ये ग्रिलचे काम घेण्याच्या वादातुन
उल्हासनगर शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षावर अंबरनाथ शहरात झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी सायंकाळी आणखी एका मनसे नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली होती. मनसे अंबरनाथ उपशहर अध्यक्ष राकेश पाटील यांची तलवारीने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडली.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना २००० बिल येत होतं तिथे १० हजार बिल येत आहे | राज्य सरकारला माहिती आहे मग..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कलर्सला खऱ्या मराठीची दहशत | राज ठाकरेंकडे मराठीत | मुख्यमंत्र्यांकडे इंग्रजीत माफीनामा
जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल आक्षेपार्ह शब्द उच्चारल्याने कलर्स वाहीनीला माफीनामा लिहावा लागलाय. जान सानू यानं देखील बिग बॉससमोर स्वत: च्या कृत्याची माफी मागितली आहे. ही क्लीप वायरल झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत कलर्सने २४ तासात माफी न मागितल्यास प्रक्षेपण बंद पाडू असा इशारा दिला होता. त्यानंतर कलर्स वाहिनीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपला माफीनामा पाठवला पण या दोन्ही माफीनाम्यात भाषेचा फरक होता. मुख्यमंत्र्यांना पाठवलेला माफीनामा कलर्सने इंग्रजीत तर मनसेला पाठवलेला माफीनामा मराठी भाषेत लिहीला होता. यावरुन मनसेने राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
4 वर्षांपूर्वी -
चर्चा तर होणारच | शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत आज एका मंचावर?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊ आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले तीन दिग्गज एकाच मंचावर येणार आहेत. प्रख्यात लेखक अंबरिश मिश्र यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी हे तीन दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे कारण या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या तिन्ही नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. ‘चौकात उधळले मोती’ या अंबरीश मिश्र यांनी लिहिलेल्या पुस्तकांचं प्रकाशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणार आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊ आणि राज ठाकरे यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मातृभाषेचं महत्व त्यांनाही आहे | फक्त ते त्यांच्या निदर्शनास आणा | मनसेने पुन्हा सिद्ध केलं
मराठी भाषेसाठी नेहमीच आग्रही आणि आक्रमक असणाऱ्या मनसेने भाषेबद्दलच्या ठामपणावर पून्हा एक गोष्ट सिद्ध केली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेची थेट अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनीही दखल घेतली आहे. अॅमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याची मनसेची मागणी त्यांनी मान्य केली आहे आणि त्याबतात अधिकृत ई-मेल देखील शेअर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिला बचत गटातील महिलांचे कर्ज माफ करावं | मनसेची अर्थमंत्र्यांकडे मागणी
महिला बचत गटातील महिलांचे सर्व कर्ज माफ करण्याची मागणी मनसेने केली आहे. तसेच बचतगटातील महिलांना मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या दंडेलशाहीविरुद्ध कठोर पावलं उचलावीत ह्यासाठी आज मनसेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. महिला बचतगटांनी मायक्रो फायनान्स कंपनी कडून घेतलेले कर्ज ते वर्षानुवर्षे नियमितपणे फेडत असतांना सध्याच्या काळात या कर्जाची परतफेड ही अशक्य होतं आहे. त्यामुळे संबंधित महिलांचे कर्ज माफ करण्याचे निवेदन मनसेने अजित पवार यांना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज भेटीचा पायगुण | उद्यापासून सर्व ग्रंथालये सुरू होणार
उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
...आणि मूर्तिकारांना राज ठाकरेंनी दुसरा व्यावसायिक धोका सुद्धा लक्षात आणून दिला
लॉकडाऊनच्या काळात जिम मालक चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर पेणमधील मूर्तीकार यांनी आज राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी, या मागणीसाठी मूर्तीकारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
अखेर 'राज' भेटीनंतर मुंबईतील डबेवाल्यांसाठी लोकलचे दरवाजे खुले झाले
राज्यातील रेस्टॉरंट, बार आणि फूड कोर्ट सुरू करण्यास अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ५ ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट आणि बार सुरू होणार आहेत. पण ५० टक्के क्षमतेने रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने अनलॉक-5 चे नियम आज जाहीर केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना ८ तास ड्युटी | ८ तास प्रवास | मुंबईकरांसाठी उद्या मनसेचं लोकल प्रवास आंदोलन
मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचा ठाकरे ब्रँड सांभाळण्यास राज ठाकरे समर्थ | संदीप देशपांडेची वयक्तिक प्रतिक्रिया
अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन