महत्वाच्या बातम्या
-
नाव ने घेता राज ठाकरेंची प्रथमच टीका | त्यावर अनेक मराठी नेटिझन्सचे प्रतिप्रश्न | तर अमराठी घेत आहेत मजा
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय.एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तुत्व समजू लागतो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरू होतो, अशी पहिली प्रतिक्रिया राज यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले.
3 वर्षांपूर्वी -
Raj Thackeray Corona Positive | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना कोरोनाची लागण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज यांच्यासोबत त्यांच्या आईंलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघांनाही सौम्य लक्षणे असल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल (Raj Thackeray Corona Positive) करण्यात आलं आहे. ही माहिती मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. विशेष म्हणजे फक्त राज ठाकरेच नाही तर त्यांच्या आई यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.
3 वर्षांपूर्वी -
पुणे महानगरपालिका निवडणूक | युतीच्या गप्पा सोडून स्वबळाच्या तयारीला लागा | राज ठाकरे यांचा संदेश
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच त्यासाठी भाजपाही इच्छुक असेल असे मनसे अध्यक्षांना वाटत नाही. .दुसरीकडे या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा संदेश मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. परंतु , आता हि चर्चा थांबवावी असा संदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना धाडल्याचे वृत्त आहे. तसेच पुण्यातही स्वबळाची तयारी करा असं देखील आवर्जून सांगितलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Nashik Municipal Elections 2022 | नाशिकसाठी मनसेचे दोन जिल्हाध्यक्ष तर शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. हॉटेल एसएके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) ही यादी जाहीर करण्यात आली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांसह 122 नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
नाशिक मनसेत मोठे फेरबदल होणार | अशोक मुर्तडक समर्थक अनंता सूर्यवंशींच जिल्हाध्यक्ष पद जाण्याची शक्यता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे 22 सप्टेंबरपासून नाशिक (दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे
3 वर्षांपूर्वी -
पोलिसांकडून सुटला की आमच्याकडून फुटला | त्याची सर्व बोटं छाटली जातील | राज ठाकरे ठाण्यात
महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील फेरीवाल्यांविरोधात मंगळवारपासून जोरदार कारवाईला सुरुवात केली.
3 वर्षांपूर्वी -
लोकल रेल्वे प्रवास | राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती पत्रं दिलं होतं | आज मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार
मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री आठ वाजता सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, आज (दि ९) कोरोना राज्य कृती दलाची बैठक बोलावली आहे. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे तेथील निर्बंध उठवण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रार्थनास्थळे, हाॅटेल आणि माॅल्स उघडण्यास काही अटींवर परवानगी देण्यात येईल. तसेच सामन्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी काही अटींवर मान्यता दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
सदिच्छा भेटीआडून भाजप मनसे पदाधिकाऱ्यांना गळाला लावणार? | भाजप आमदार मनसे शाखेत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भारतीय जनता पक्ष करणार नसल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. काही दिवस अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीमुळे चर्चांना चांगलाच उधाण आलं होतं. जिथे भाजप मनसे युतीची चर्चा आहे तिथे या दोघांच्याही भेटीगाठी वाढल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे बरं बोलत नाहीत तर खरं बोलतात | १-२ दिवसात माझी त्यांच्याशी भेट होणार आहे - चंद्रकांत पाटील
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीची चर्चा सुरु होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेच्या नेत्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असताना देखील भाजपकडून विरुद्ध संकेत दिले जातं आहेत.
3 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या दत्तक नाशिकमध्ये मनसेचा स्वबळाचा नारा | भाजपसोबत युती नाहीच - संदीप देशपांडे
शिवसेनेसोबत राजकीय अंतर वाढल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या जवळीक वाढण्यावर वारंवार वक्तव्य करताना दिसत आहेत. अगदी फडणवीसांपासून चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात जर तर जोडत मोठी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे मोठा राजकीय संभ्रम पाहायला मिळत होता. मात्र याच संभ्रमावर मनसेतून मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कारण या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | पत्रकार फोटोग्राफरकडून राज यांचे वारंवार फोटोज | राज गमतीने म्हणाले 'मी काय कुंद्रा आहे का?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आगामी पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणावर बैठका आणि पक्ष बळकटीच्या अनुषंगाने पक्षांतर्गत चर्चा देखील सुरु आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला मूळ विषयावर केंद्रित असलेले राज ठाकरे पत्रकारांसोबत वेळ खर्ची घालताना दिसत नसल्याने अनेक पत्रकारांच्या रिपोर्टींग संदर्भात अडचण होतं आहेत.
3 वर्षांपूर्वी -
आगामी नाशिक आणि पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेची मोर्चेबांधणी
महानगरपालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चांगलीच कंबर कसलेली आहे हे दिसून येतंय. मनसे नेते अमित राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील पुण्यात आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राज आणि अमित ठाकरेंचा पुणे-नाशिक दौरा महत्त्वाचा आहे.
3 वर्षांपूर्वी -
भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय? | येत्या काही दिवसात राज ठाकरेंची भेट घेईन - सुधीर मुनगंटीवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
3 वर्षांपूर्वी -
उत्तर भारतीयांसंदर्भातील राज ठाकरेंच्या त्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांकडे पोहोचल्या | भाजप काय भूमिका घेणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील नाशिकमधील भेट बऱ्याच प्रयत्नानंतर घडून आली होती. दोन्ही नेते पार्किंग लॉटमध्ये 15 मिनिटं बोलत उभे होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी या भेटीचा तपशील प्रसारमाध्यमांना सांगितला होता.
3 वर्षांपूर्वी -
राज्यात पावसाचं थैमान | लोकांच्या मदतीसाठी राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना पत्र
राज्यात पावसाने थैमान घातलंय. आज महाराष्ट्राला हादरविणाऱ्या तीन मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. महाडच्या तळीये गावात दरड कोसळून 32 लोकांचा लोकांचा मृत्यू झालाय. साताऱ्यातल्या आंबेघरमध्ये दरड कोसळून 12 लोकांचा मृत्यू झालाय. तर तिकडे चिपळूणमध्येही 17 घरांवर दरड कोसळून जवळपास 20 लोकं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. याच विषयाला अनुसरून आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सैनिकांना पुढे यावं, तातडीने जशी जमेल तशी मदत तरावी, अशा आशयाचं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांना प्रवासाचा प्रचंड त्रास होतोय | मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
करोनाची दुसरी लाट ओसरत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. त्यामुळे हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून, नागरिक कामानिमित्ताने घराबाहेर पडू लागले आहेत. असं असलं तरी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत नागरिकांना प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. या मुद्द्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नियम पाळू, पण दहीहंडी साजरी करणारच | मनसेचा निश्चय
गेल्या वर्षी 31ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दहीहंडीची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात मागील वर्षी शुकशुकाट पाहायला मिळाला. तर आयोजकांनी आरोग्य उत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं. मनसेने देखील हा सण रद्द करून ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी नौपाडा येथील त्यांच्या कार्यालयात गोकुळ अष्टमीचा जन्म उत्सव पूजा अर्चाकरून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.
4 वर्षांपूर्वी -
पुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात
पूढील वर्षी होणाऱ्या पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे जोरदार तयारीला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सलग ३ दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर असून, शहरातील सर्व विभागांमधील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत, त्यांचे म्हणणे जाणून घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कामाचा उत्साह वाढावा व पक्षाचे काम अधिक जोमाने व्हावे, यासाठी राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांसाठी एक त्यांना हवी हवी अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
'लाव रे तो व्हिडिओ' नंतर राज ठाकरेंचं आता 'बघा रे माझे व्हिडिओ' | 'ते' व्हिडिओ भाजपाला पाठवणार
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जवळपास १० जंगी सभा घेत मोदी सरकारविरोधात ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत त्यांची पोलखोल केली होती. विशेष म्हणजे मनसेने १० सभांच्या आयोजनावर जेवढी मेहनत आणि पैसा खर्च केला असेल, तेवढा त्यांनी स्वतःच्या पक्षातील किमान २ जागांसाठी जरी जोर लावला असता तर मनसेचा किमान एक खासदार आज लोकसभेत असला असता. मात्र त्यांनी तसे न करता केवळ मोदी विरोधात प्रचार करण्यासाठी जी ताकद आणि अर्थकारण खर्ची घातलं, त्याने त्यांच्याविरोधातच प्रश्न चिन्हं निर्माण झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
मनसेतील नेत्यांसोबत वाद वाढतच गेला आणि संयम संपल्याने मी शिवसेनेत प्रवेश केला - आदित्य शिरोडकर
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने धक्का दिला. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काल शिवबंधन हाती बांधलं. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर नीचांकी पातळीवर, चार्टवर ओव्हरसोल्ड, BUY करावा की SELL - NSE: TATATECH
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Saving on Salary | महागाई डोईजड होणार, महिना खर्च भागवण्यासाठी हा फॉम्युला फॉलो करा, 2 कोटी 70 लाख रुपये मिळतील
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL