भाजपाला केवळ तगडी टक्कर देणे नव्हे तर मोठ्या बहुमताने पराभूत करण्याच्या योजनेवर राहुल गांधी केंद्रित, राजस्थानमध्ये कर्नाटक पॅटर्न
Rajasthan Politics | राजस्थान काँग्रेससंदर्भात दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अचानक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव घेतलं आणि बैठकीतअशोक गेहलोत ते सचिन पायलट यांच्यसह सर्वजण हसू लागले. गेहलोतजी सुद्धा लॅपटॉपमध्ये आहेत, त्यांनाही दाखवा असं ते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना म्हणाले, तेवढ्यात मागून नेते म्हणाले की, डोक्यामागे स्क्रीन आहे, तेव्हा राहुल गांधी सुद्धा हसू लागले. विशेष म्हणजे केवळ विजय मिळविण्यासाठी भाजपाला तगड आव्हान देणे नव्हे तर काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांचे पक्षांतर्गत असलेले वाद मिटविण्यावर देखील राहुल गांधी व्यक्तिगत पातळीवर केंद्रित झाल्यावर पाहायला मिळाले आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या टीममध्ये भलताच जोश पाहायला मिळत आहे.
2 वर्षांपूर्वी