महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | कोर्टाने आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिन्यांच्या कारावास ठोठावला
वरुड येथील तत्कालीन तहसीलदाराला अर्वाच्च शिवीगाळ करून मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना सोमवारी जिल्हा न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासासह 45 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षेचा समावेशही करण्यात आला आहे. देवेंद्र भुयार सध्या मोर्शी-वरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी म्हणजे शेतकऱ्यांनी गावात देवाच्या नावानं सोडलेला वळू - सदाभाऊ खोत
राज्यात दूध दरवाढावरुन तीव्र आंदोलन सुरु करण्यात आले आहे. हे आंदोलन विरोधी पक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आंदोलनात सहभाग घेत राज्यातील महाविवास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दूध भुकटीच्या आयातीबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांनादेखील प्रत्युत्तर दिले.
4 वर्षांपूर्वी -
राज्यभर दूध दरवाढीवरुन आंदोलक रस्त्यावर, हजारो लिटर दूध रस्त्यांवर ओतले
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव
एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अब्दुल सत्तारां'सारख्या उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी: राजू शेट्टी
महाविकासआघाडी सरकारने केलेल्या दोन लाख रुपयांच्या कर्जमाफीसंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा सल्ला देणा-या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांमध्ये जाऊन ते काय म्हणतात हे जाणून घ्यावे. सोबतच अशा उथळ मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनीच कारवाई करावी, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, राज्य सरकारने पुनर्विचार करावा: राजू शेट्टी
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. मात्र सरसकट कर्जमाफी करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केल्याची भावना आता शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मदत तुटपुंजी! काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही: राजू शेट्टी
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी अजून सत्तास्थापन झालेली नसली तरी इतर पक्ष मात्र दैनंदिन पक्षीय भूमिकेकडे केंद्रित झाले आहेत. त्यालाच अनुसरून राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नव्या आंदोलनात उतरले आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार, गाडी पेटवली
राज्यात मतदानाला सुरुवात झाली असतानाच, अमरावतीतील मोर्शी विधानसभा मतदारसंघात जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली आहे. महाआघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी मतदारसंघातील उमेदवार देवेंद्र भुयार यांना अज्ञातांनी मारहाण केली. तसंच त्यांची कारही पेटवून दिली. या घटनेमुळं परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
रविकांत तुपकर यांची घरवापसी; पुन्हा येणार स्वाभिमान पक्षात
काही दिवसांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साथ सोडलेले राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक रविकांत तुपकर पुन्हा घरवापसी करणार आहेत. आज, सायंकाळी ते स्वाभिमान पक्षात पुन्हा प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी तुपकर यांनी स्वाभिमानीला सोडचिठ्ठी देऊन सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांतीमध्ये प्रवेश केला होता. मात्र काही दिवसांमध्येच ते पुन्हा आपल्या मुळ घरी परतणार असल्याने राजू शेट्टींना दिलासा मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ED आणि CBI तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते? : राजू शेट्टी
कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
पुरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी हेलिकॉप्टर मिळत नाही, पण नेत्यांना फिरायला मिळतं: राजू शेट्टी
राज्यावर जल-आपत्ती आली आहे. कोल्हापूर सांगली आणि सातार जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. या जिल्ह्यांमध्ये विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी नेते पर्यटनस्थळाला भेट दिल्या सारखे हेलीकॉप्टर आणि बोटीमधून सेल्फी काढत आहेत. त्यामुळे या असंवेदनशील सरकारवर विरोधकांनी चांगलीचं टीकेची झोड उठवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी नारायण राणेंच्या भेटीला; तिसऱ्या आघाडीची चर्चा?
आगामी विधानसभा निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी आम्ही केली होती. याला अनेक पक्षांनी, संघटनानी पाठिंबा दिला आहे. नारायण राणेंनी सुद्धा ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित केली आहे, त्या संदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केली असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे.राजू शेट्टी यांनी आज नारायण राणे यांची मुंबईत भेट घेतली. माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच त्यांच्या मनात आहेत का? याबाबत या भेटीत चर्चा झाली. राणेंच्या मनात सुद्धा ईव्हीएम बाबत शंका आहेत. याबाबत जनजागृती आम्ही आता राज्यभर करत आहोत, असे शेट्टी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मनसे व वंचित हे पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर स्वाभिमानी स्वतंत्रणपणे त्यांना एकत्र घेऊन लढेल
आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की कोणती नवी समीकरणं तर उदयास येणार नाहीत ना अशी शक्यता निर्माण झाले आहे. कारण काँग्रेसने जरी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला काँग्रेससोबत घेण्याच्या हालचाली जरी सुरु केल्या असतील तरी त्यात विशेष प्रगती झाली नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी थेट राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट घातल्याने काँग्रेस पेचात पडली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची नाटकं राज्यातील शेतकऱ्यांना समजली आहेत; ते फसणार नाहीत: राजू शेट्टी
मागील काही दिवसांपासून आणि विधानसभा तोंडावर येताच शिवसेना पक्ष पुन्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक झाला आहे. त्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. त्यामुळे काही दिवसांपासून शिवसेना पीक विमा कंपन्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत असलेलं पाहायला मिळत आहे. परंतु विरोधकांकडून शिवसेनेच्या या भूमिकेवर बोचऱ्या शब्दात टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याच विषयाला अनुसरून स्वभिमानीचे नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्री सदाभाऊ खोत यांच्या भाषणावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
मंत्री सदाभाऊ खोत आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं विळा-भोपळ्याचं नातं महाराष्ट्राला सर्वश्रुत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मंत्री सदाभाऊ खोत यांना शहं देण्याचे प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केले जातात. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आयोजित केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीचे राजू शेट्टी व रविकांत तुपकर कृष्णकुंजवर, विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून पावसाळ्यात देखील सर्व पक्षाच्या नेत्यांची धावपळ सुरु झाली आहे. दरम्यान आज राज्यातील भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांनी एकत्र येत सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवाजीपार्क येथील कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीवेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी पक्षाचे नेते रविकांत तुपकर देखील उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेत एकूण ४९ जागा लढवणार: राजू शेट्टी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्यातील सर्वच लहान मोठे पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस-एनसीपीच्या जागावाटपाची अजून बोलणी झाली नसताना इतर लहान सहकारी पक्षांनी त्यांनी किती जागा लढवायच्या ते निश्चित करण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेत देखी काँग्रेस आघाडीला फक्त खेळवत बसण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतल्याचे प्रथम दर्शनी तरी दिसत आहे. तुम्ही आम्हाला किती जागा द्याव्यात यापेक्षा आम्हीच काँग्रेसला ४० जागा सोडतो असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभा तयारी: वंचित आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद मुंबई भाजपच्या बैठकीत?
प्रकाश आंबेडकर यांच्या नैतृवत्वाखाली स्थापन झालेली वंचित बहुजन आघाडीवर विरोधकांनी नेहमीच भाजपची बी टीम असा आरोप केला आहे. तसेच वंचित आघाडीचा उद्देश हा लोकसभा निवडणूक जिंकणं नव्हता तर भाजपाला अप्रत्यक्ष मदत करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करणं आहे, असा खुलेआम आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना केला होता.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- BSNL Broadband Offer | BSNL ऑफर; मिळणार 1300GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा, डिटेल्स जाणून घ्या
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन