महत्वाच्या बातम्या
-
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला शेतकऱ्यांचा पुळका: राजू शेट्टी
मागील तब्बल ५ वर्षे राज्यातील शेतकरी दारिद्र्यातच खितपत पडले आहेत. बळीराजाचे अनेक प्रश्न गंभीर रूप धारण करत आहेत. त्यात भर म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये प्रचंड वाढ होत गेली आहे. अशा अनेक शेतकरी प्रश्नावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही. मग शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राज ठाकरेंची भेट
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि भाजप बहुमताने पुन्हा देशात सत्तेत आली आहे. त्यात राज्यात भल्या भल्या दिग्गजांचे पराभव झाले आहेत. मात्र असेच पराभव देशभरातील दिग्गज नेत्यांचे झाल्याचे देखील सिद्ध झाले आहे. मात्र महाराष्ट्रात पावसाळा संपताच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने विरोधी पक्षांकडे फारच कमी वेळ असणार आहे. त्यामुळे आतापासूनच अनेकांनी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
हातकणंगले: शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी; स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी पराभूत
लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना कडवी झुंज दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेकडून पहिल्यांदा उमेदवारी घेणारे धैर्यशील माने आता पुढील ५ वर्ष या मतदारसंघाचे खासदार असतील हे निश्चित झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आघाडीच्या नेत्यांना राजू शेट्टींचा अल्टिमेटम; ३ जागा द्या नाहीतर..
आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावटपासाठी स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काँग्रेस-एनसीपी’च्या नेत्यांना अल्टिमेटम दिला आहे. लोकसभेच्या हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या ३ जागांसाठी स्वाभिमानी पक्ष आग्रही आहे. आघाडीच्या नेत्यांनी २ दिवसांत याबाबत निर्णय न कळवल्यास स्वाभिमानी पंधरा जागांवर स्वतंत्रपणे उमेदवार रिंगणात उतरवेल, असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अगोदरच भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला महाआघाडीत सामील होण्याविषयी झुलवत ठेवले आहे. त्यांची महाआघाडीत येण्याची शक्यता कमीच दिसत आहे. अशात राजू शेट्टी यांनीही वेगळा मार्ग निवडल्यास महाआघाडीचे स्वप्न भंग पावेल. मात्र, स्वत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेच महाआघाडीविषयी पुरते गंभीर नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
सरकारशी सकारात्मक चर्चेनंतर दूध आंदोलन मागे घेत आहोत: राजू शेट्टी
मागील चार दिवसांपासून सुरु असलेले दूध आंदोलन अखेर मागे घेण्याचा निर्णय राजू शेट्टी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर राजू शेट्टी ही अधिकृत घोषणा केली आणि अखेर सरकारचा जीव भांड्यात पडला आहे.
7 वर्षांपूर्वी -
आज चौथ्या दिवशीही दूधकोंडी कायम, जनावरांसह चक्काजाम आंदोलन
राज्यातील दूधकोंडी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. ग्रामीण भागात आंदोलन अजून तीव्र करण्यात आलं आहे. तिकडे सोलापुरात ‘दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभर दूध बंद आंदोलन सुरुच आहे.
7 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानी शेतकरी संघटने पुण्यात दुधाच्या ५ गाड्या फोडल्या, मुंबईत ‘दूध-कोंडी’
राज्य सरकारनेही दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपये दर द्यावा या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्यात येणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ५ दुधाच्या ५ गाड्या फोडल्याची बातमी आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर
नंदुरबारच्या शहाडामध्ये काल कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते. परंतु त्याला काही वेळातच हिंसक वळण लागल्याने अखेर जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
7 वर्षांपूर्वी -
कडेलोट करावा हीच भाजप सरकारची लायकी: राजू शेट्टी
धर्मा पाटील या ८० वर्षीय शेतकऱ्याने मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्नं केला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि त्याच विषयाला धरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली.
7 वर्षांपूर्वी -
मुंबईत २६ जानेवारी रोजी संविधान बचाव सत्याग्रह.
मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया कडील छत्रपती. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत २६ जानेवारीला लॉंग मार्च चे आयोजन होणार आहे. हार्दिक पटेल, पवार आणि बडे नेते उपस्थित !
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IREDA Share Price | हा मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करावा का? ऑल टाईम हाय पासून 55 टक्क्यांनी घसरला आहे - NSE: IREDA
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर तुमच्या पोर्टफोलिओसाठी फायदेशीर आहे का? ही आहे लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस - NSE: IRFC