महत्वाच्या बातम्या
-
निवडणुकांच्या तोंडावर मनसेत भूकंप होण्यास सुरुवात | राजन शिरोडकर यांचे पुत्र आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.
3 वर्षांपूर्वी -
लढवय्ये मनसे पदाधिकारी संतोष धुरींना वरळी विभागाध्यक्ष पदावरुन हटवलं | संजय जामदारांकडे जबाबदारी
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने काही संघात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्याची सुरुवात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मतदार संघातून केली आहे. मात्र ते करत असताना एका लढवय्या माजी नगरसेवकाला बाजूला करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.
3 वर्षांपूर्वी -
मराठा समाजाच्या लोकांची माथी भडकवणे इतकाच नेत्यांचा उद्देश आहे का? - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
3 वर्षांपूर्वी -
OBC आणि मराठा आरक्षण | एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा - राज ठाकरे
मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?, असा सवाल करतानाच आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पक्षीय नेत्यांना केला.
3 वर्षांपूर्वी -
मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतायत, याची वाट पाहतोय - राज ठाकरे
भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर राष्ट्र्वादीत जाहीर प्रवेश करताना माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी CD बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान 'जेम्स'चं निधन | घरातील सदस्यप्रमाणेच अखेरचा निरोप दिला
राज ठाकरेंच्या कुटुंबातील श्नान म्हणजेच त्यांच्या लाडक्या जेम्सचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास जेम्सचं निधन झालं आहे. राज ठाकरे हे श्वान प्रेमी आहेत. ग्रेट डेन प्रजातीचा जेम्सही अनेक वर्ष त्यांच्यासोबत होता. परंतु वयोमानानुसार जेम्सने काल अखेरचा श्वास घेतला. लाडक्या कुत्र्याच्या निधनाने राज ठाकरेंना धक्का बसला आहे. राज ठाकरेंकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉन्ड आणि शॉन आधी गेले, तर आता जेम्सही गेला आहे.
3 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांबद्दल ‘त्यांना’ किती आदर हे समोर आलं | शिवसेनेची तिखट प्रतिक्रिया
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या नावाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली. ‘नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचेच तेएक्स्टेंशन आहे, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असेल,’ असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं - राज ठाकरे
नवी मुंबई विमातनतळ नामकरणावरुन सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्य सरकारने विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दी बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत आहे. दरम्यान या वादावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं असून नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असावं असं मत मांडलं आहे. आमदार प्रशांत ठाकूर तसंच इतरांनी भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
कोविड काळात गर्दी होईल म्हणून ते थांबले होते | पण राज ठाकरेंचे झंझावाती दौरे सुरु होतील - बाळ नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते मुंबईतील लसीकरण उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाळा नांदगावकर यांनी मनसे आणि राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली. आगामी महापालिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रचंड तयारी झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या वाढदिवशी मनसेकडून विनामूल्य कोविशिल्डचे डोस
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस सोमवार १४ जून २०२१ रोजी आहे. या निमित्ताने मनसेच्यावतीने परळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये मोफत कोविशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. यासाठी होणारा सर्व खर्च मनसे करत आहे. मोफत लसीकरण कार्यक्रमासाठी उद्योजक नितीन नायक, निलेशकुमार प्रजापती, उजाला यादव, विजय जैन यांनी मोलाची मदत दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबईत भाजपाला धक्का | कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांचा मनसेत प्रवेश
भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मागील काही काळापासून पक्षाला राम राम ठोकून इतर पक्षात प्रवेशाचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये भाजपाला सर्वाधिक राजकीय धक्के हे शिवसेना राष्ट्रवादीने दिल्याचं पाहायला मिळतंय. आता त्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भर टाकून भाजपाची चिंता वाढवली आहे. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | पवार भेटीनंतर संभाजीराजे राज ठाकरेंची भेट घेणार
मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील अभ्यासक, जाणकार आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेत असलेले संभाजीराजे छत्रपती गुरुवारी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेणार आहेत. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संभाजीराजे राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दाखल होतील, असे सांगितले जात आहे. मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणून घ्यायचा संभाजीराजे यांचा प्रयत्न आहे.
4 वर्षांपूर्वी -
अधिक पैसे भरा अन्यथा रुग्णाची बॉडी देणार नाही असा दम भरणाऱ्या इस्पितळाचा मनसेने माज उतरवला आणि...
कोरोना आपत्तीने सध्या देशातील एकूण आरोग्य व्यस्थेची दुरावस्था समोर आणली आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांना औषधं, ऑक्सिजन आणि लसीचा तुटवडा असताना दुसऱ्या बाजूला इस्पितळांचा मानसिक आणि आर्थिक छळ देखील सहन करावा लागत आहे. तसाच भयानक आणि लाजिरवाणा प्रकार काल रात्री नालासोपाऱ्यात एका इस्पितळात घडला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाविरूध्दच्या लढाईत राज्य सरकारांची यंत्रणा अग्रणी | अशावेळी केंद्रानं रेमडेसिविर वितरणाची यंत्रणा स्वतःकडे ठेवू नये - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कोरोना स्थिती लक्षात घेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित महत्वाची मागणी केली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण, औषधांचा तुटवडा या सगळ्या बाबी लक्षात घेत राज्य सरकारच्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी पुन्हा एकदा ते धावून आले आहेत. रेमडेसिव्हीर व संबंधित अत्यावश्यक साहित्याची खरेदी आणि वितरण राज्य सरकारांकडेच द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली.
4 वर्षांपूर्वी -
हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी | राज ठाकरेंकडून मोदी सरकारचे आभार
केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य आणि लोकं संकटात | राज ठाकरेंच्या पंतप्रधानकडे मागण्या | भाजप टीका करण्यात व्यस्त
राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या आणि लसीचा होत असलेला तुटवडा यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. यात त्यांनी राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याच्या मागणीसह पाच मागण्या केल्या आहेत. राज्याच्या संकट काळात एकीकडे राज ठाकरे काय करता येईल आणि काय करायला पाहिजे यावर केंद्रित झालेले असताना भाजप नेते अवास्तव मागण्या करून केवळ टीका आणि राजकारण करण्यात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 8 एप्रिलपासून दिवसभर सभांचा धडाका लावला होता. त्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात अजित पवार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
मुबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे | पवार ED ऑफिसवर धडकले तर राज इडीला घाबरले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लेखक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या ब्लॉग मधून काही आरोप केले आहेत. ’जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षका खाली त्यांनी एक ब्लॉग लिहला. या लिखाणामुळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा