महत्वाच्या बातम्या
-
राज ठाकरेंनी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरलं पाहिजे | त्याने आपला जनाधार कळतो
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे ग्रामपंचायत निवडणुक लढविणार | सर्व जिल्हाध्यक्षांना ताकद पणाला लावण्याचे आदेश
महाराष्ट्रातील तब्बल १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा अधिकृत निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर (Election Commission announces election program for 14 thousand 234 Gram Panchayat in Maharashtra) करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर १८ जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
इतर नेत्यांचे प. बंगाल दौरे शांततेत | भाजप नेत्यांच्या दौऱ्यात प.बंगाल अशांत कसा होतो?
परप्रातीयांच्या आंदोलनावरून देशात परिचित असलेले राज ठाकरे यांनी देखील ईव्हीएम विरोधात सर्व पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन त्याच संदर्भात पश्चिम बंगालमध्ये जाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. राज ठाकरेंचा सर्वाधिक विरोध हा युपी बिहारच्या लोंढ्यांना आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर होरावून घेतला जातो. मात्र देशभरात राज ठाकरे यांना मराठी शिवाय कोणत्याही लोकांना विरोधच आहे असा सरसकट प्रचार माध्यमांनी केला आहे. माध्यमांनी अशी चुकीची ख्याती केलेले राज ठाकरे पश्चिम बंगालमध्ये जातात तरी कोणतीही शुल्लक अनुचित घटना संपूर्ण राज्यात घडत नाही. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असो किंवा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा या सर्वांच्या बाबतीत वारंवार घटना घडत असल्याने दुसरीच शंका व्यक्त करण्यात येतं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांबद्दल अश्लील कमेंट्स | पोलीस तक्रारीत रुपाली पाटील यांच्याकडून महाराष्ट्र सैनिकांचीही नावं
समाज माध्यमांवर अश्लील भाषा हा रोजचाच खेळ झाला आहे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय पोलीस तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत. मात्र सध्याच्या प्रकाशझोतात आलेल्या पोलीस तक्रारीत एका महाराष्ट्र महिला सैनिकानेच पुरुष महाराष्ट्र सैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मनसेच्या पुण्यातील उमेदवार रुपाली पाटील यांनी स्वतः पोस्ट टाकून त्याबद्दल माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसे अमराठी लोकांचा द्वेष करतो ही चुकीची समजूत | मनसेची प्रतिक्रिया
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येणार अशा चर्चा राजकीय वर्तृळात सुरु आहेत. यावर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका भारतीय जनता पक्षाला पूरक ठरेल का किंवा त्यांना सोबत घेतल्यास फायदा होईल का? हे आज सांगता येणार नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. आमची व्यापक भूमिका आहे. राज ठाकरे यांची मराठी माणसाकरता जी भूमिका आहे ती आम्हाला मान्यच आहे. पण त्याचवेळी आमचं अगदी स्पष्ट मत आहे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या हक्काकरता लढलंच पाहिजे. पण त्याच्या हक्काकरता लढणे म्हणजे अमराठी माणसाला वाळीत टाकणे, त्यांच्यावर हल्ले करणं हे आम्हाला मान्य नाही”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मांडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसेचा कृषी कायद्याला पाठिंबा? | मोदी सरकारला मागे न हटण्याची या नेत्याची थेट मागणी
नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिलं भरली | पण जनतेला सांगतात बिलं भरू नका - ऊर्जामंत्री
वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक होतं काल (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आणि राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला गेल्याच देखील निदर्शनास आलं. काही ठिकाणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई केली तर अनेकांना अटक देखील केलं होतं. दरम्यान आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला होते, तसेच सामान्य ग्राहकांना वीजबिल न भरण्याचं आवाहन देखील केलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
तुमचं ऑफिस तुमची जबाबदारी | मनसेचा महामोर्चा | वीजबिलावरून सरकारला शॉक
वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली (MNS party Protest against High Electricity Bills) असून आज (२६ नोव्हेंबर) राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसहित अनेक ठिकाणी महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळत असून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली असून अटक केली आहे. तर काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांना पक्षप्रमुख राज ठाकरेंनी सक्त आदेश दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
... मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का? | मनसेचं शिवसेनेला प्रतिउत्तर
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र त्यानंतर फडणवीसांनी मनसेसोबत युती शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण मनसे स्वीकारणार नाहीत | त्यांनी धोरण बदलायला हवं तर...
महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं आणि भारतीय जनता पक्षाचा राजकीय गेम केल्यानंतर भाजपचे नेते शहरी भागातील मराठी मतांवरून चिंतेत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमराठी मतच भाजपच्या केंद्रस्थानी असतील असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत. पण मराठी मतदार हा शिवसेनेचा बेस असल्याने भाजपाला मराठी मतांसाठी दुसरा साथीदार हवा आहे. त्यामुळे मनसे संबंधित निवडणूक पूर्व पुड्या सोडण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी - मनसेचं टीकास्त्र
दिवाळीनंतर देशात आणि महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी काल संवाद साधला. लशीवर अवलंबून न राहता, करोनाला रोखण्यासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी, तो आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे आज नेमकं काय बोलणार ? कुठला नवीन निर्णय जाहीर करणार? याबद्दल विविध तर्क-विर्तक लढवले जात होते. पण त्यांनी कुठलाही मोठा निर्णय जाहीर केला नाही. उलट पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.
4 वर्षांपूर्वी -
आमदार होण्याची स्वप्न पाहू नकोस | रुपाली पाटील यांना जीवे मारण्याची धमकी
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.आमदार होण्याची स्वप्नं पाहू नकोस, मारुन टाकीन, अशा शब्दात साताऱ्यातून फोन करत एका अज्ञात व्यक्तीने पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अज्ञाताविरोधात रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. तसंच धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे मनसे | एका बाजूला इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश | तर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर इतर पक्ष तसेच सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला जुने पदाधिकारी एकामागे एक असे राजीनामे देत अविनाश जाधव यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळ्याचं कारण देत आहेत. एखादा पदाधिकारी पक्ष सोडताना असे आरोप करत असेल तर संबंधित पदाधिकऱ्याचं राजकारण असू शकतं. मात्र यापूर्वी देखील राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी हेच एकमेव कारण पुढे करत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागू शकतात. शिवसेनेचं ठाण्यातील संघटन अत्यंत मजबूत असल्याने त्यांना काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी सोडून घेल्याने काहीच फरक पडणार नाही. मात्र ठाणे मनसेच्या बाबतीत फेसबुकवर तसं चित्र दिसत असलं तरी जमिनीवरील चित्र वेगळं आहे.
4 वर्षांपूर्वी -
नागरिकांनी घाबरून वाढीव वीजबिलं भरु नयेत | आम्ही ग्राहकांसोबत - मनसे आवाहन
कोरोना काळात आलेली वाढीव वीजबिलं सोमवारपर्यंत माफ करा, अन्यथा मनसेच्यावतीनं राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा अल्टिमेटम मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. त्यामुळे सरकारला ठिकाण्यावर आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावं, जर वीज मंडळाचे कर्मचारी वीज कनेक्शन कापायला आले तर मनसेचे कार्यकर्ते ग्राहकांसोबत असतील.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणूक | भाजप पुड्या सोडेल पण मनसे पुन्हा तीच चूक करणार? - सविस्तर वृत्त
मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकावण्याचा निर्धार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेला महापालिका निवडणुकीत मात देण्यासाठी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनसे- भाजप युतीबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्यपाल राज भेट सामान्यांना फलदायी | वीज बिलाबाबत ऊर्जा मंत्र्यांकडून दिवाळीपूर्वीच
महाराष्ट्र वाढीव वीज बिलांवरून सामान्य लोकांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच झळ बसली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सामान्य लोकांमध्ये सरकार आणि वीज पुरवठा कंपन्यांविरोधात रोष पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वाधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यासाठी अनेक आंदोलनं तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची देखील भेट घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
अकरावी प्रवेश | राज ठाकरेंची शिक्षण मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा | उद्या निर्णय अपेक्षित
बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग निघत नसल्याने कोचिंग क्लासच्या शिष्टमंडळाने आणि पालकांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेऊन सदर विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. राज्य सरकारच्या निर्णयांमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली आणि नेमकी कॉलेजेस केव्हा सुरु होणार याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न निर्नाम झाल्याने अनेकांची भविष्य टांगणीला लागली आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांची अॅडमिशन झाली आहेत, यावर राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा झाल्याचं वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात लोकनियुक्त सरकार | राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान
महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, सरकार लोकनियुक्त आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे, कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंना बहुतेक मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची अडचण वाटत असावी | सेनेनं डिवचलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली होती. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले होते.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट | शरद पवारांना भेटण्याचा सल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. राज्यातील वाढीव वीज बिल प्रश्नाविषयी राज ठाकरेंनी भेट घेतली आहे. यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सल्ला घेण्यास राज ठाकरे यांना सांगितले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- EPFO Passbook | पगारातून दरमहा EPF चे पैसे कापले जात आहेत, खात्यात किती रक्कम जमा आहे झटक्यात तपासून घ्या
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: HAL
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 35 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: IRFC
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Gold Rate Today | बापरे, आज सोन्याच्या भाव मजबूत महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल